Latest Update

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

पवित्र पोर्टल शिक्षक भरती 2022-23 व संच मान्यता 2022-23 बाबत वेळापत्रक

संचमान्यता 2022-23 व शिक्षक पदभरती 2023 बाबत वेळापत्रक निश्चित करणेबाबत.... 

मा. उच्च न्यायालय, खंडपीठ औरंगाबाद येथे सुमोटो याचिका क्रमांक ०२/२०२२, दि रजिस्ट्रार ज्युडीसियल बेंच औरंगाबाद विरुध्द महाराष्ट्र शासन दाखल आहे. सदर याचिकेमध्ये दि. १७/०४/२०२३ रोजी मा. न्यायालयाने खालील प्रमाणे निर्देश दिलेले आहेत.

As such, we are listing this PIL on 28/4/2023 at 04.00 pm, to enable to learned AGP to make a statement considering that the next academic year of schools would commence from the second week of june, 2023.

75 हजार पदभरती बाबत शासन परिपत्रक - Click Here




संच मान्यता 2022-23 अपडेट - Click Here


शिक्षक भरतीचा कालबद्ध कार्यक्रम

जाहिरात 15/8/2023 to 31/08/2023
प्राधान्य क्रम - 01/09/23 ते 15/09/2023
निवड झालेल्या उमेदवारांची यादी -  10/10/2023
कागदपत्रे तपासणी व नियुक्त्या 11/10/2013 ते 21/10/2023
निवड झालेल्या उमेदवारांची counselling - 21/10/2023  ते  24/10/2023

मा. न्यायालयाचे उपरोक्त निर्देश पाहता दिनांक २४/०३/२०२३ रोजी शिक्षक अभियोग्यता व बुध्दिमत्ता चाचणी २०२२ रोजीच्या निकालानंतरची शिक्षक पदभरतीची कार्यवाही सुरु करणे आवश्यक आहे. याबाबतची सध्यस्थिती खालीलप्रमाणे सादर करण्यात येत आहे.

१. संदर्भीय क्रमांक २ चा शासन निर्णय दिनांक १०/११/२०२२ अन्वये सन २०२३ मध्ये झालेल्या शिक्षक अभियोग्यता व बुध्दिमत्ता चाचणीनुसार येणाऱ्या पदभरतीच्या जाहिरातीसाठी उमेदवारांचे वय कोविड- १९ च्या पार्श्वभूमीवर २ वर्षासाठी शिथिलक्षम करण्यात आलेले आहे.


२. शिक्षक अभियोग्यता व बुध्दिमत्ता चाचणी २०२२ रोजीच्या निकालानंतर होणाऱ्या पदभरतीसाठी आवश्यकतेनुसार तीन महिन्यातुन एकदा व्यवस्थापनाकडून पोर्टलवर रिक्त पदांसाठीच्या जाहिराती घेण्यात येतील. या कालावधीमध्ये प्राप्त जाहिरातीमधुन पात्र उमेदवारांची व्यवस्थापननिहाय यादी नियुक्तीच्या शिफारसीसाठी यादी प्रसिध्द करण्यात येईल.


३. कोविड-१९ च्या पार्श्वभुमीवर सन २०१९-२० पासून शाळांच्या संच मान्यता जैसे थे ठेवण्यात आलेल्या होत्या. आता कोविड- १९ नंतर झालेले विद्यार्थ्याचे स्थलांतर, परिस्थितीतील बदल इत्यादी बाबी विचारात घेवून तसेच जनहित याचिका क्रमांक १०२ / २०२१ मध्ये दिनांक ०१/०८/२०२२ रोजीच्या आदेशानुसार समिती गठीत करण्यात आलेली होती, सदर समितीच्या शिफारशीच्या आधारे उपाय योजना करण्याच्या अनुषंगाने शासनाने शासन निर्णय दिनांक ०६/०२/२०२३ अन्वये प्रत्यक्ष प्रवेशित विद्यार्थी संख्या निश्चित करण्यासाठी "आधार" वैध विद्यार्थी संख्या विचारात घेवून सन २०२२-२३ ची शिक्षक निश्चितीसाठी संच मान्यता करण्यात येत आहे. सद्यस्थितीत आधार वैध विद्यार्थी संख्येवर आधारित अंतरिम संच मान्यता करण्यात आलेल्या आहेत. आधार वैधतेची कार्यवाही पुर्ण झालेली नाही अशी विद्यार्थी वैधतेची कार्यवाही शाळास्तरावर सुरु आहे. ही कार्यवाही पुर्ण झाल्यानंतर अंतरिम करण्यात आलेल्या संच मान्यता दिनांक १५/०५/२०२३ पर्यंत अंतीम करण्याचे नियोजन आहे.


