शिक्षक अभियोग्यता व बुध्दीमत्ता चाचणी मधील गुणवत्तेच्या आधारे करावयाच्या मुलाखतीसह या प्रकरातील शिक्षक निवडीसाठी विहीत मुलाखत व अध्यापन कौशल्यावर आधारित 100 गुणांची घटकनिहाय विगतवारी करण्यात आली आहे. त्यामुळे खाजगी संस्थेमधील भरतीमध्ये पारदर्शकता येईल. सदर मुलाखतीचे Video चित्रीकरण करुन ठेवण्यात येणार आहे.
खाजगी संस्था - मुलाखतीसह शिक्षक भरती निवड यादी पहा. - Click Here
New Update - 02 April 2026
खाजगी संस्था - मुलाखतीसह शिक्षक भरती - 100 गुणांवर निवड प्रक्रिया, वस्तूनिष्ठ मुलाखतीसाठी मार्गदर्शक सूचना (SOP)
पवित्र' पोर्टलमार्फत होणाऱ्या शिक्षक भरती प्रक्रियेत मुलाखतीसह निवड करणाऱ्या संस्थांमध्ये वस्तुनिष्ठ मूल्यांकन होत नसल्याचे निदर्शनास आल्याने, शिक्षण विभागाने गुणांकन पद्धतीत महत्त्वपूर्ण बदल केले आहेत. त्यानुसार उमेदवारांची निवड १०० गुणांच्या एकत्रित मूल्यांकनावर आधारित केली जाणार आहे, असा निर्णय शालेय शिक्षण विभागाने घेतला आहे.
राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या; तसेच खासगी अनुदानित, अंशतः अनुदानित आणि विनाअनुदानित शाळांमधील शिक्षक भरती 'पवित्र' पोर्टलमार्फत करण्याचा निर्णय सन २०१७मध्ये उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार घेण्यात आला होता. उच्च गुणवत्ताधारक उमेदवारांची पारदर्शक पद्धतीने निवड व्हावी, या उद्देशाने ही प्रक्रिया राबवली जात आहे. सध्या संस्थांना 'मुलाखतीशिवाय' किंवा 'मुलाखतीसह' असे दोन पर्याय उपलब्ध आहेत. मुलाखतीसह पर्याय निवडल्यास १:३ या प्रमाणात उमेदवार उपलब्ध करून दिले जातात. मात्र, विद्यमान गुणांकन पद्धतीत उमेदवारांच्या पात्रतेचे सर्वकष मूल्यमापन होत नसल्याचे स्पष्ट झाले होते. त्यामुळे कोणत्याही हस्तक्षेपाशिवाय वस्तुनिष्ठ निवड सुनिश्चित करण्यासाठी सुधारित मानक कार्यपद्धती लागू करण्यात आली आहे. 06 ऑगस्ट २०२४ रोजीचे सरकारचे पत्र रद्द करून ही नवी पद्धत लागू करण्यात आली आहे.
06 ऑगस्ट 2024 पत्रान्वये निश्चित करण्यात आलेल्या मानक कार्यपध्दतीनुसार गुणांकन करुन उपलब्ध करुन देण्यात आलेल्या उमेदवारांपैकी सुयोग्य उमेदवारांची निवड संस्थेमार्फत केली जाणे अपेक्षित आहे. तथापि, सर्व उमेदवारांच्या संपादणुकीचे व पात्रतेचे योग्य मुल्यमापन या गुणांकन पध्दतीतून होत नसल्याचे निदर्शनास आले आहे. कोणत्याही हस्तक्षेपाशिवाय वस्तुनिष्ठ पध्दतीने मुल्यमापन झाल्यास सर्वाधिक पात्र उमेदवाराची निवड खात्रीशिरपणे होऊ शकते. सबब, मुलाखतीसह हा विकल्प स्वीकारणाऱ्या शैक्षणिक संस्थांना शिक्षक पदावरील नियुक्तीसाठी त्यांना उपलब्ध करुन दिलेल्या उमेदवारांपैकी सर्वात योग्य उमेदवाराची निवड करणे शक्य व्हावे यासाठी गुणदानाची प्रक्रिया निश्चित करणारी सुधारित मानक कार्यपध्दती लागू करण्याबाबतचा प्रस्ताव शासनाच्या विचाराधीन होता.
