Latest Update

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

RTE 25% admission 2024-25 maharashtra Application link | आरटीई मोफत प्रवेश नोंदणी लिंक

सन 2024-25 या शैक्षणिक वर्षाच्या शिक्षण हक्क अधिनियमानुसार दुर्बल व वंचित घटकाकरिता २५ टक्के ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेबाबत संपूर्ण माहिती RTE 25% admission 2024-25 maharashtra Application link / Registration link for schools and students | शाळा व विद्यार्थी यांचेसाठी आरटीई मोफत प्रवेश नोंदणी लिंक 

RTE Portal Link - 

https://rte25admission.maharashtra.gov.in




RTE 25% admission 2024-25 maharashtra All Details

आरटीई मोफत प्रवेश 2024-25 संपूर्ण माहिती


बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम, २००९ मधील कलम १२ (१) (सी) नुसार (Download RTE Act - Click Hereखाजगी विनाअनुदानित शाळांमध्ये प्रवेश स्तरावर २५ टक्के जागा वंचित व दुर्बल घटकातील मुला / मुलीसाठी राखीव ठेवण्याची तरतूद आहे. दरवर्षी प्रमाणे सन २०२4-२5 या वर्षांची आरटीई २५ टक्के प्रवेश प्रक्रिया ऑनलाईन राबविण्यात येत असून प्रवेश प्रक्रियेबाबत पुढील प्रमाणे सूचना देण्यात येत आहेत - 

१. आपल्या जिल्हयातील २५ टक्के प्रवेश प्रक्रिया लागू असलेल्या सर्व पात्र शाळांची नोंदणी विहित मुदतीत करण्यात यावी. सदर प्रक्रिया जलद होण्यासाठी पुरेसे संगणक असलेल्या व इंटरनेट सुविधा असलेल्या शाळेत तालुकानिहाय मुख्याध्यापक यांची कार्यशाळा घेवून शाळा नोंदणी पूर्ण करावी. शाळा नोंदणीसाठी मुदतवाढ दिली जाणार नाही. 

2. ऑनलाईन प्रक्रियेत शाळेने केलेल्या नोंदणीची पडताळणी संबंधित शिक्षणाधिकारी यांनी करावी. ज्या शाळा २५ टक्के प्रवेशाकरिता पात्र आहेत परंतु नोंदणी करत नाहीत किंवा प्रवेश स्तरावरील एकूण प्रवेश क्षमतेच्या २५ टक्के जागा उपलब्ध करुन देत नाहीत, अशा शाळांबाबत तात्काळ नियमाप्रमाणे कारवाई करण्यात यावी. 

2.1 सन २०२4-२5 या शैक्षणिक वर्षाच्या आरटीई २५ टक्के प्रवेश प्रक्रियेकरीता आरटीई पोर्टलवर शाळा नोंदणी करताना लगतच्या तीन वर्षांचे आरटीई विद्यार्थ्यांचे प्रवेश वगळून इतर ७५ टक्के विद्यार्थ्यांच्या प्रवेशाची संख्या घ्यावी व त्याची सरासरी करून त्यास ०३ ने भागाकार करुन येणारी संख्या ही त्या शाळेची आरटीईची प्रवेश क्षमता राहील. तथापि, आरटीई प्रवेश क्षमता ही ३०-३० च्या दोन तुकड्या धरुन, त्याचे २५ टक्के म्हणजे जास्तीत जास्त १५ अशी राहील. 

2.2 चालू वर्षापासून नवीन नोंदणी करताना नवीन स्वयंअर्थसहाय्यित शाळांत ३ वर्षापर्यंत आरटीई प्रवेश देण्यात येवू नयेत. त्यांची गुणवत्ता व सर्वसाधारण (Open) प्रवेश तपासून निर्णय घेण्यात यावा.

2.3 जुन्या शाळांबाबत ज्या शाळेत इयत्ता १ ली ते ८ वी च्या वर्गातील एकूण संख्येच्या ५० टक्के पेक्षा जास्त आरटीई ची मुले प्रवेशित आहेत, अशा शाळेत आरटीई प्रवेश देवू नये, व अशा शाळांची नोंदणी करण्यात येवू नये.

For Schools - RTE admission 2024-25 Online Registration link - Click Here

३. गट शिक्षणाधिकारी यांनी शाळांनी केलेल्या नोंदणीची पडताळणी करावी. पूर्नपडताळणी केल्यावर शाळांनी पुन्हा आपल्या शाळेचा प्रवेश स्तर आणि सन २०२३-२४ या वर्षाकरीता शाळेची प्रवेश क्षमता (Vacancy) मुद्दा क्र. २ प्रमाणे तपासून पाहणे अनिवार्य राहिल.