या अंतीम झालेल्या संच मान्यतांतील मंजूर पदांनुसार पदभरतीची कार्यवाही करणे आवश्यक आहे. ज्या ज्या व्यवस्थापनांकडून संच मान्यता २०२२-२३ ची कार्यवाही अंतीम होईल त्या त्या व्यवस्थापनांनी त्यांचेकडील शिक्षक पदांची बिंदुनामावली प्रमाणित करुन पवित्र पोर्टलवर रिक्त पदांचे जाहिरात देण्याबाबतचे निर्देश देणे आवश्यक आहे. याकरीताचे संभाव्य नियोजन पुढीलप्रमाणे सादर करण्यात येत आहे. शालेय शिक्षण


अ) संच मान्यता अंतीम करुन संच मान्यतेचे शाळानिहाय वितरण करण्यासाठी लागणारा एकुण संभाव्य कालावधी दि. २०/०५/२०२३ पर्यंत.


ब) संच मान्यता अंतीम झाल्यानंतर व्यवस्थापनाकडून बिंदु नामावली इत्यादी प्रमाणित करण्यासाठी लागणारा संभाव्य कालावधी दिनांक ३०/०६/२०२३ पर्यत.


क) शिक्षकांच्या रिक्त पदांची पोर्टलवर नोंद करणे (पहिल्या तिमाहीकरिता) - सुमारे १५/०७/२०२३ पर्यंत. 


ड) पहिल्या तिमाहीकरिता प्राप्त जाहिरातीनुसार मुलाखतीशिवाय व मुलाखतीसह पदभरतीसाठी पात्र उमेदवारांकडून प्राधान्यक्रम घेणे, नियुक्तीसाठी शिफारस करणे इत्यादी बाबी पोर्टलमार्फत करणे- दिनांक २०/०८/२०२३ पर्यंत. दरम्यानच्या कालात दुसऱ्या तिमाहीकरीता शिक्षकांच्या रिक्त पदांची नोंद करणे.


तथापि, मागील शिक्षक पदभरतीतील जाहिरातीतील १२०७० पैकी मुलाखतीशिवाय पदभरतीमध्ये ५९७० उमेदवारांची शिफारस झालेली आहे व मुलाखतीसह पदभरतीमध्ये १९३३ रिक्त पदांसाठी शिफारस झालेली असून एकुण ७९०३ रिक्त पदभरतीची कार्यवाही झालेली आहे. सध्यस्थितीत १९६ व्यवस्थापनांना एसईबीसी आरक्षणामुळे निवड प्रक्रिया पूर्ण न झालेल्या व्यवस्थापनाची निवड प्रक्रिया अंतीम टप्प्यात असून व्यवस्थापनांना मुलाखतीसाठी माहे मे २०२३ मध्ये उमेदवार उपलब्ध होणार आहेत यातुन ७६९ रिक्त पदे भरली जातील. तसेच याचिका क्र ११०८१/२०१९ मधील समांतर आरक्षणातील उमेदवारांना संधी देण्यासाठी शासन पत्र दिनांक १९/०४/२०२३ अन्वये स्थानिक स्वराज्य संस्थांतील अपात्र, गैरहजर, रुजू न झालेल्यांमुळे रिक्त राहिलेल्या पदांसाठी उमेदवारांना शिफारस करण्यास शासनाने परवानगी दिलेली आहे त्यामुळे या स्थानिक स्वराज्य संस्थातील अंदाजे ७५० रिक्त पदे भरली जाणार आहेत.


वर नमुद केल्याप्रमाणे शिक्षक पदभरतीचे मागील पदभरतीतील शिल्लक असलेले साधारणपणे १५०० रिक्त जागा तसेच शिक्षक अभियोग्यता व बुध्दिमत्ता चाचणी- २०२२ नुसार होणाऱ्या पदभरतीचे नियोजनाची वस्तुस्थिती मा. न्यायालयाच्या अवलोकनी आणण्यासाठी वस्तुस्थिती सादर करण्यात येत आहे.

Post a Comment

0 Comments

close