Latest Update

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

Google Search

संच मान्यता 2022-2023 उपलब्ध | Sanch Manyata 2022-23 available | संचमान्यता 2022-23 कशी पहावी?

सन 2022-2023 च्या संचमान्यतेसाठी 30 नोव्हेंबर 2022 पर्यंतची ऑनलाईन पटसंख्या विचारात घेतली जाणार आहे. संच मान्यता 2022-23 साठी 1-12-2022 रोजीची कार्यरत शिक्षकांची माहिती भरण्यात आलेली होती. आता वैध आधार वर आधारित संच मान्यता शाळांना वाटप सुरु करण्यात येत आहे. 



New Update 25 August 2023


New Update 03 July 2023

विषय : संच मान्यता 2022-23 चे कामकाज गटशिक्षणाधिकारी यांचेकडून 7 जूलै 23 पर्यंत करून घेणेबाबत

      ज्या शाळांचे आधार Validation हे ९०% पेक्षा जास्त झालेले आहे परंतु  शाळेतील उर्वरित 10%% विद्यार्थी Invalid /Unprocessed मध्ये आहेत काही तांत्रिक कारणास्तव त्या 10% विद्यार्थ्यांची आधार माहिती वैध होत नाहीत असे विद्यार्थी सन २०२२-२३ या वर्षाच्या संच मान्यतेकरीता विचारात घेण्याची सुविधा गटशिक्षणाधिकारी यांच्या लॉगीन मध्ये दिलेली आहे. ही सुविधा फक्त 7 जूलै २०२३ पर्यंत उपलब्ध असणार आहे. 7 जूलै २०२३ नंतर संच मान्यता ह्या अंतिम केल्या जाणार आहेत. 

त्यामुळे आपल्या विभागातील शाळांचे त्यांच्या १०% आधार वैध न झालेल्या संख्येमुळे त्यांच्या गतवर्षीच्या मंजूर पदामध्ये फरक पडत असेल  तरच अशा १०% अवैध आधार असलेले विद्यार्थी शाळेत नियमित उपस्थित आहेत व ते इतरत्र कुठे हि प्रवेशित नाहीत याचे पुरावे आपल्या केंद्रप्रमुख व विस्तार अधिकारी यांच्या मार्फत आपल्या गटशिक्षणाधिकारी कार्यालयास देऊन असे विद्यार्थी संच मान्यतेस गृहीत धरण्याची प्रक्रिया त्यांच्या लॉगिन मधील संच मान्यता approval 2022-23 टॅब मधून 7 जुलै 2023 पर्यंत पूर्ण करण्यास आपल्या तालुक्याच्या गटशिक्षणाधिकारी यास सूचित करावे संबंधित सुविधेचा लाभ 7 जुलै 2023 पर्यंतच असणार आहे त्यामूळे आपल्या विभागातील गटशिक्षणाधिकारी यांच्याकडून संबंधित कामकाज करून घ्यावे. याबाबत सर्व शिक्षण अधिकारी यांना सूचित करण्यात आले आहे. 

सोबत गतवर्षीची संच मान्यता प्रत पाहून कामकाज करण्यास सांगावे पद कमी होत असलेल्या शाळेसाठीच सदर सुविधेचा वापर करण्यास सूचित करावे


                         डॉ. वंदना वाहूळ

                       शिक्षण उपसंचालक,

            माध्यमिक व उच्च माध्यमिक, पुणे

संचमान्यता 2022-23 वितरित करणेबाबत जि. प. पुणे परिपत्रक - Click Here

वरील प्रमाणे ज्या शाळांच्या संचमान्यता अद्याप ही दुरुस्त झालेल्या नाहीत किंवा वरील कारणामुळे राहिल्या असतील  त्यांनी वरील सूचनेनुसार त्या शाळांनी ताबडतोब दुरुस्ती बाबत संबंधित अधिकारी यांना संपर्क करावा. 


संच मान्यता 2022-23 ही आधार वैध असलेल्या विद्यार्थी संख्येवर करण्यात येणार असून विद्यार्थ्यांचे आधार ची माहिती 15 जून पर्यंत पूर्ण करण्यास मुदतवाढ देण्यात आली आहे. त्यानंतर कोणत्याही परिस्थितीत मुदतवाढ दिली जाणार नाही. 15 जून नंतर शाळांना संच मान्यता वितरित केल्या जातील. शिक्षक कमी झाल्यास सर्वस्वी मुख्याध्यापक जबाबदार राहणार आहे. 