४. गट शिक्षणाधिकारी यांनी पोर्टलवर शाळा पडताळणी (Verify ) केल्यावर तसा मेसेज NIC तर्फे शाळांना जाईल. उदा. आपल्या शाळेचा प्रवेशस्तर असून २०२4-२5 या वर्षाकरीता प्रवेश क्षमता आहे.) 

५. सन २०२3-२4 या वर्षी नोंदणी झालेल्या आर.टी.ई. २५ टक्के पात्र शाळांचे आपोआप Auto Registration NIC द्वारा करण्यात येते. तथापि, या सर्व शाळांचे मुद्दा क्र. २ प्रमाणे Verification BEO स्तरावरून करण्यात यावे. तसेच नव्याने अल्पसंख्यांक दर्जा प्राप्त झालेल्या शाळा व अल्पसंख्यांक शाळा विचारात घेवून नोंदणी प्रक्रियेतून वगळण्याची आवश्यक कार्यवाही करावी. शाळा अधिकृत रित्या स्थलांतरीत झाली असल्यास त्या शाळेचा पत्ता व गुगल लोकेशन बदलाबाबत आवश्यक ती कार्यवाही करावी. कोणतीही पात्र शाळा नोंदणीपासून वंचित राहणार नाही याची खात्री करावी.

६. सर्व प्रथम आरटीई प्रवेश पात्र शाळांनी इयत्ता पहिलीचा डेटा सरल पोर्टलवर अपडेट करावा आणि मगच सन २०२4-२5 करीता रजिस्ट्रेशनची प्रक्रिया विहित मुदतीत पूर्ण करावी. अन्यथा आरटीई पोर्टलवर रजिस्ट्रेशन / व्हेरिफिकेशन करताना आरटीई २५ टक्के Vacancy अपडेट करता येणार नाही.


सन २०२4-२5 या शैक्षणिक वर्षापासून आरटीई २५ टक्के प्रवेश प्रक्रिये अंतर्गत प्रवेश घेण्याकरीता सूचना


RTE admission Portal link 2024-25 - Click Here


For Schools - RTE admission 2024-25 Online Registration link - Click Here


For Students - RTE admission 2024-25 Online Application link - Click Here


06 मार्च ते 18 मार्च या कालावधीत शाळांना नोंदणी करता येणार आहे. 

मुदतवाढ - RTE अंतर्गत शाळांना नोंदणी करणेसाठी 22 मार्च पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. 

RTE अंतर्गत नोंदणी / Registration कसे करावे? Download PDF - Click Here


RTE 25% प्रवेश प्रक्रिया सुरु करणे बाबत शासन परिपत्रक (दि. 06-03-2024) डाउनलोड करा. Click Here


सन २०२4-२5 या शैक्षणिक वर्षापासून आरटीई २५ टक्के प्रवेश प्रक्रिये अंतर्गत प्रवेश घेण्याकरीता निवासी पुराव्याकरिता फक्त राष्ट्रीयकृत बँकेचे पासबुक ग्राह्य धरण्यात यावे.

निवासी पुरावा म्हणून इतर स्थानिक बँकेचे तसेच पतसंस्थेचे पासबूक गृहीत धरु नये. निवासी पुराव्याकरिता रेशनिंग कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स, बीज / टेलिफोन देयक प्रॉपर्टी टॅक्स देयक / घरपट्टी, आधारकार्ड, मतदान ओळखपत्र, पासपोर्ट, राष्ट्रीयकृत बँकेचे पासबूक इ. यापैकी कोणताही एक पुरावा ग्राह्य धरावा. यापैकी पुरावा नसल्यासच भाडेकरार ग्राह्य धरण्यात यावा. 

भाडेकरार हा दुय्यम निबंधक कार्यालयाचा नोंदणीकृत असावा. फक्त भाडेकरार हा पर्याय नाही याची नोंद घ्यावी परंतु भाडेकरार हा फॉर्म भरण्याच्या दिनांकाच्या पूर्वीचा असावा व त्याचा कालावधी १ वर्षांचा असावा. जे पालक रहिवासी पुरावा म्हणून भाडेकराराची प्रत जोडतील त्यांची केव्हाही पडताळणी करण्यात येईल. ज्या ठिकाणचा भाडेकरारनामा दिला असेल त्या ठिकाणी बालक / पालक राहत नाही असे आढळून आल्यास खालील प्रमाणे कारवाई करण्यात येईल.

