Latest Update

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

पवित्र पोर्टल शिक्षक भरती जाहिरात PDF 2024 | शिक्षक भरती विविध जाहिराती व अर्ज करणेबाबत उमेद्वारांना सर्वसाधारण सूचना | पवित्र पोर्टल संकेतस्थळ https://mahateacherrecruitment.org.in

पवित्र पोर्टल वर जाहिरात देण्याची सुविधा उपलब्ध | शिक्षक भरती संदर्भात पवित्र पोर्टल वरील जाहिराती डाउनलोड करा.   उमेद्वारांनी जाहिराती नुसार अर्ज करताना कोणती काळजी घ्यावी? महत्त्वाच्या सूचना वाचा. 




Get more update on WhatsApp Join Group



पवित्र पोर्टल अधिकृत संकेतस्थळ

Pavitra Portal Official Website


You have to wait 20 seconds.

Wait for Generating Link...



➡️पवित्र पोर्टल वरील रिक्त पदांचा तपशील 
➡️अनुसूचित जाती - 3147 पदे 
➡️अनुसूचित जमाती - 3542 पदे 
➡️विमुक्त जाती (अ) - 862 पदे 
➡️भटक्या जमाती (ब)- 404पदे 
➡️भटक्या जमाती (क) - 582 पदे 
➡️विशेष मागास प्रवर्ग - 290 पदे 
➡️इतर मागास प्रवर्ग -4024 पदे 
➡️आर्थिक दुर्बल घटक - 2324 पदे 
➡️खुला - 6170 पदे

➡️इयत्ता १-५ वी - 10240 पदे 
➡️इयत्ता ६-८ वी  - 8127 पदे 
➡️इयत्ता ९-१० वी - 2176 पदे 
➡️इयत्ता ११-१२ वी- 1135 पदे



शिक्षक भरती पवित्र पोर्टलवर जाहिरात देण्याची सुविधा उपलब्ध

राज्यातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्था तसेच खाजगी शैक्षणिक संस्था यांच्यामार्फत चालविल्या जाणान्या शाळांतील रिक्त पदे भरण्यासाठी

https://tait2022.mahateacherrecruitment.org.in या संकेतस्थळावर आरक्षण व विषय नोंद करुन जाहिरात देण्याची सुविधा दिनांक १६/१०/२०२३ पासून देण्यात आलेली आहे. आता सर्व जिल्हा परिषदेच्या रिक्त पदांच्या जाहिराती पवित्र पोर्टल वर अपलोड करण्यात येत आहेत. 


शिक्षक भरती पवित्र पोर्टल जाहिरात PDF












शिक्षक भरती सर्व जाहिराती - Without Interview

  शिक्षक भरती सर्व जाहिराती - With Interview





शिक्षक भरती संदर्भातील सर्व जाहिरातीसाठी ( without interview / with interview ) पवित्र पोर्टल वरील Home Page या टॅब जाऊन सर्व जाहिराती डाउनलोड करा. 

Click Here to go Pavitra Portal Home page





पवित्र प्रणालीद्वारे शिक्षक भरती जाहिरातीसाठी उमेद्वारांना अर्ज करणेपूर्वी आवश्यक सूचना 


1 अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी-2022 (TAIT) प्रविष्ट झालेल्या उमेदवारांपैकी ज्या उमेदवारांनी पवित्र प्रणाली (https://tait2022.mahateacherrecruitment.org.in) या संकेतस्थळावर वैयक्तिक माहिती नोंदवून स्वप्रमाणित केलेली आहे, असेच उमेदवार जाहिरातीनुसार ऑनलाईन अर्ज करू शकतील.

2 इच्छुक व अर्हता धारण करणारे उमेदवार ऑनलाईन जाहिरातीच्या अनुषंगाने पात्र असलेल्या पदांसाठी पसंतीक्रम नमूद करून पोर्टलवर ऑनलाईन अर्ज करतील.


3 इ. 1 ली ते इ 5 वी व इ6 वी ते इ 8 वी या गटातील पदांसाठी अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी -2022 (TAIT) परीक्षेपूर्वी शिक्षक पात्रता परीक्षा (TET/CTET) उत्तीर्ण असणारे उमेदवारच अर्ज करू शकतील. डिसेंबर 2022 मध्ये CTET करिता प्रविष्ट उमेदवारांचा निकाल मात्र TAIT परीक्षेनंतर लागलेला असला तरी असे उमेदवार अर्ज करण्यास पात्र ठरतील.

