NEET UG Exam 2025 admit card Link - नॅशनल टेस्टिंग एजन्सी (NTA) ने नॅशनल एलिजिबीलिटी कम एन्ट्रन्स टेस्ट 2025 (NEET 2025) परीक्षेची तारीख जाहीर केली आहे. प्रसिद्धीपत्रकानुसार, NEET (UG) परीक्षा रविवार, 04 मे 2025 रोजी आयोजित केली जाणार आहे. सदर परीक्षेची प्रवेशपत्रे admit card डाउनलोड साठी उपलब्ध करण्यात आलेली आहेत.
NEET परीक्षेच्या मागील वर्षीच्या प्रश्नपत्रिका कशा डाउनलोड कराल? Click Here
NEET EXAM 2025 ॲडमिट कार्ड विषयी महत्त्वाच्या सूचना
1. ॲडमिट कार्डच्या दोन प्रिंट काढा (शक्यतो कलर व A4 साईज पेपर वरती). त्यातील एक प्रिंट ऍडमिशन प्रोसेस वेळी लागेल.
2. विद्यार्थ्याचा Passport size photo ॲडमिट कार्डच्या Page 1 वर दिलेल्या जागी पेस्ट करणे.
3. विद्यार्थ्यांचा डाव्या हाताच्या अंगठ्याचा ठसा दिलेल्या जागी उठवा.
4. अंडरटेकिंग मध्ये विद्यार्थ्यांनी आपले नाव व गावाचे नाव लिहावे.
५. विद्यार्थ्यांची सही एक्झाम हॉल मध्ये गेल्यानंतर करायची आहे, त्यामुळे सुरुवातीस करू नये.
६. विद्यार्थ्याचा Postcard size फोटो ॲडमिट कार्डच्या Page 2 वर दिलेल्या जागी पेस्ट करणे. व त्यावर डाव्या साईडला क्रॉस Signature करावे.
नीट पपरीक्षेला जाताना सोबत आवश्यक असणाऱ्या गोष्टी
१) ॲडमिट कार्ड (All Pages)
२) पासपोर्ट साईज फोटो (जास्त कॉपीज सोबत ठेवाव्यात)
३) ओरिजनल आयडेंटीटी कार्ड (आधार कार्ड/बारावी बोर्ड ॲडमिट कार्ड)
५) ट्रान्सपरंट वॉटर बॉटल
६) ट्रान्सपरंट ब्लॅक बॉल पेन
NEET UG Exam साठी महत्त्वाच्या सूचना
१. विद्यार्थ्यांनी ॲडमिट कार्ड मध्ये दिलेल्या रिपोर्टिंग टाइमिंग च्या अगोदर पोहोचावे.
२. प्रत्येकासाठी रिपोर्टिंग टाइमिंग वेगळे आहे.
३. वरील दिलेल्या सर्व गोष्टी सोबत घेऊन जाव्यात.
४. ॲडमिट कार्ड वरील दिलेल्या सर्व सूचना व्यवस्थित वाचाव्यात.
५. परीक्षेच्या अगोदर सेंटर बद्दल माहिती घ्यावी.
६. बाहेरगावच्या विद्यार्थ्यांनी शक्यतो अगोदरच्या दिवशी सेंटर वरती पोहोचावे.
(अधिक माहितीसाठी ॲडमिट कार्ड वरील सूचना व्यवस्थित वाचाव्यात.)
NEET EXAM साठीचा ड्रेस कोड
१. ड्रेस हाफ स्लिव्हज् असावा.
२. मुलींनी पंजाबी ड्रेस किंवा शर्ट पॅन्ट घालावे.
३. कोणत्याही इलेक्ट्रॉनिक्स वस्तू, घड्याळ वापरण्यास बंदी आहे.
४. ड्रेस वरती एम्ब्रोईडरी किंवा डिझाईन नसावे. मोठे बटन सुद्धा नसावेत.
५. ड्रेस साधा असावा. भरपूर पॉकेट्स नसावेत.
६. ज्वेलरी नसावी.
७. शूज वापरू नयेत. चप्पल साध्या असावेत. चपला चा सोल हा जाड नसावा.
८. बेल्ट वापरू नये.
EXAM संपल्यानंतर
१. आपले पासपोर्ट साईज फोटो अटेंडन्स शिट वरती चिकटावेत.
२. आपले एडमिट कार्ड एक्झाम संपल्यावर सुपरवायझर कडे जमा करायचे आहे.
0 Comments