Latest Update

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

Google Search

शिक्षक भरती पवित्र पोर्टल संकेतस्थळ https://mahateacherrecruitment.org.in/ | पवित्र पोर्टल वर नाव नोंदणी कशी करावी? Flow Chart

शिक्षक भरती पवित्र पोर्टल झाले सुरु | पवित्र पोर्टल वर नाव नोंदणी कशी करावी? Flow Chart पहा. https://mahateacherrecruitment.org.in/



शिक्षक अभियोग्यता व बुद्धीमत्ता चाचणी-२०२२ नुसार शिक्षक पदभरती करण्यासाठी उमेदवारांकडून स्व प्रमाणपत्र पूर्ण करण्याबाबत.

सन २०१८ व २०१९ मध्ये झालेल्या शिक्षक पात्रता परीक्षांमध्ये (TET) गैरप्रकार केल्यामुळे महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे यांनी प्रतिबंधित केलेल्या उमेदवारांना मा. उच्च न्यायालय, मुंबई येथील याचिका (Stamp) क्र ४४३४ / २०२३, १८२४/२०२३ व खंडपीठ औरंगाबाद येथे दाखल याचीका क्र १९५३/२०२३ मध्ये दिलेल्या निर्णयानुसार शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी २०२२ या चाचणीस प्रविष्ट होता येत नसल्याचा निर्णय दिला होता. यामुळे सदर उमेदवारांना स्व-प्रमाणपत्र नोंदणी करीता सहभागी करण्यात आलेले नाही.


मा. उच्च न्यायालय, मुंबई येथील याचिका क्रमांक ११५७० / २०२३ व अन्य याचीकामधील अंतरिम आदेश दिनांक १३/०९/२०२३ तसेच खंडपीठ औरंगाबाद येथील याचिका क्र ८५३४ / २०२३ व ११७३२ / २०२३ मधील आदेश अनुक्रमे दिनांक १४.०९.२०२३ व दिनांक २०.०९.२०२३ व तसेच खंडपीठ नागपूर येथील याचिका क्र ६१६३/२०२३ व अन्य याचिकातील अंतरिम आदेशानुसार उमेदवारांना आवश्यक त्या बाबींची पूर्तता होत असल्याची खात्री संबंधित नोडल अधिकाऱ्यांनी केल्यानंतर स्व-प्रमाणन करण्याबाबत सोय उपलब्ध करून देण्याबाबतचे निर्देश मा. उच्च न्यायालयाने दिले आहेत. मा. उच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयानुसार प्राप्त होणाऱ्या अर्जांची छाननी करून पात्रता निश्चित करावयाची कार्यवाही नोडल अधिकारी यांचेकडून होणार आहे. या प्रक्रियेसाठी लागणारा वेळ विचारात घेता स्व-प्रमाणपत्र नोंदणी करणेसाठी मुदतवाढ देणे आवश्यक आहे.


करीता उमेदवारांना स्व-प्रमाणपत्र नोंदणी करणेसाठी दिनांक ३०/०९/२०२३ पर्यंत मुदतवाढ देण्यात येत आहे.


शिक्षक अभियोग्यता व बुद्धीमत्ता चाचणी-२०२२ नुसार शिक्षक पदभरती करण्यासाठी उमेदवारांकडून स्व प्रमाणपत्र पूर्ण करण्याबाबत.

१. शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी-२०२२ ही दिनांक २२/०२/२०२३ ते दिनांक ३/३/२०२३ या कालावधीमध्ये ऑनलाईन घेण्यात आलेली आहे. सदर चाचणीस २,३९,७३० उमेदवारांनी नोंदणी केली होती. त्यापैकी २,१६,४४३ उमेदवारांनी प्रत्यक्ष चाचणी दिली आहे.

२. या चाचणी दिलेल्या उमेदवारांना स्व प्रमाणपत्र तयार करण्यासाठी या पोर्टलद्वारे सुविधा देण्यात आलेली आहे.

३. उमेदवारांना स्व-प्रमाणपत्र करताना आवश्यक असणाऱ्या तपशीलवार मार्गदर्शक सूचना पोर्टल वर उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत. 