4 इ.6 वी ते इ 8 वी या गटातील इतिहास/भूगोल / सामाजिक शास्त्र या विषयांसाठी उमेदवार शिक्षक पात्रता परीक्षा (TET/CTET) सामाजिकशास्त्र विषय घेऊन TET-Paper-2 /CTET-Paper-2 उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.

5 इ.6 वी ते इ 8 वी या गटातील विज्ञान/गणित/गणित-विज्ञान या विषयांसाठी उमेदवार शिक्षक पात्रता परीक्षा (TET/CTET) गणित-विज्ञान विषय घेऊन TET-Paper-2 /CTET-Paper-2 उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.

6 इ.6 वी ते इ 8 वी या गटातील भाषा या विषयांसाठी उमेदवार शिक्षक पात्रता परीक्षा (TET/CTET) गणित-विज्ञान किंवा सामाजिक शास्त्र यांपैकी कोणताही विषय घेऊन TET-Paper-2 /CTET-Paper-2 उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.

7 इ. 9 वी ते इ 10 वी /इ 11 वी ते इ 12 वी या गटातील पदांसाठी अर्ज करणारा उमेदवार अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी-2022 (TAIT) या चाचणीस प्रविष्ट असणे आवश्यक आहे.

8 शैक्षणिक व व्यावसायिक अर्हता व अध्यापनाचे विषय, वयोमर्यादा, आरक्षण, अन्य पात्रता व आवश्यक कागदपत्रे इत्यादी साठी सर्वसाधारण सूचना सविस्तर तपशिलासह https://tait2022.mahateacherrecruitment.org.in या संकेतस्थळावर पवित्र प्रणालीमध्ये " उमेदवारांसाठी सर्वसाधारण सूचना" या शीर्षाखाली उपलब्ध आहेत. सदर सूचना व सूचनांमध्ये नमूद आवश्यक शासन निर्णय यांचे अवलोकन करून स्वतःची खात्री करूनच ऑनलाईन अर्ज करावेत.

9 व्यवस्थापनाने जाहिरातीत दर्शविलेल्या एकूण पदांमध्ये दिव्यांग आरक्षणाच्या पदांचा समावेश आहे.

10 व्यवस्थापनाने जाहिरातीत दर्शविलेल्या एकूण पदांमध्ये अनाथ आरक्षणाच्या पदांचा समावेश आहे.

11 व्यवस्थापनाच्या जाहिरातीत दर्शवलेल्या आरक्षणामध्ये व पदसंख्येमध्ये बदल होण्याची शक्यता आहे.

12 उच्च माध्यमिक / कनिष्ठ महाविद्यालयांच्या अध्यापनाच्या दोन विषयांसाठी एक पूर्णकालीन पदाची जाहिरात असल्यास, या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराची शैक्षणिक अर्हता दोन्ही विषयामध्ये पदव्युत्तर पदवी (किमान द्वितीय श्रेणीमध्ये) उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.

13 जिल्हा परिषदेच्या केंद्र शाळा स्तरावर केंद्रातील अन्य शाळांमधील शिक्षकांना इंग्रजी भाषेच्या अध्यापनाचे तंत्र शिकविण्याकरिता नियुक्त करावयाच्या साधन व्यक्तीची निवडीसाठीची शिफारस शासन निर्णय दि. १३.१०.२०२३ मध्ये नमूद तरतुदी/ निकष / प्राधान्यक्रम लक्षात घेऊन करण्यात येईल याची उमेदवारांनी नोंद घ्यावी.


14 जिल्हा परिषद शाळांमध्ये नव्याने नियुक्त होणाऱ्या शिक्षकांना शासन निर्णय, शालेय शिक्षण विभाग दिनांक २१/०६/२०२३ मधील तरतुदीनुसार जिल्हा बदलीचा हक्क असणार नाही, याची उमेदवारांनी नोंद घ्यावी.




पवित्र पोर्टल वर शिक्षक भरती जाहिरात येणे सुरु झाले बाबतची बातमी / Video पहा. 


शिक्षक भरती जाहिरात PDF
पवित्र पोर्टल जाहिरात pdf
Teachers Recruitment advertisement pdf
Pavitra portal advertisement pdf

Post a Comment

0 Comments

close