शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी २०२२ नुसार पवित्र पोर्टलमार्फत शिक्षक पदभरतीसाठीच्या रिक्त जागांसाठी प्राधान्यक्रम जनरेट व लॉक करणेबाबत उमेदवारांसाठी सर्वसाधारण सूचना
https://mahateacherrecruitment.org.in/
शिक्षक भरती सर्व जाहिराती पहा. - Click Here
शिक्षक भरती पवित्र पोर्टल अधिकृत संकेतस्थळ पहा.
उमेदवारांसाठी प्राधान्यक्रम जनरेट करणे व लॉक करणेबाबत सर्वसाधारण सूचना
१. शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी-२०२२ ही दिनांक २२/०२/२०२३ ते दिनांक ३/३/२०२३ या कालावधीमध्ये ऑनलाईन घेण्यात आलेली होती. सदर चाचणीस २,३९,७३० उमेदवारांनी नोंदणी केली होती, त्यापैकी २,१६,४४३ उमेदवार चाचणीस प्रविष्ट होते.
२. या चाचणीस प्रविष्ट उमेदवारांना स्व-प्रमाणपत्र तयार करण्यासाठी या पोर्टलद्वारे सुविधा देण्यात आलेली होती.
३. https://tait2022.mahateacherrecruitment.org.in या संकेतस्थळावर दिलेल्या मुदतीत स्व-प्रमाणपत्र (Self Certified copy) पूर्ण केलेल्या उमेदवारांनाच या प्रक्रियेत सहभागी होता येईल व फक्त त्यांनाच लॉगिन उपलब्ध होईल.
४. उमेदवारांना प्राधान्यक्रम Generate करण्याची सुविधा दिनांक ०५/०२/२०२४ पासून उपलब्ध करून देण्यात येत आहे.
User manual for generating preferences - Click Here
५. उमेदवारांनी पोर्टलवर उपलब्ध करून दिलेल्या जाहिरातींचा अभ्यास करावा. सदर जाहिराती उमेदवारांना संकेतस्थळावरील Home page वर Download या मेनूमध्ये पाहता येतील. मुलाखतीशिवाय (Without Interview) व मुलाखतीसह (With Interview) या दोन्ही प्रकारच्या जाहिराती स्वतंत्रपणे उपलब्ध आहेत.
६. प्राधान्यक्रम Generate करून ते लॉक करण्यासाठी उमेदवारांना User Manual for Preference Generation TAIT 2022 या नावाने Home page वर User Manual या मेनूमध्ये देण्यात आलेले आहे.
७. उमेदवारांना लॉगिन केल्यानंतर Generate Preference या मेनूचा वापर करून मुलाखतीशिवाय (Without Interview) व मुलाखतीसह (With Interview) या दोन्ही प्रकारच्या प्राधान्यक्रमांची यादी स्वतंत्रपणे Generate करता येईल. प्राधान्यक्रम Generate केल्यानंतर Generate झालेल्या प्राधान्यक्रमाबाबत आवश्यक ती खात्री करतील.
८. मुलाखतीशिवाय (Without Interview) व मुलाखतीसह (With Interview) या दोन्ही प्रकारच्या पर्यायासाठी पात्र उमेदवारांना प्राधान्यक्रम Generate होतील. या दोन्ही प्रकारच्या नियुक्तीचे प्राधान्यक्रम उमेदवार Generate व lock करू शकतील.
९. उमेदवारांना प्राधान्यक्रम लॉक करण्यासाठी दिनांक ०८/०२/२०२४ ते ०९/०२/२०२४ असा कालावधी देण्यात येत आहे.
१०. उमेदवारांनी User Manual मध्ये नमूद केल्यानुसार प्राधान्यक्रम lock करण्याची कार्यवाही वगळून इतर सर्व कार्यवाही पूर्ण करावी, प्रत्यक्ष Lock करण्याची सुविधा दिल्यानंतर प्राधान्यक्रम lock करावेत.
११. उमेदवारांनी विहित मुदतीत प्राधान्यक्रम लॉक करावेत.
१२. उमेदवारांना मुलाखतीशिवाय (Without Interview) व मुलाखतीसह (With Interview) या दोन्ही प्रक्रियेत सहभागी व्हावयाचे असल्यास दोन्ही प्रकारचे प्राधान्यक्रम जनरेट करून लॉक करणे बंधनकारक आहे.
१३. जे उमेदवार प्राधान्यक्रम Generate करून lock करणार नाहीत, ते उमेदवार निवडीच्या कोणत्याही टप्प्यावर विचारात घेतले जाणार नाहीत.
