Latest Update

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

निपुण महाराष्ट्र अभियानाअंतर्गत शालेय विद्यार्थ्यांची पायाभूत साक्षरता व संख्याज्ञान क्षमता पुनर्चाचणी आयोजन करणेबाबत...

निपुण महाराष्ट्र अभियानाअंतर्गत शालेय विद्यार्थ्यांची पायाभूत साक्षरता व संख्याज्ञान क्षमता पुनर्चाचणी आयोजन करणेबाबत परिपत्रक जाहीर. पुनर्चाचणी आयोजन करणेबाबत महत्त्वाच्या सूचना अवश्य पहा.



राष्ट्रीय शिक्षण धोरण सन २०२० नुसार प्राथमिक स्तरावर सन २०२६-२७ पर्यंत पायाभूत व संख्याज्ञान कौशल्ये प्राप्त करण्यास प्राधान्य देण्यात आले आहे. यासाठी भारत सरकारने निपुण भारत अभियान सुरु केले आहे. या महत्वकांक्षी अभियानांतर्गत प्रत्येक विद्यार्थ्याने इयत्ता दुसरीपर्यंत पायाभूत साक्षरता आणि संख्याज्ञान सन २०२७ पर्यंत प्राप्त करणे अपेक्षित आहे. याकरिता सद्यास्थितीत प्राथमिक स्तरावरील विद्यार्थ्यांना पायाभूत साक्षरता प्राप्त करण्यात विशेष प्रयत्न करण्याची आवश्यकता असल्याचे निदर्शनास आल्याने इ. दुसरी ते पाचवीच्या सर्व विद्यार्थ्यांसाठी पायाभूत साक्षरता व संख्याज्ञान (FLN) निपुण महाराष्ट्र अभियान राबविण्यात येत असून या अंतर्गत मार्च २०२५ ते जून २०२५ दरम्यान राज्यातील सर्व शासकीय व अनुदानित शाळांच्या शिक्षकांनी विद्यार्थ्यांची अध्ययन स्तर चाचणी घेऊन त्याची माहिती VSK वर भरण्यात आलेली आहे.


उपरोक्त विषयास अनुसरून, राज्यातील सर्व जिल्ह्याचे शिक्षणाधिकारी (प्राथमिक) व प्राचार्य (डाएट) यांनी समन्वयाने आपल्या जिल्ह्यातील शिक्षण विभागातील अधिनस्त यंत्रणेला शक्यतो समान स्वरुपात शाळा नेमून द्याव्यात. यामध्ये आपल्या जिल्ह्यातील शिक्षणाधिकारी (माध्यमिक व योजना) यांचा व अधिनस्त यंत्रणेचा देखील समावेश करावा, शक्यतो प्रत्येक पर्यवेक्षकाला एकाच परिसरातील किंवा मार्गातील शाळा नेमून दिल्यास कामाची गती वाढवता येईल. 

पर्यवेक्षीय अधिकारी व त्यांना नेमून दिलेल्या शाळांची यादी सोबत जोडलेल्या प्रपत्र क्र १ नुसार तयार करावी, पर्यवेक्षक यंत्रणेतील अधिकाऱ्यांनी आपणास नेमून दिलेल्या प्रत्येक शाळेला प्रत्यक्ष भेट देऊन या शाळांमधील इयत्ता दुसरी ते पाचवीच्या, प्रत्येक तुकडीतील निवडक विद्यार्थ्यांची पायाभूत साक्षरता व संख्याज्ञान चाचणी घ्यायची आहे. याकरिता 

पर्यवेक्षीय अधिकाऱ्यांनी शाळेतील विद्यार्थ्यांची चाचणी घेताना पुढील कृती/पायऱ्यांचा अवलंब करावा:

१) आपल्या भ्रमणध्वनीमध्ये निपुण महाराष्ट्र हे अँड्रॉइड अॅप डाउनलोड करावे, आपल्याकडे अँड्रॉइड फोन नसेल तर आपणास इतरांच्या मोबाईल फोनमध्ये देखील आपला मोबाईल क्रमांक वापरून लॉगिन करता येईल.

२) लॉगिन करण्यासाठी शिक्षण विभागास आपण पुरवलेला संपर्क क्रमांकच (मोबाईल नंबर) नोंदवावा व त्यावर आलेला ओटीपी नोंदवून लॉगिन करावे.