शासन निर्णय - 02 एप्रिल 2026
अधिक पारदर्शकपणे उच्च गुणवत्ताधारक उमेदवारांची शिक्षक पदावर निवड व नियुक्ती करता यावी व एकूणच शिक्षक पदभरती प्रक्रियेची विश्वासर्हता वाढावी यासाठी मुलाखतीसह हा शिक्षक पदभरतीचा विकल्प स्वीकारणाऱ्या शैक्षणिक संस्थांनी त्यांना उपलब्ध करुन देण्यात आलेल्या उमेदवारांपैकी सर्वाधिक योग्य उमेदवाराची निवड करण्यासाठी या शासन निर्णयासोबत जोडलेल्या परिशिष्टाप्रमाणे गुणांकन प्रक्रिया अवलंबविणे आवश्यक राहील.
२. सुधारित गुणांकन प्रक्रियेनुसार एकूण १०० गुणांपैकी सर्वाधिक गुण प्राप्त करणाऱ्या उमेदवाराची निवड करुन त्यास नियुक्ती देणे क्रमप्राप्त राहील.
३. उमेदवारांना समसमान गुण प्राप्त झाले असतील, अशा परिस्थितीत ज्या उमेदवाराचे वय अधिक आहे, अशा उमेदवाराची निवड करुन त्यास नियुक्ती देणे क्रमप्राप्त राहील. उमेदवारांचे वय देखील सारखे असल्यास इयत्ता १२ वी चे गुण विचारात घेण्यात यावेत.
४. संबंधित शिक्षणाधिकारी/शिक्षण उपसंचालक यांनी संबंधित संस्थेस उपलब्ध करुन देण्यात आलेल्या सर्व उमेदवारांचे विहित प्रकारे गुणांकन झाले आहे किंवा कसे, याची खातरजमा करुनच उमेदवाराच्या निवडीस व नियुक्तीस मान्यता द्यावी.
५. शिक्षक अभियोग्यता व बुध्दीमत्ता चाचणी-सन २०२५ या परीक्षेतील व यापुढे होणाऱ्या अशा परीक्षेतील गुणांच्या आधारे शिक्षक पदभरतीसाठी प्रस्तावांतर्गत गुणांकन प्रक्रिया लागू राहील.
मुलाखतीसह निवडीसाठी असे राहील नवीन गुणांकन
अ) शिक्षक अभियोग्यता बुध्दीमत्ता चाचणी - ७५ गुण
200 पैकी मिळालेल्या गुणांचे 75 पैकी गुणांत रुपांतर करुन येणारे गुण.