१४. प्राधान्यक्रम जनरेट करून लॉक करण्यापूर्वी उमेदवारांनी आपल्या शैक्षणिक, व्यावसायिक व इतर अर्हतेनुसार प्राध्यान्यक्रम जनरेट झाले असल्याची खात्री करावी. काही तांत्रिक बाबींमुळे अपवादात्मक प्रकरणी जनरेट झालेले प्राधान्यक्रम उमेदवारांच्या शैक्षणिक व व्यावसायिक अर्हतेशी सुसंगत नसतील, तर असे प्राधान्यक्रम उमेदवारांनी लॉक करू नयेत. असे केल्यास व परिणामी उमेदवाराची चुकीच्या पदावर नियुक्ती/मुलाखतीसाठी शिफारस झाल्यास उमेदवार स्वतः जबाबदार राहील.
१५. ज्या उमेदवारांनी दिनांक १२/०२/२०२३ नंतर शैक्षणिक, व्यावसायिक व इतर अर्हता अथवा कोणतीही अर्हता प्राप्त केली असेल अथवा दिनांक १२/०२/२०२३ नंतर प्राप्त असताना देखील दिनांक १२/०२/२०२३ पूर्वी उत्तीर्ण केली असल्याची नोंद केली असेल तरीही अशा दिनांक १२/०२/२०२३ नंतरच्या वाढीव अर्हतेचे प्राधान्यक्रम उमेदवारांना प्राप्त होत असतील, तर असे प्राधान्यक्रम त्यांनी कोणत्याही परिस्थितीत लॉक करू नयेत. या प्राधान्यक्रमाचा कोणत्याही व्यवस्थापनातील (मुलाखतीशिवाय व मुलाखतीसह) नियुक्तीसाठी कोणत्याही स्तरावर विचार होणार नाही, याची उमेदवारांनी नोंद घ्यावी.
१६. उमेदवारांने स्व-प्रमाणपत्रामध्ये नमूद केलेल्या माहितीच्या आधारे प्राधान्यक्रम Generate होतील. स्व-प्रमाणपत्रामध्ये चुकीची माहिती नोंद झाल्याचे उमेदवाराचे निदर्शनास आल्यास व त्यामुळे प्राधान्यक्रम Generate झाल्यास त्यांनी असे प्राधान्यक्रम लॉक करू नयेत, जेणेकरून त्यांची नियुक्तीच्या कोणत्याही टप्प्यावर अडचण / गैरसोय होणार नाही.
१७. उमेदवारांनी प्राधान्यक्रम Generate करून लॉक केल्यानंतर त्यांना प्राधान्यक्रमात बदल करावयाचा असल्यास पूर्वी Generate केलेले प्राधान्यक्रम Delete करून विहित मुदतीत प्राधान्यक्रम पुन्हा Generate करून लॉक करता येतील. सदर सुविधेचा वापर विहित मुदतीत उमेदवार जास्तीतजास्त ३ वेळा करू शकतील. सबब उमेदवारांनी आपली अर्हता विचारात घेऊन काळजीपूर्वक प्राधान्यक्रम लॉक करावेत.
१८. उमेदवारांनी ज्या क्रमाने प्राधान्यक्रम लॉक केले आहेत, त्या क्रमाने टेट परीक्षेतील गुणवत्तेनुसार प्राधान्यक्रम विचारात घेतले जातील. उमेदवाराची ज्या प्राधान्यक्रमावर नियुक्ती/मुलाखतीसाठी शिफारस झाल्यानंतर, उमेदवाराचे त्या क्रमानंतरच्या उर्वरित प्राधान्यक्रमांचा विचार केला जाणार नाही.
१९. उमेदवाराने किती प्राधान्यक्रम नोंद (Lock) करावेत यासाठी कोणतीही मर्यादा नाही, उमेदवार पात्र असल्यास आलेले सर्व प्राधान्यक्रम लॉक करू शकतो.
२०. उमेदवारांचे लॉगिन हे otp base असल्याने त्यांनी नोंद केलेल्या मोबाईल क्रमांकावर otp येणार आहेत. यास्तव ज्या उमेदवारांना लॉगिन करण्यासाठी त्यांचा मोबाईल क्रमांक बदल करून घ्यावयाचा आहे, त्यांनी नजीकच्या शिक्षणाधिकारी (प्राथमिक/माध्यमिक), शिक्षण निरीक्षक (पश्चिम/दक्षिण/उत्तर) यांचे कार्यालयामध्ये विनंती अर्ज व ओळखीच्या पुराव्यासह संपर्क साधावा.