३) सोबत जोडलेल्या प्रपत्र कर. ३ मध्ये पर्यवेक्षकांचे लॉगिन क्रमांक दिलेले आहेत. त्यानुसारच लॉगिन करण्याचा प्रयत्न करावा. तसेच लॉगिन करताना आपण प्रयत्न करीत असलेल्या क्रमांकाने लॉगिन होत नसेल अथवा माहिती, संपर्क क्रमांक इत्यादी बाबी चुकीच्या असतील तर अॅपमध्ये लॉगिन करतेवेळी अशा अधिकाऱ्यांना अॅपमध्येच एक गुगल फॉर्म उपलब्ध होईल. त्यात योग्य माहिती नोंदवावी. त्यानुसार आपली माहिती वरिष्ठ कार्यालयाकडून तपासून आपणास ७२ तासापर्यंत लॉगिन पुरविले जातील. (लॉगिन तपासणीसाठी अमोल शिनगारे यांचेशी संपर्क करावा ९०११३२८८९२)

४) प्रत्येक पर्यवेक्षीय अधिकाऱ्यांनी नियुक्त केलेल्या शाळेतील प्रत्येक तुकडीचे १५% किंवा किमान १० विद्यार्थी यापैकी जी संख्या जास्त असेल तेवढ्या विद्यार्थ्यांची पुनर्रचाचणी घ्यावी.

५) जर संबंधित तुकडीत १० किंवा १० पेक्षा कमी विद्यार्थी असतील तर अशा तुकडीतील सर्वच विद्यार्थ्यांची चाचणी घेण्यात यावी. चाचणीसाठी विद्यार्थी यादी व संख्या अॅपमध्ये निवडून मिळतील.

६) शाळांचे वाटप, विद्यार्थ्यांची निवड, चाचणीची प्रक्रिया, निकालाची नोंद इ. सर्व सुविधा निपुण महाराष्ट्र अॅपमध्ये उपलब्ध करून दिलेल्या आहेत.

७) चाचणीवेळी विद्यार्थी गैरहजर असेल तर त्यास स्तर यादी मधे "अनुपस्थित" नोंदवावा,

८) जर विद्यार्थी शाळा सोडून गेला असेल, वरच्या इयत्तेसाठी दुसऱ्या शाळेत दाखल झालेला असेल, शाळा बदल केली असेल तर अनुपस्थित पर्यायासह त्याचे कारण असलेला पर्याय निवडावा,

९) एकावेळी एका शाळेतील सर्व इयत्ता व तुकडयांची चाचणी संबंधित पर्यवेक्षकांनी पूर्ण करावी, त्यानंतरच दुसऱ्या शाळेची चाचणी अॅपमध्ये सुरु करता येईल. तसेच चाचणी सुरु सतना शाळेची निवड रद्द करता येणार नाही याची दक्षता घ्यावी.


संबंधित शिक्षणाधिकारी (प्राथामिक/माध्यामिक/योजना), जिल्हा परिषद व प्राचार्य, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था यांनी आपल्या अधिनस्त सर्व अधिकारी यांनी नेमून दिलेल्या शाळांच्या भेटी आणि चाचणीचे सनियंत्रण करावे. ३० ऑगस्ट २०२५ पर्यंत सदर चाचणी प्रक्रिया पूर्ण करण्यात यावी व जिल्ह्यातील सर्व शाळांमध्ये चाचणी पूर्ण झाल्याचा अहवाल या कार्यालयास दिनांक ०४ सप्टेंबर २०२५ पर्यंत सादर करावा.


सोबत

१. प्रपत्र १: शाळा भेट नियोजन नमुना तक्ता

२. प्रपत्र २: अॅप वापराबाबत मार्गदर्शन

३. प्रपत्र ३: जिल्हानिहाय दिलेले पर्यवेक्षीय लॉगीन क्रमांक

Nipun Maharashtra

निपुण महाराष्ट्र अभियानाअंतर्गत शालेय विद्यार्थ्यांची पायाभूत साक्षरता व संख्याज्ञान क्षमता पुनर्चाचणी आयोजन करणेबाबत परिपत्रक डाउनलोड करा. Click Here

Post a Comment

0 Comments

close