शिक्षक भरती पवित्र पोर्टल संकेतस्थळ https://mahateacherrecruitment.org.in/ | पवित्र पोर्टलमार्फत दुसऱ्या टप्प्यातील शिक्षक पदभरतीसाठी करावयाच्या कार्यवाहीबाबत शासन परिपत्रक
पवित्र पोर्टल संकेतस्थळ
https://mahateacherrecruitment.org.in/
Pavitra Portal Website
https://mahateacherrecruitment.org.in/
New Update 13-09-2024
पवित्र पोर्टलमार्फत दुसऱ्या टप्प्यातील शिक्षक पदभरतीसाठी करावयाच्या कार्यवाहीबाबत
पवित्र पोर्टलमार्फत दुसऱ्या टप्प्यातील शिक्षक पदभरतीसाठी करावयाच्या कार्यवाहीबाबत शासन परिपत्रक डाउनलोड करा. Click Here
New Update 01-09-2024
'मुलाखतीसह' हा पर्याय निवडलेल्या खाजगी शैक्षणिक संस्थांच्या जाहिरातीतील रिक्त जागांसाठी उमेदवारांच्या मुलाखत व अध्यापन कौशल्यासाठी शिफारशीबाबत.
1) शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी-२०२२ नुसार पवित्र पोर्टल मार्फत शिक्षक पदभरतीची कार्यवाही करण्यात येत आहे. मुलाखतीसह पदभरतीचा पर्याय दिलेल्या शैक्षणिक संस्थांना उमेदवारांचे मुलाखत व अध्यापन कौशल्य यांसाठी चाचणी परीक्षेतील गुणवत्तेनुसार सर्वसाधारण गुणवत्ता यादी दिनांक ०७/०८/२०२४ रोजी प्रसिद्ध करण्यात आली आहे.
2) "मुलाखत अध्यापन कौशल्य" यांसाठीची कार्यवाही व्यवस्थापनांकडून करण्यास दिनांक ०९/०८/२०२४ ते ३१/०८/२०२४ असा देण्यात आलेला कालावधी संपुष्टात आला आहे.
3) सदर मुलाखत व अध्यापन कौशल्यनंतर निवडलेल्या उमेदवारांना नियुक्ती आदेश निर्गमित करण्यापूर्वी, निवड प्रक्रियेतील प्रशासकीय कार्यवाही करण्यासाठी पोर्टलवरील आवश्यक नोंदी पूर्ण करणे आवश्यक आहे. यासाठी शैक्षणिक संस्था/व्यवस्थापनस्तरावरील मुलाखत व अध्यापन कौशल्यनंतर पोर्टलवर गुणदान, निवड, प्रतीक्षाधीन इत्यादी आवश्यक नोंदी करण्यासाठी दिनांक ०७/०९/२०२४ पर्यंत पोर्टलवर सुविधा सुरू राहील.
पवित्र पोर्टल वरील निवड प्रक्रियेची पूर्ण माहिती नोंद केल्यानंतरच, निवड केलेल्या उमेदवारांना संस्थास्तरावरून प्रत्यक्ष नियुक्त आदेश निर्गमित करता येतील.
"मुलाखतीसह" या प्रकारातील "मुलाखत व अध्यापन कौशल्य यांसाठीच्या नोंदी दिनांक ०७/०९/२०२४ नंतर व्यवस्थापनस्तरावरून करता येणार नाहीत याची नोंद घ्यावी.
New Update 07-08-2024
🔖 निवड केलेल्या प्राधान्यापैकी 10 प्राधान्यक्रमासाठी शिफारस
🔖 30 गुणांची वस्तुनिष्ठ मुलाखत घेण्यात येणार, मुलाखतीसाठी मार्गदर्शक सूचना (SOP) जारी
New Update 11-07-2024
विनामुलाखत शिक्षक भरती खाजगी संस्थांची यादी जाहीर
New Update - 25-06-2024
निवड यादी - 26-02-2024
New Update - 11-06-2024
मुलाखतीशिवाय पदनिवडीचा प्राधान्यक्रम दिलेल्या संस्थांमध्ये "पवित्र प्रणाली" अंतर्गत शिक्षक पदभरती शिफारस यादीतील उमेदवारांच्या कागदपत्रांच्या पडताळणीबाबत व पुढील आवश्यक कार्यवाहीबाबत 11 जून 2024 चे परिपत्रक डाउनलोड करा. Click Here
New Update - 17.05.2024
New Update - 14 May 2024
शिक्षक पद भरतीबाबत प्रसिद्धीपत्रक
New Update - 19-April-2024
पवित्र पोर्टल मार्फत दिनांक २५/०२/२०२४ रोजी गुणवत्तेनुसार पात्र उमेदवारांची निवडीसाठी शिफारस असलेली सर्वसाधारण गुणवत्ता यादी व्यवस्थापन/जाहिरातनिहाय प्रसिद्ध करण्यात आलेल्या आहेत.