२१. उमेदवारांनी पोर्टलवरील स्व-प्रमाणपत्रामध्ये नमूद केलेल्या माहितीनुसार त्यांना प्राधान्यक्रम Generate होतील.
२२. उमेदवारांनी पोर्टलवर अपलोड केलेली शैक्षणिक व व्यावसायिक अर्हतेची प्रमाणपत्रे, जात प्रवर्ग/ समांतर आरक्षणाची प्रमाणपत्रे, सवलती संबंधीची इतर प्रमाणपत्रे जरी अपलोड केली असली, तरी त्यांपैकी कोणत्याही प्रमाणपत्राची पडताळणी किंवा सत्यता पोर्टलमार्फत तपासण्यात आलेली नाही. त्यामुळे उमेदवारांनी केलेल्या कोणत्याही दाव्याच्या पुष्ट्यर्थ संबंधित कागदपत्रे शिफारशीनंतर संबंधित व्यवस्थापनाच्या कागदपत्र पडताळणी समितीकडून पडताळणी केली जाईल. त्यामध्ये कोणतीही तफावत आढळून आल्यास कोणत्याही टप्प्यावर संबंधितांची उमेदवारी रद्द केली जाईल. यास्तव उमेदवारांनी प्राधान्यक्रम लॉक करतेवेळी आवश्यक ती खबरदारी घ्यावी.
२३. उमेदवाराने पवित्र पोर्टलवर स्वतःचा हेतू साध्य करण्यासाठी खोटी, चुकीची किंवा अपूर्ण माहिती दिली असेल, तसेच खरी माहिती लपवून ठेवली असेल, किंवा त्यात बदल केला असेल, किंवा कागदपत्र पडताळणीच्यावेळी सादर केलेल्या कागदपत्रांमध्ये कुठल्याही प्रकारची खाडाखोड दिसून आल्यास किंवा ते प्रमाणपत्र बनावट असल्याचे निदर्शनास आल्यास, असा उमेदवार गैरवर्तणूकीबद्दल कोणत्याही टप्प्यावर अपात्र ठरून तो योग्य त्या शिक्षेस पात्र राहील.
२४. महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा (MAHATET) मध्ये गैरप्रकारात समाविष्ट उमेदवारांची नियुक्तीसाठी निवड झाल्यास नियुक्तीपूर्वी त्यांची चारित्र्य पडताळणी करून त्यानंतर नियुक्तीची कार्यवाही करण्यात येईल.
२५. उमेदवारांनी प्राधान्यक्रम लॉक केल्यानंतर त्याची प्रिंट घेण्यासाठी लॉगिन केल्यानंतर Reports या मेनूमध्ये मुलाखतीशिवाय यासाठी View Locked Preferences (Without Interview) तसेच मुलाखतीसह यासाठी View Locked Preferences (With Interview) या टॅबवर क्लिक केल्यावर प्रिंट घेता येईल.
२६. उमेदवार एकाच व्यवस्थापनातील एकापेक्षा अधिक गट/विषयांसाठी शैक्षणिक व व्यावसायिक इत्यादी अर्हता धारण करीत असल्यास त्यास त्या व्यवस्थापनाचे असे एकापेक्षा अधिक प्राधान्यक्रम उपलब्ध होतील.
२७. मागासवर्गीय उमेदवार खुल्या प्रवर्गासाठी पात्र असल्यास ( वय व शैक्षणिक अर्हता याबाबी विचारात घेऊन) त्यांना खुल्या प्रवर्गाच्या पदांचे प्राधान्यक्रम जनरेट होतील.
२८. शासन निर्णय दिनांक ०७/०२/२०१९ अन्वये उमेदवाराची स्थानिक स्वराज्य संस्थेच्या शाळेसाठी निवड झाल्यास त्या उमेदवाराचा खाजगी शैक्षणिक संस्थेमध्ये त्याच गटातील नियुक्तीसाठी विचार केला जाणार नाही. तसेच शासन निर्णय दिनांक १३/१०/२०२३ नुसार "विविध टप्प्यांमध्ये जाहिराती येणार असल्याने उमेदवाराची एकदा निवड झाल्यानंतर असा उमेदवार पुन्हा नव्याने येणाऱ्या जाहिरातींनुसार त्याने अर्ज केल्यास निवडीसाठी याच गुणवत्तेंनुसार पूर्वी शिफारस झालेल्या गटापेक्षा वरचा गटातील अर्हतेनुसार पदांसाठी पात्र राहील.
0 Comments