16 जून पासून वैध आधार वर आधारित संच मान्यता वितरण सुरु करण्यात आलेले आहे. सदर संच मान्यता 2022-23 शाळांच्या लॉगीन वर उपलब्ध करुन देण्यात येत आहेत. 
 

संचमान्यता पोर्टल लॉगीन - Click Here

Sanch Manyata Portal Login - Click Here

Student Portal login Click Here


संच मान्यता 2022-23 कशी पहावी? 


Step 1
संच मान्यता पोर्टल वर लॉगीन करा. 

संचमान्यता पोर्टल लॉगीन - Click Here


Step 2  pop up window ला ok करा. 

Step 3 डाव्या बाजूकडील sanctioned post / SM over status ला टच करुन संच मान्यता पाहू शकता. 


Step 3.1 Sanctioned post 

Sanctioned post येथे टच केल्यास संचमान्यता 2022-23 अंतर्गत मंजूर पदे दिसून येतील.

आपल्या शाळेची संच मान्यता 2022-23 अशाप्रकारे दिसेल. खालील image पहा. 

यामध्ये Sanctioned teachings post 2021-22 मध्ये मागील वर्षी मंजूर असणारी पद संख्या ची माहिती दिसेल. 

तर Sanctioned teaching post 2022-23 मध्ये या वर्षी संच मान्यता नुसार मंजूर पदे दिसून येतील. 

 

संच मान्यता नियमावली PDF - Click Here

Join WhatsApp Group

Step 3.2 SM over status

SM over status येथे टच केल्यास संच मान्यतेबाबत  सद्यस्थिती (Status)  दिसून येईल. 

SM is over म्हणजे संच मान्यता पूर्ण झाली आहे. 




 


संच मान्यता 2022-2023 बाबत शासन परिपत्रक डाउनलोड करा. Click Here


संचमान्यता पोर्टल लॉगीन - Click Here

Sanch Manyata Portal Login - Click Here

Student Portal login Click Here


सन 2022-2023 च्या संच मान्यते बाबत विभागीय कार्यशाळा / शिबीर आयोजित करणेबाबत परिपत्रक 
शिबीर कालावधी - 12 एप्रिल ते 20 एप्रिल
विभागनिहाय वेळापत्रक पहा. 👇
वरील परिपत्रक डाउनलोड करा. Click Here


शैक्षणिक वर्ष 2021-22 ची संच मान्यता उपलब्ध करून दिले बाबत


शैक्षणिक वर्ष सन २०२१-२२ ची तात्पुरती संच मान्यता दिनांक १४.०६.२०२१ च्या शासन पत्रान्वये आधार क्रमांक असलेले विद्यार्थी गृहीत धरून करण्याचे निर्देश होते. त्यानुसार राज्यातील सर्व शाळांची तात्पुरती संच मान्यता दिनांक ३०.१२.२०२१ रोजीच्या आधार क्रमांक नोंद असलेल्या विद्यार्थी संख्येच्या आधारे करण्यात आलेली होती.

शासनाच्या संदर्भ क्रमांक ०२ च्या निर्देशान्वये दिनांक २८.०२.२०२२ चे पत्र रद्द करून सन २०२१-२२ च्या संच मान्यता या सन २०२०-२१ च्या संच मान्यताप्रमाणेच कायम ठेवाव्यात असे शासन आदेश आहेत. त्यामुळे सन २०२१-२२ च्या संच मान्यता शिक्षणाधिकारी लॉगीनला उपलब्ध करून देण्यात आलेल्या असून आपण आपल्या स्तरावरून सर्व शाळांना वितरीत करण्याची कार्यवाही करावी.

संचमान्यता पोर्टल लॉगीन - Click Here

Sanch Manyata Portal Login - Click Here

Student Portal login Click Here


तसेच आपल्या व शाळा स्तरावर Mis Match व Invalid Aadhar असलेल्या विद्यार्थ्यांची माहिती उपलब्ध करून दिलेली आहे. तरी सदर विद्यार्थ्यांचे valid आधार क्रमांक तातडीने update करावे.



Post a Comment

0 Comments

close