ब) व्यावसायिक अर्हता - कमाल 8 गुण
अ) विशेष प्राविण्यासह उत्तीर्ण असल्यास - ५ गुण
ब) प्रथम श्रेणीमध्ये उत्तीर्ण असल्यास -३ गुण
क) पास/द्वितीय श्रेणीमध्ये उत्तीर्ण असल्यास - २ गुण
ड) शिफारस केलेल्या पदासाठी आवश्यक असलेल्या व्यावसायिक अर्हतेपेक्षा अधिकची अर्हता - ३ गुण
क) शैक्षणिक अर्हता - कमाल 7 गुण
अ) विशेष प्राविण्यासह उत्तीर्ण असल्यास - ५ गुण
ब) प्रथम श्रेणीमध्ये उत्तीर्ण असल्यास - ३ गुण
क) पास/द्वितीय श्रेणीमध्ये उत्तीर्ण असल्यास - २ गुण
ड) शिफारस केलेल्या पदासाठी आवश्यक असलेल्या शैक्षणिक अर्हतेपेक्षा अधिकची अर्हता - २ गुण
ड) मुलाखत व अध्यापन कौशल्य - 10 गुण
१. मुलाखत व्यक्तिमत्व चाचणी व संभाषण कौशल्याच्या विशेष संदर्भात. - ५ गुण
२. अध्यापन कौशल्य - ५ गुण
अ) शिफारस झालेल्या विषय गटातील विषय ज्ञान, चिकित्सक ज्ञान व उपयोजन क्षमता ज्ञान - २ गुण
ब) उमेदवाराचे पाठ निरिक्षण त्यामध्ये पाठाची पूर्वतयारी, विषय मांडणी व पाठादरम्यान शैक्षणिक साहित्याचा प्रभावी वापर - 2 गुण
क) पाठामध्ये विद्यार्थ्यांचा सहभाग/प्रतिसाद, पाठाचे यशस्वी पुनरावलोकन - १ गुण
मुलाखतीसह निवडीसाठी गुणांकन PDF डाउनलोड करा. - Click Here
खाजगी संस्था - मुलाखतीसह शिक्षक भरती - 100 गुणांवर निवड प्रक्रिया, वस्तूनिष्ठ मुलाखतीसाठी संस्थासाठी मार्गदर्शक सूचना (SOP) शासन निर्णय - 02 एप्रिल 2026 डाउनलोड करा. Click Here
New Update - 06 August 2024
खाजगी संस्था - मुलाखतीसह शिक्षक भरती - 30 गुणांच्या वस्तूनिष्ठ मुलाखतीसाठी मार्गदर्शक सूचना (SOP) 30 गुणांची घटकनिहाय विगतवारी
शिक्षक अभियोग्यता व बुध्दीमत्ता चाचणी नुसार करावयाच्या मुलाखतीसह पदभरतीचा पर्याय स्विकारलेल्या खाजगी शैक्षणिक संस्थांकरिता 06 जुलै 2023 शासन निर्णयान्वये विहीत मानक कार्यपध्दतीमध्ये मुलाखत व अध्यापन कौशल्यावर आधारित ३० गुणांची घटकनिहाय विगतवारी संदर्भात मानक कार्यपध्दती (Standard Operating Procedure) विहीत करण्यात आली आहे. त्यानुसार मुलाखतीसह याप्रकारातील शिक्षक पदभरतीमध्ये अधिक पारदर्शकता येण्याकरिता व भरती प्रक्रियाबाबतची विश्वासार्हता वाढण्याच्या दृष्टीने सोबतच्या विहीत मानक कार्यपध्दतीप्रमाणे (Standard Operating Procedure) मुलाखतीसह याप्रकरातील शिक्षक पदभरतीची पुढील कार्यवाही करण्यात येणार आहे.
खाजगी संस्थांतील पात्र उमेदवारांची मुलाखतीसह या प्रकाराकरीता शिक्षक पदासाठी निवड करताना (Standard Operating Procedure) खालीलप्रमाणे ठरविण्यात येत आहे:-
१) शासन निर्णय क्र. संकीर्ण २०२३/प्र.क्र.३०२/टीएनटी-१, दि.०६.०७.२०२३ मधील मुद्दा क्र. (आ) नुसार मुलाखतीकरीता देण्यात येणाऱ्या ३० गुणांची विभागणी पुढीलप्रमाणे करण्यात यावी.