४. सन २०१८ व २०१९ मध्ये झालेल्या शिक्षक पात्रता परीक्षामध्ये गैरप्रकार केल्यामुळे महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे यांनी प्रतिबंधित केलेल्या उमेदवारांना मा उच्च न्यायालय, मुंबई येथील याचिका (Stamp) क्र ४४३४ / २०२३ १८२४ / २०२३ व खंडपीठ औरंगाबाद येथे दाखल याचीका क्र १९५३ / २०२३ मध्ये दिलेल्या निर्णयानुसार शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी २०२२ या चाचणीस प्रविष्ट होता येत नसल्याचा निर्णय दिला आहे. यामुळे सदर उमेदवारांनी सहभागी होऊ नये, ते सहभागी झाल्याचे निदर्शनास आल्यास त्यांची कोणत्याही टप्प्यावर उमेदवारी रद्ध होईल, याची उमेदवारांनी नोंद घ्यावी.

५. शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी २०२२ परीक्षा केवळ एक वेळ देण्याची तरतूद आहे. उमेदवारांना चाचणी परीक्षेचे प्रवेशपत्र वितरीत करताना चाचणीसाठी एकापेक्षा अनेक प्रवेश पत्र प्राप्त झाल्यास केवळ एकाच प्रवेश पत्राद्वारे चाचणीस प्रविष्ट होण्याबाबत सूचित करण्यात आले होते, असे असतानाही काही उमेदवार एकापेक्षा जास्त वेळा चाचणीस प्रविष्ट झाल्याचे निदर्शनास आले आहे. असे एकापेक्षा जास्त वेळा चाचणीस प्रविष्ट झालेल्या उमेदवारांना निवड प्रक्रियेच्या कोणत्याही टप्प्यावर ते सहभागी करून घेता येणार नाही. यामुळे सदर उमेदवारांनी सहभागी होऊ नये, सहभागी झाल्याचे निदर्शनास आल्यास त्यांची कोणत्याही टप्यावर उमेदवारी रद्ध होईल, याची उमेदवारांनी नोंद घ्यावी.

६. उमेदवारांना स्व प्रमाणपत्र पूर्ण करण्यासाठी दिनांक ०१/०९/२०२३ ते दिनांक १५/०९/२०२३ पर्यंत मुदत देण्यात आली होती. आता ही मुदत वाढविण्यात आली असून दि. 22-09-2023 पर्यंत नोंदणी करता येईल. 

शिक्षक भरती वेळापत्रक पहा. 


७. ज्या उमेदवारांच्या TET /CTET च्या माहितीमध्ये तफावत येईल अशा उमेदवारांना राज्यातील आपण निवड केलेल्या जिल्ह्याचे शिक्षणाधिकारी प्राथमिक यांचेकडून सदर उमेदवार आपणच असल्याचे सिद्ध करण्यासाठी विनंती अर्ज, ओळखीच्या पुरावा व सबंधित कागदपत्रे यासह संपर्क साधावा. सदरची सुविधा लवकरच देण्याबाबत स्वतंत्रपणे पोर्टलवर सूचना प्रसिद्ध करण्यात येईल.

८. सन २०१९ मध्ये पवित्र पोर्टलमार्फत दिनांक ९/८/२०१९ रोजी प्रसिद्ध झालेल्या यादीतील अपात्र, गैरहजर, रुजू न झालेले व माजी सैनिक यांच्या रिक्त राहिलेल्या जागांकरीता गुणवत्तेनुसार पुढील उमेदवारांसाठी यादी प्रसिद्ध करावयाची आहे, त्यासाठी जिल्ह्याकडील माहिती प्राप्त झाली आहे. त्यानुसार पुढील प्रक्रिया करण्यात येणार आहे, याबाबतच्या स्वतंत्र सूचना देण्यात येतील.

९. प्रमाणपत्र करण्यासाठी अडचण आल्यास edupavitra2022@gmail.com या इमेल वर संपर्क साधता येईल.

स्व प्रमाणपत्र तयार करण्यासाठी सूचना PDF डाउनलोड करा. Click Here


Pavitra - Teacher Recruitment 2022 website



पवित्र पोर्टल संकेतस्थळ

https://mahateacherrecruitment.org.in/


Pavitra Portal Website

https://mahateacherrecruitment.org.in/


पवित्र पोर्टलवर नावनोंदणी कशी करावी? स्व प्रमाणपत्र कसे करावे? Flow chart पहा. 

Post a Comment

0 Comments

close