त्यानुसार पात्र उमेदवारांची कागदपत्र पडताळणी करून समुपदेशनाद्वारे नियुक्ती प्रक्रिया त्या त्या नियुक्ती प्राधिकारी स्तरावर सुरु करण्यात आली होती.
दरम्यान मा. भारत निवडणूक आयोग यांनी लोकसभा- २०२४ निवडणुकीचा कार्यक्रम घोषित केला व आदर्श आचारसंहिता लागू करण्यात आली. आचारसंहिता कालावधीत नियुक्ती संदर्भातील कार्यवाहीवर निर्बंध आले.
तथापि, या विषयाची तातडी तसेच न्यायालयीन आदेश विचारात घेता नियुक्ती प्रक्रिया सुरु ठेवण्यास परवानगी मिळण्यासाठी या कार्यालयाने शासनामार्फत मा. भारत निवडणूक आयोग यांच्याकडे प्रस्ताव सादर केला.
यासंदर्भात मा. भारत निवडणूक आयोग यांनी नियुक्तीस शिफारस झालेल्या ठिकाणाची मतदान प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर नियुक्ती संदर्भात कार्यवाही करणेस परवानगी दिली असून तसे शासन पत्र दिनांक १९/०४/२०२४ अन्वये या कार्यालयास कळवणेत आले आहे.
त्यानुसार वरील प्रमाणे कार्यवाही करण्याबाबत नियुक्ती प्राधिकारी यांना निर्देश देण्यात आले आहेत.
पवित्र पोर्टल शिक्षक भरती जाहिरात
New Update - 16-03-2024
न्यायालयीन प्रकरण आणि गैरहजर व रुजू न झालेल्या उमेद्वराबाबत अपडेट - Click Here
New Update - 07-03-2024
तक्रार निवारण समिती कडील अर्जाची तपासणी करणेबाबत - Click Here
New Update - 01-03-2024
शिक्षक भरती तक्रार निवारण व समांतर आरक्षणातील रूपांतरण फेरीसाठी (Conversion Round) तयारी सुरु असलेबाबत - Click Here
New Update - 29-02-2024
प्राधान्यक्रमाबाबत, आरक्षित व खुला प्रवर्गाबाबत, कट ऑफ मार्काबाबत, बिंदूनामावली, द्वितीय राउंड बाबत च्या शंका व त्यावरील उत्तरे
शिक्षक भरती बाबत शंका व त्यावरील उत्तरे पहा. Click Here
New Update - 28-02-2024
शिक्षक भरती खुला प्रवर्ग व आरक्षण प्रवर्ग निवड बाबत प्रसिद्धी पत्रक - Click Here
New Update - 28-02-2024
New Update - 28-02-2024
New Update - 27-02-2024
शिक्षक भरती प्रसिद्धी पत्रक - 27 Feb - Click Here
New Update - 26-02-2024
New Update - 25-02-2024
New Update - 25-02-2024
उमेदवारांसाठी सूचना
शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी-२०२२ नुसार प्राप्त जाहिरातीतील रिक्त पदांसाठी उमेदवारांच्या निवडीसाठी शिफारशीबाबत.
उमेदवारांच्या निवडीबाबत सर्व सूचना वाचा. - Click Here
New Update - 24-02-2024
New Update - 23-02-2024
New Update - 22-02-2024
नियुक्तीसाठी शिफारसपात्र उमेदवारांची सर्वसाधारण गुणवत्ता यादी लवकरच जाहीर करण्यात येणार आहे.
New Update - 21-02-2024
संगणकीय आज्ञावलीचे परीक्षण कार्यवाही पूर्ण झाल्यानंतर नियुक्तीसाठी शिफारसपात्र उमेदवारांची सर्वसाधारण गुणतत्ता यादी जाहीर करणेबाबत परिपत्रक. - Click Here
New Update - 18-02-2024
उमेद्वारांचे जेष्ठतेनुसार प्राधान्यक्रम तपासणे सुरु.