अ) उमेदवाराचे व्यक्तिमत्त्व (एकूण गुण ५) -
(i) पदाविषयीची कर्तव्यनिष्ठा -
(ii) पर्यावरणाची जाणीव -
(iii) सामाजिक भान, इत्यादी
ब) उमेदवारांचे सामान्यज्ञान (एकूण गुण ५) -
(i) चालू घडामोडी
(ii) महाराष्ट्राचा भूगोल / इतिहास
(ii) राष्ट्रीय / आंतरराष्ट्रीय समस्या, इत्यादी
क) उमेदवारांचे विषयज्ञान (एकूण गुण १०)
(i) शिफारस झालेल्या गटातील विषयाचे अद्ययावत ज्ञान -
(ii) शिफारस झालेल्या गटातील विषयाचे चिकित्सक ज्ञान-
(iii) शिफारस झालेल्या गटातील विषयाची उपयोजन क्षमता (Application ability) ज्ञान-
ड) उमेदवाराचे पाठनिरीक्षण (एकूण गुण १०) -
(i) पाठाची पूर्वतयारी- (विषयानुरूप नियोजन, वेळेचे नियोजन इत्यादी.)
(ii) पाठादरम्यान विषयाची मांडणी - (अनुरूप प्रस्तावना, विविध विषयाची सांगड, मुख्य विषयाकडे प्रवेश)
(iii) पाठादरम्यान शैक्षणिक साहित्याचा प्रभावी वापर - (गरजेनुरूप शैक्षणिक साहित्य वापर, शैक्षणिक तंत्रज्ञान वापर, फलक लेखन इत्यादी)
(iv) पाठामध्ये विद्यार्थ्यांचा परिणामकारक सहभाग / प्रतिसाद- (वर्ग नियंत्रण, चैतन्यमय वातावरण, विद्यार्थी सहभाग इ.)
(v) पाठाचे यशस्वी पुनरावलोकन (Review) - (शेवटी अध्यापन विषयाचे एकत्रीकरण, उद्दिष्टनिहाय मूल्यमापन, अध्यापनाची परिणामकारकता इत्यादी.)
२. गुणदान प्रक्रीयेचा अवलंब केल्यानंतर उमेदवारांना समान गुण प्राप्त झाल्यास, यामध्ये ज्या उमेदवारांना समान गुण असतील अशा उमेदवारांची निवड करताना पुढील प्राधान्यक्रम विचारात घेण्यात यावेः-
१. आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याच्या पाल्यास प्रथम प्राधान्य राहील.
२. समान गुणप्राप्त उमेदवारांमध्ये आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याचा पाल्य नसेल अथवा वरील अनु क्र.१ नुसार एकापेक्षा अधिक उमेदवार समान गुणप्राप्त असतील तर त्यापैकी वयाने ज्येष्ठ असलेल्या उमेदवारास प्राधान्य देण्यात यावे.
३. वरील अनु क्र. १ व २ या दोन्ही अटींमध्ये देखील समान ठरत असलेल्या उमेदवारांचे शैक्षणिक व व्यावसायिक अर्हता (इ.१२ वी/पदवी/पदव्युत्तर पदवी, डीएड/बीएड/समकक्ष) यामधील जास्त गुण प्राप्त उमेदवारास प्राधान्यक्रम देण्यात यावेत.
३. निवड प्रक्रियेत वस्तुनिष्ठता व पारदर्शकता येण्याकरीता निवड प्रक्रियेतील सर्व टप्प्यांवरील मुलाखत व अध्यापन कौशल्याची तपासणी करणे यासाठी सदर कक्ष/वर्गखोलीमध्ये सदर प्रक्रियेचे व्हिडीओ रेकॉर्डिंग करुन जतन करुन ठेवण्यात यावेत.
४. निवड प्रक्रियेचे सर्व अभिलेख तयार करुन त्यांचे जतन करुन ठेवण्यात यावेत.
सविस्तर सूचना परिपत्रक
खाजगी संस्था - मुलाखतीसह शिक्षक भरती - 30 गुणांच्या वस्तूनिष्ठ मुलाखतीसाठी मार्गदर्शक सूचना (SOP) 30 गुणांची घटकनिहाय विगतवारी , परिपत्रक डाउनलोड करा. Click Here





0 Comments