Latest Update

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

दहावी, बारावी बोर्ड परीक्षा केंद्रांवरील कर्मचाऱ्यांची होणार आदलाबदली

दहावी, बारावी बोर्ड परीक्षा केंद्रांवरील कर्मचाऱ्यांची होणार आदलाबदली | फेब्रुवारी-मार्च २०२६ च्या माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (इ.१०वी) व उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ.१२वी) परीक्षा केंद्रावरील कर्मचारी बदलाबाबत परिपत्रक 


फेब्रुवारी-मार्च २०२६ च्या माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (इ.१०वी) व उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ.१२वी) परीक्षेत कॉपीमुक्त अभियान राबविण्यासंदर्भात दि.२५/११/२०२५ रोजी मा. शिक्षणमंत्री महोदय यांनी बैठक आयोजित केली होती. सदर बैठकीमध्ये दिलेल्या निर्देशानुसार ०३ डिसेंबर, २०२५ शासन पत्राच्या अनुषंगाने सदर परीक्षेसाठी निश्चित केलेल्या सर्व केंद्रांवर परीक्षा पारदर्शक पद्धतीने पार पाडण्यासाठी ज्या माध्यमिक विद्यालय व उच्च माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थी ज्या परीक्षा केंद्रावर प्रविष्ट होणार आहेत, त्या परीक्षा केंद्रांसाठी केंद्रसंचालक, पर्यवेक्षक व परीक्षेशी संबंधित व्यक्तींची नियुक्ती सदर केंद्राव्यतिरिक्त इतर अन्य माध्यमिक विद्यालय/उच्च माध्यमिक विद्यालयातील शिक्षक व कर्मचाऱ्यांमधून करण्याबाबतची कार्यवाही करण्यात यावी असे कळविण्यात आले होते.


तथापि उपरोक्त ३० जानेवारी, २०२६ च्या पत्रान्वये शासनाने दिलेल्या निर्देशानुसार आपल्या विभागीय मंडळांतर्गत सर्व परीक्षा केंद्रावरील कर्मचाऱ्यांची अदलाबदल न करता ज्या परीक्षा केंद्रावर CCTV कॅमेरे उपलब्ध होणार नाहीत अशा परीक्षा केंद्रावरील सर्व कर्मचाऱ्यांची अदलाबदल करण्यात येणार आहे. 

ज्या माध्यमिक विद्यालय व उच्च माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थी ज्या परीक्षा केंद्रावर प्रविष्ट होणार आहेत, त्या परीक्षा केंद्रांसाठी केंद्रसंचालक, पर्यवेक्षक व परीक्षेशी संबंधित व्यक्तींची नियुक्ती सदर केंद्राव्यतिरिक्त इतर अन्य माध्यमिक विद्यालय/उच्च माध्यमिक विद्यालयातील शिक्षक व कर्मचाऱ्यांमधून करण्यात येणार आहे. 


फेब्रुवारी-मार्च २०२६ च्या माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (इ.१०वी) व उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ.१२वी) परीक्षा केंद्रावरील कर्मचारी बदलाबाबत परिपत्रक - Click Here


Post a Comment

0 Comments

close