नियुक्ती यादी तयार करण्याचे काम संगणकीय प्रणाली द्वारे सुरु,
भरती प्रक्रिया पारदर्शकपणे सुरु असून कोणत्याही खोट्या अमिशाला बळी पडू नका. - आयुक्त मांढरे - सविस्तर सूचना 18 Feb - Click Here
New Update - 15-02-2024
शिक्षक भरतीच्या अनुषंगाने शंका समाधान व इमेल बाबत सूचना - Click Here
New Update - 14-02-2024
रयत शिक्षण संस्था सातारा येथील शिक्षकांची खंडपीठ औरंगाबाद येथे याचिका अनुषंगाने सूचना - Click Here
New Update - 13-02-2024
मा. उच्च न्यायालय खंडपीठ औरंगाबाद येथे रीट याचिका क्र. 1606/2024 मध्ये आज सुनावणी झाली. त्यानंतर मा न्यायालयाने प्रचलित शासन धोरण व तरतुदीनुसारच कार्यवाही सुरू ठेवण्याचे निर्देश दिले आहेत तसेच प्राधान्यक्रम लॉक करण्याची प्रक्रिया दि. 14/02/2024 पर्यंत सुरू ठेवण्याचे निर्देश दिले आहेत. त्याप्रमाणे कार्यवाही करण्यात येत आहे, याची सर्व उमेदवारांनी व संबंधितांनी नोंद घ्यावी.
भरती प्रक्रियेला कोणताही विलंब होऊ नये, याकरता प्रशासनाकडून सर्वतोपरी प्रयत्न करण्यात येत आहेत. Click Here
New Update - 12-02-2024
New Update - 11-02-2024
शंका समाधान - शिक्षक भरती संदर्भात शंका समाधान परिपत्रक डाउनलोड करा. Click Here
New update - 09-02-2024
• काही उमेदवारांना प्राधान्यक्रम लॉक करताना त्यांच्या पात्रतेनुसार प्राधान्यक्रम उपलब्ध होण्यासाठी Alert येत असल्यास अशा उमेदवारांनी त्यांनी पूर्वीचे प्राप्त प्राधान्यक्रम डीलीट करून नव्याने जनरेट करून लॉक करण्याची आवश्यक ती कार्यवाही करावी.
• प्राधान्यक्रम जनरेट करून लॉक केल्याशिवाय उमेदवार पदभरतीच्या पुढील प्रक्रियेत सहभागी राहणार नाही, यास्तव प्राधान्यक्रम नमूद करून लॉक करणे अनिवार्य आहे.
New Update - 08-02-2024
New Update - 07-02-2024
प्राधान्यक्रम उपलब्ध होत नसलेबाबत शंका व समाधान पहा. - Click Here
New Update - 06-02-2024
▪️पात्रतेनुसार प्राधान्यक्रम उपलब्ध होत नसल्यास, विभागाने पुरविलेल्या ईमेलवर संदेश पाठवावा. Touch on email to send quarry - edupavitra2022@gmail.com
▪️नमूद अर्हता असेल व प्राधान्यक्रम जनरेट होत असतील, तर उमेदवारांनी असे प्राधान्यक्रम लॉक करण्यास हरकत नाही.
सविस्तर सूचना परिपत्रक pdf 06/02/2024 डाउनलोड करा. - Click Here
New Update - 05-02-2024
New Update - 31-01-2024 - Click Here
New Update - 30-01-2024 - Click Here
New Update - 14-01-2024 - Click Here
New Update - 03-11-2023
PAVITRA-TEACHER RECRUITMENT २०१७ साठी स्व प्रमाणपत्र पूर्ण केलेल्या उमेदवारांना या प्रक्रियेत सहभागी करण्यात आलेले आहे, तथापि सन २०१९ मध्ये उमेदवारांनी स्व प्रमाणित केलेले होते तसेच जुलै- २०२२ मध्ये स्व-प्रमाणित केलेले होते त्यांनी एप्रिल २०२३ मध्ये स्व-प्रमाणित केलेले नाही त्यांना स्व-प्रमाणित करून प्राधान्य क्रम नोंद करण्यास सुविधा देणे आवश्यक आहे. या उमेदवारांना त्यांचे प्राधान्यक्रम लॉक करण्यासाठी काही मुदत देणे आवश्यक आहे. वरील बाबी विचारात घेता कार्यवाही पूर्ण करण्यास दि. ०७/११/२०२३ पर्यन्त मुदतवाढ देण्यात येत आहे.
