Latest Update

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

10वी, 12वी निकाल अपडेट | पेपर चेक झाले, 21 किंवा 22 मे रोजी बारावी निकाल, तर दहावीचा मे अखेरीस लागणार निकाल

उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षा बारावीचा निकाल व माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षा दहावी चा निकाल बाबतचे अपडेट जाणून घेऊया.


बारावीचा निकाल पाहण्यासाठी वेगवेगळ्या 7 वेबसाइट - Click Here

दहावीचा निकाल पाहण्यासाठी वेगवेगळ्या 7 वेबसाइट - Click Here


10वी, 12वी निकाल अपडेट 2024



पेपर चेक झाले, मे अखेरीस लागणार निकाल

राज्य शिक्षण मंडळाच्या सर्व विभागीय मंडळांनी इयत्ता दहावी आणि बारावी परीक्षेच्या उत्तरपत्रिका तपासणीचे काम जवळपास पूर्ण केले आहे. गुणपत्रिका तयारीचे काम सुरू असून, मे महिन्याच्या अखेरीस दहावी आणि बारावीचा निकाल जाहीर करण्यासाठी प्रयत्नशील आहोत, अशी माहिती राज्य मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी दिली.
दहावी परीक्षेदरम्यान निवडणुकीची आचारसंहिता जाहीर झाली. त्यामुळे शिक्षकांना प्रशिक्षण आणि प्रत्यक्षात मतदान प्रक्रियेत ड्युटीही बजावावी लागली. मात्र, अशा परिस्थितीतही अधिकारी, शिक्षकांनी मेहनत घेत उत्तरपत्रिका तपासणीचे काम वेळेत पूर्ण केले, असे गोसावी म्हणाले.


निवडणुकीच्या कामात शिक्षक वर्ग गुंतलेला असल्यामुळे उत्तरपत्रिकांची तपासणी पूर्ण करणे आव्हानात्मक होते. मात्र, निकाल वेळेत जाहीर व्हावा, यासाठी आठवड्यातून दोन वेळा व्हीसीद्वारे बैठक घेत विभागीय मंडळाच्या अधिकाऱ्यांकडून आढावा घेतला. विभागीय मंडळातील अधिकारी आणि शिक्षकांनी वेळेत काम पूर्ण केले आहे.

शरद गोसावी, अध्यक्ष, राज्य मंडळ



10वी, 12वी निकाल अपडेट 2023

दहावी-बारावीच्या निकालाची तयारी आता युद्धपातळीवर सुरु असून ९० टक्के कामकाज पूर्ण झाले आहे. पहिल्यांदा बारावीचा निकाल 25 मे 2023 रोजी जाहीर झाला. तर दहावीचा निकाल 02 जून रोजी जाहीर करण्यात येणार आहे.

पुणे बोर्डाच्या माध्यमातून फेब्रुवारी-मार्च महिन्यात दहावी-बारावीची परीक्षा पार पडली होती. कोरोनानंतर पहिल्यांदाच पूर्वीप्रमाणेच परीक्षा घेण्यात आली, पण त्यावेळी कॉपीमुक्त परीक्षेसाठी 'नांदेड पॅटर्न' राबविला. त्यामुळे निश्चितपणे कॉपी प्रकरणांमध्ये मोठी घट झाल्याचे पहायला मिळाले. परीक्षेनंतर शिक्षकांनी मुदतीत उत्तरपत्रिकांची तपासणी केली आहे.

सर्व उत्तरपत्रिकांची तपासणी झाल्यावर आता निकालाची तयारी सुरु झाली आहे. बोर्डाकडून निकालाच्या दृष्टीने आवश्यक ९० टक्क्यांपर्यंत काम पूर्ण झाल्याची माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली. 

दहावी-बारावीनंतर पुढील प्रवेशासाठी विलंब होणार नाही, याची खबरदारी बोर्डाकडून घेतली जात आहे. त्याअनुषंगाने निकाल वेळेत लागावेत, असे नियोजनही बोर्डाने केले आहे. पहिल्यांदा बारावीचा निकाल जाहीर होणार आहे.


बारावीचा निकाल पाहण्यासाठी वेगवेगळ्या 7 वेबसाइट - Click Here


निकालानंतर प्रवेश प्रक्रिया

यंदापासून नवीन राष्ट्रीय धोरणाची अंमलबजावणी राज्यातील सर्वच अकृषिक विद्यापीठांमध्ये होणार आहे. त्यामुळे बारावीनंतरचे शिक्षण आता त्या धोरणानुसारच घ्यावे लागणार आहे. त्याचीही तयारी युद्धपातळीवर सुरु झाली आहे. 

बारावीच्या निकालानंतर विद्यार्थ्यांच्या प्रवेशाला काही दिवसांचा अवधी मिळणार आहे. साधारणत: ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यापासून विद्यापीठांचे नवीन शैक्षणिक वर्ष सुरू होईल. 

विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होणार नाही, याची दक्षता घेत बोर्डाने आता निकालाची तयारी युद्धपातळीवर सुरु केल्याचेही सांगण्यात आले.

Post a Comment

0 Comments

close