Latest Update

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

वरिष्ठ वेतनश्रेणी / निवडश्रेणी प्रशिक्षणाची उद्दिष्टे

वरिष्ठ वेतनश्रेणी / निवडश्रेणी प्रशिक्षण हे 12 वर्षे / 24 वर्षे सेवा झालेल्या शिक्षकांना घेता येईल. या प्रशिक्षणाची उद्दिष्टे कोणती ती पाहूया. 

विशिष्ट वेतनश्रेणी प्रशिक्षण पात्रता निकष - Click Here

निवडश्रेणी प्रशिक्षण पात्रता निकष - Click Here

वरिष्ठ वेतनश्रेणी प्रशिक्षणाची उद्दिष्टे

  • राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० बाबत जाणीव जागृती करणे.
  • जागतिकीकरण, आधुनिकीकरणाच्या पार्श्वभूमीवर शिक्षण क्षेत्रात करावयाचे बदल व त्याचा शैक्षणिक गुणवत्तेवर होणारा परिणाम.
  • शिक्षक शिक्षण प्रक्रियेमध्ये सुधार करण्यासाठी आवश्यक ज्ञान, कौशल्य, वृत्ती बदल आत्मसात होण्यासाठी सक्षम करणे.
  • नवीन तंत्रज्ञान आत्मसात करून स्व विकास, छात्राध्यापक विकास, संस्था विकास होण्यासाठी त्याचा उपयोग करण्यास आत्मनिर्भर करणे.
  • एकविसाव्या शतकातील कौशल्य छात्राध्यापक/ विद्यार्थी यांमध्ये रुजविण्यासाठी सक्षम करणे.
  • शारीरिक व मानसिक स्वास्थ संवर्धनाचे मार्ग समजून घेऊन त्यानुसार कृती करण्यास सक्षम करणे.
  • मानवी हक्क सजगता, बहुसांस्कृतिकत्व व घटनात्मक मूल्यांची बांधिलकी जपण्यासाठी सबळ करणे.

निवडश्रेणी प्रशिक्षणाची उद्दिष्टे

  • बदलत्या शैक्षणिक आव्हानांना सामोरे जाण्यासाठी नवविचार प्रवाहाच्या अंमल बजावणीसाठी सक्षम करणे.
  • मूल्यमापन पध्दती आणि साधन तंत्रे यांच्या प्रभावी अंमल बजावणीसाठी शिक्षकांना सक्षम करणे.
  • शिक्षकांमध्ये प्रभावी शालेय व्यवस्थापन संघटन आणि प्रशासकीय कौशल्यासाठी आवश्यक शैक्षणिक कार्य संस्कृती विकसित करणे.
  • नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० नुसार शालेय अभ्यासक्रम व शिक्षक शिक्षण अभ्यासक्रमात होत असलेल्या बदलांना सामोरे जाण्यासाठी सक्षम करणे.
  • मानवी हक्क सजगता, बहुसांस्कृतिकत्व व घटनात्मक मूल्यांची बांधिलकी जपण्यासाठी सबळ करणे.
  • शिक्षक शिक्षण प्रक्रियेमध्ये सुधार करण्यासाठी आवश्यक ज्ञान, कौशल्य, वृत्ती बदल आत्मसात होण्यासाठी सक्षम करणे.
  • जागतिकीकरण, आधुनिकीकरणाच्या पार्श्वभूमीवर शिक्षण क्षेत्रात करावयाचे बदल व त्याचा शैक्षणिक गुणवत्तेवर होणारा परिणाम

Post a Comment

0 Comments

close