शासन परिपत्रक - 03-11-2023 डाउनलोड करा. Click Here
New Update - 27-10-2023
शिक्षक भरती पवित्र पोर्टलवर जाहिरात देण्याची सुविधा उपलब्ध
शिक्षक भरती - पवित्र पोर्टलवर जाहिरात देण्याची सुविधा उपलब्ध, जाहिरात देताना कोणती काळजी घ्यावी यासंदर्भात शासन परिपत्रक - Click Here
New update - 21-09-2023
शिक्षक अभियोग्यता व बुद्धीमत्ता चाचणी-२०२२ नुसार शिक्षक पदभरती करण्यासाठी उमेदवारांकडून स्व प्रमाणपत्र पूर्ण करण्याबाबत.
सन २०१८ व २०१९ मध्ये झालेल्या शिक्षक पात्रता परीक्षांमध्ये (TET) गैरप्रकार केल्यामुळे महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे यांनी प्रतिबंधित केलेल्या उमेदवारांना मा. उच्च न्यायालय, मुंबई येथील याचिका (Stamp) क्र ४४३४ / २०२३, १८२४/२०२३ व खंडपीठ औरंगाबाद येथे दाखल याचीका क्र १९५३/२०२३ मध्ये दिलेल्या निर्णयानुसार शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी २०२२ या चाचणीस प्रविष्ट होता येत नसल्याचा निर्णय दिला होता. यामुळे सदर उमेदवारांना स्व-प्रमाणपत्र नोंदणी करीता सहभागी करण्यात आलेले नाही.
मा. उच्च न्यायालय, मुंबई येथील याचिका क्रमांक ११५७० / २०२३ व अन्य याचीकामधील अंतरिम आदेश दिनांक १३/०९/२०२३ तसेच खंडपीठ औरंगाबाद येथील याचिका क्र ८५३४ / २०२३ व ११७३२ / २०२३ मधील आदेश अनुक्रमे दिनांक १४.०९.२०२३ व दिनांक २०.०९.२०२३ व तसेच खंडपीठ नागपूर येथील याचिका क्र ६१६३/२०२३ व अन्य याचिकातील अंतरिम आदेशानुसार उमेदवारांना आवश्यक त्या बाबींची पूर्तता होत असल्याची खात्री संबंधित नोडल अधिकाऱ्यांनी केल्यानंतर स्व-प्रमाणन करण्याबाबत सोय उपलब्ध करून देण्याबाबतचे निर्देश मा. उच्च न्यायालयाने दिले आहेत. मा. उच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयानुसार प्राप्त होणाऱ्या अर्जांची छाननी करून पात्रता निश्चित करावयाची कार्यवाही नोडल अधिकारी यांचेकडून होणार आहे. या प्रक्रियेसाठी लागणारा वेळ विचारात घेता स्व-प्रमाणपत्र नोंदणी करणेसाठी मुदतवाढ देणे आवश्यक आहे.
करीता उमेदवारांना स्व-प्रमाणपत्र नोंदणी करणेसाठी दिनांक ३०/०९/२०२३ पर्यंत मुदतवाढ देण्यात येत आहे.
शिक्षक अभियोग्यता व बुद्धीमत्ता चाचणी-२०२२ नुसार शिक्षक पदभरती करण्यासाठी उमेदवारांकडून स्व प्रमाणपत्र पूर्ण करण्याबाबत.
१. शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी-२०२२ ही दिनांक २२/०२/२०२३ ते दिनांक ३/३/२०२३ या कालावधीमध्ये ऑनलाईन घेण्यात आलेली आहे. सदर चाचणीस २,३९,७३० उमेदवारांनी नोंदणी केली होती. त्यापैकी २,१६,४४३ उमेदवारांनी प्रत्यक्ष चाचणी दिली आहे.
२. या चाचणी दिलेल्या उमेदवारांना स्व प्रमाणपत्र तयार करण्यासाठी या पोर्टलद्वारे सुविधा देण्यात आलेली आहे.
