Latest Update

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

10वी, 12वी निकाल अपडेट | 05 मे रोजी बारावी निकाल, तर दहावीचा मे अखेरीस लागणार निकाल

उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षा बारावीचा निकाल व माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षा दहावी चा निकाल बाबतचे अपडेट जाणून घेऊया. 1


बारावीचा निकाल पाहण्यासाठी वेगवेगळ्या 7 वेबसाइट - Click Here

दहावीचा निकाल पाहण्यासाठी वेगवेगळ्या 7 वेबसाइट - Click Here


12वी निकाल अपडेट 2025


राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून घेतलेल्या फेब्रुवारी-मार्च 2025 च्या दहावी आणि बारावी च्या परीक्षांचे निकाल लवकरच जाहीर होण्याची शक्यता!
10 मेपूर्वी निकाल लागण्याची शक्यता मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी व्यक्त केली होती. 

New update

इयत्ता 12वी निकाल 2025 हा  05 मे 2025 रोजी जाहीर करण्यात येणार आहे. 

बारावीचा निकाल पाहण्यासाठी वेगवेगळ्या 7 वेबसाइट - Click Here

12th Result Official website 





10वी, 12वी निकाल अपडेट 2025

दहावी-बारावीच्या निकालाची तयारी आता युद्धपातळीवर सुरु असून ९० टक्के कामकाज पूर्ण झाले आहे. पहिल्यांदा बारावीचा निकाल 10 मे 2025 रोजी जाहीर झाला. तर दहावीचा निकाल 25 मे रोजी जाहीर करण्यात येवू शकतो.

पुणे बोर्डाच्या माध्यमातून फेब्रुवारी-मार्च महिन्यात दहावी-बारावीची परीक्षा पार पडली होती. कोरोनानंतर पहिल्यांदाच पूर्वीप्रमाणेच परीक्षा घेण्यात आली, पण त्यावेळी कॉपीमुक्त परीक्षेसाठी 'नांदेड पॅटर्न' राबविला. त्यामुळे निश्चितपणे कॉपी प्रकरणांमध्ये मोठी घट झाल्याचे पहायला मिळाले. परीक्षेनंतर शिक्षकांनी मुदतीत उत्तरपत्रिकांची तपासणी केली आहे.

सर्व उत्तरपत्रिकांची तपासणी झाल्यावर आता निकालाची तयारी सुरु झाली आहे. बोर्डाकडून निकालाच्या दृष्टीने आवश्यक ९० टक्क्यांपर्यंत काम पूर्ण झाल्याची माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली. 

दहावी-बारावीनंतर पुढील प्रवेशासाठी विलंब होणार नाही, याची खबरदारी बोर्डाकडून घेतली जात आहे. त्याअनुषंगाने निकाल वेळेत लागावेत, असे नियोजनही बोर्डाने केले आहे. पहिल्यांदा बारावीचा निकाल जाहीर होणार आहे.


बारावीचा निकाल पाहण्यासाठी वेगवेगळ्या 7 वेबसाइट - Click Here


निकालानंतर प्रवेश प्रक्रिया

यंदापासून नवीन राष्ट्रीय धोरणाची अंमलबजावणी राज्यातील सर्वच अकृषिक विद्यापीठांमध्ये होणार आहे. त्यामुळे बारावीनंतरचे शिक्षण आता त्या धोरणानुसारच घ्यावे लागणार आहे. त्याचीही तयारी युद्धपातळीवर सुरु झाली आहे. 

बारावीच्या निकालानंतर विद्यार्थ्यांच्या प्रवेशाला काही दिवसांचा अवधी मिळणार आहे. साधारणत: ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यापासून विद्यापीठांचे नवीन शैक्षणिक वर्ष सुरू होईल. 

विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होणार नाही, याची दक्षता घेत बोर्डाने आता निकालाची तयारी युद्धपातळीवर सुरु केल्याचेही सांगण्यात आले.

Post a Comment

0 Comments

close