३. उमेदवारांना स्व-प्रमाणपत्र करताना आवश्यक असणाऱ्या तपशीलवार मार्गदर्शक सूचना पोर्टल वर उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत.
४. सन २०१८ व २०१९ मध्ये झालेल्या शिक्षक पात्रता परीक्षामध्ये गैरप्रकार केल्यामुळे महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे यांनी प्रतिबंधित केलेल्या उमेदवारांना मा उच्च न्यायालय, मुंबई येथील याचिका (Stamp) क्र ४४३४ / २०२३ १८२४ / २०२३ व खंडपीठ औरंगाबाद येथे दाखल याचीका क्र १९५३ / २०२३ मध्ये दिलेल्या निर्णयानुसार शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी २०२२ या चाचणीस प्रविष्ट होता येत नसल्याचा निर्णय दिला आहे. यामुळे सदर उमेदवारांनी सहभागी होऊ नये, ते सहभागी झाल्याचे निदर्शनास आल्यास त्यांची कोणत्याही टप्प्यावर उमेदवारी रद्ध होईल, याची उमेदवारांनी नोंद घ्यावी.
५. शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी २०२२ परीक्षा केवळ एक वेळ देण्याची तरतूद आहे. उमेदवारांना चाचणी परीक्षेचे प्रवेशपत्र वितरीत करताना चाचणीसाठी एकापेक्षा अनेक प्रवेश पत्र प्राप्त झाल्यास केवळ एकाच प्रवेश पत्राद्वारे चाचणीस प्रविष्ट होण्याबाबत सूचित करण्यात आले होते, असे असतानाही काही उमेदवार एकापेक्षा जास्त वेळा चाचणीस प्रविष्ट झाल्याचे निदर्शनास आले आहे. असे एकापेक्षा जास्त वेळा चाचणीस प्रविष्ट झालेल्या उमेदवारांना निवड प्रक्रियेच्या कोणत्याही टप्प्यावर ते सहभागी करून घेता येणार नाही. यामुळे सदर उमेदवारांनी सहभागी होऊ नये, सहभागी झाल्याचे निदर्शनास आल्यास त्यांची कोणत्याही टप्यावर उमेदवारी रद्ध होईल, याची उमेदवारांनी नोंद घ्यावी.
६. उमेदवारांना स्व प्रमाणपत्र पूर्ण करण्यासाठी दिनांक ०१/०९/२०२३ ते दिनांक १५/०९/२०२३ पर्यंत मुदत देण्यात आली होती. आता ही मुदत वाढविण्यात आली असून दि. 22-09-2023 पर्यंत नोंदणी करता येईल.
७. ज्या उमेदवारांच्या TET /CTET च्या माहितीमध्ये तफावत येईल अशा उमेदवारांना राज्यातील आपण निवड केलेल्या जिल्ह्याचे शिक्षणाधिकारी प्राथमिक यांचेकडून सदर उमेदवार आपणच असल्याचे सिद्ध करण्यासाठी विनंती अर्ज, ओळखीच्या पुरावा व सबंधित कागदपत्रे यासह संपर्क साधावा. सदरची सुविधा लवकरच देण्याबाबत स्वतंत्रपणे पोर्टलवर सूचना प्रसिद्ध करण्यात येईल.
८. सन २०१९ मध्ये पवित्र पोर्टलमार्फत दिनांक ९/८/२०१९ रोजी प्रसिद्ध झालेल्या यादीतील अपात्र, गैरहजर, रुजू न झालेले व माजी सैनिक यांच्या रिक्त राहिलेल्या जागांकरीता गुणवत्तेनुसार पुढील उमेदवारांसाठी यादी प्रसिद्ध करावयाची आहे, त्यासाठी जिल्ह्याकडील माहिती प्राप्त झाली आहे. त्यानुसार पुढील प्रक्रिया करण्यात येणार आहे, याबाबतच्या स्वतंत्र सूचना देण्यात येतील.
९. प्रमाणपत्र करण्यासाठी अडचण आल्यास edupavitra2022@gmail.com या इमेल वर संपर्क साधता येईल.
स्व प्रमाणपत्र तयार करण्यासाठी सूचना PDF डाउनलोड करा. (01-09-2023)- Click Here
स्व प्रमाणपत्र बाबत सूचना PDF डाउनलोड करा. (01-09-2023)- Click Here
0 Comments