१. कायदेशीर कारवाई करणे 

२. सदर बालकाचा प्रवेश रद्द करणे

३.आरटीई मध्ये प्रवेश झाला तरीही सर्व फी संबंधित पालकाने भरणे. या वरील ३ पैकी सर्व किया योग्य ती कारवाई करण्यात येईल.

४ जन्मतारखेचा पुरावा. 

५ जात प्रमाणपत्र पुरावा. (सक्षम अधिकाऱ्यांनी प्रमाणित करुन दिलेले जात प्रमाणपत्र असावे.) 

६ उत्पन्नाचा पुरावा सन २०२३-२४ या शैक्षणिक वर्षामध्ये आरटीई अंतर्गत प्रवेश घेतांना विद्यार्थ्यांच्या पालकांचा सन २०२१-२२ किंवा २०२२-२३ या वर्षाचा उत्पन्नाचा दाखला ग्राह्य धरावा. उत्पन्नाच्या दाखल्याकरीता salary slip, तहसिलदारांचा दाखला, कंपनीचा किंवा Employer चा दाखला गृहीत धरावा.

७.दिव्यांग मुलांसाठी वैद्यकीय प्रमाणपत्राचा पुरावा जिल्हा शल्य चिकित्सक/वैद्यकीय अधिक्षक, अधिसूचित जिल्हा शासकीय रूग्णालय यांचे ४० टक्के पेक्षा जास्त दिव्यांग असल्याचे प्रमाणपत्र पालकांनी ऑनलाईन प्रवेश अर्ज भरताना single Parent (विधवा, घटस्फोटित, आई अथवा वडील या पैकी कोणताही एक) पर्याय निवडला असेल तर संबंधित बालकाचे पालकत्व स्विकारलेल्या व्यक्तीचे प्रवेशासाठी लागणारे आवश्यक कागदपत्र ग्राह्य धरण्यात यावेत. उत्पन्नाचा दाखला व जातीचा दाखला हा परराज्यातील ग्राह्य धरण्यात येणार नाही.

८. ज्या बालकांनी यापूर्वी आरटीई २५ अंतर्गत शाळेत प्रवेश घेतला असल्यास सदर बालकांला पुन्हा अर्ज करता येणार नाही. प्रवेश अर्ज भरताना याबाबत चुकीची माहिती भरुन पुन्हा प्रवेश घेतल्याचे आढळल्यास सदरील प्रवेश रद्द करण्यात येईल. तसेच पालकांनी एकच परिपूर्ण अर्ज भरावा अनेक अर्ज भरू नयेत. अनेक अर्ज भरल्याचे निदर्शनास आल्यास सदर अर्ज लॉटरीसाठी विचारात घेतला जाणार नाही याची दक्षता घेण्यात यावी. 

९. लॉटरी झाल्यांनतर शाळेला आर.टी.ई. पोर्टलवर त्यांच्या लॉगीनला विद्याथ्यांची नावे व मोबाईल क्रमांक दिले जातील. विद्यार्थ्यांच्या नावापुढे ज्या दिनांकास विद्याथ्यांना प्रवेशासाठी बोलावले आहे त्या पालकांकडून मूळ कागदपत्रेच एक छायांकित प्रत शाळांनी प्राप्त करून घ्यावी. कागदपत्राची प्राथमिक तपासणी करुन योग्य असल्यास विद्यार्थ्याच्या नावापुढे ऑनलाईन नोंद करावी तसेच पालकाकडील अलॉटमेंट लेटर वर तात्पुरता प्रवेश दिला असे नोंद करावे व ती नोंद करून पालकांना परत करावे. तसेच पालकांकडून हमीपत्र भरून घ्यावे. 

१०. काही पालक मूळ गावी किंवा अन्य जागी स्थलांतर झाले असल्याची शक्यता आहे, त्यामुळे दिलेल्या तारखेस पालक आले नाही तर त्यांना पुन्हा पुढची तारीख देण्यात यावी. दुसऱ्यांदा दिलेल्या तारखेला उपस्थित न राहील्यास तिसऱ्यांदा तारीख देण्यात यावी. अशा प्रकारे पालकांना तीन वेळा संधी द्यावी. बालकांना प्रवेश घेण्याकरिता शाळेने पालकांशी संपर्क साधावा.

For Students - RTE admission 2024-25 Online Application link - Click Here

 

कागदपत्रे तपासणी याकरिता गट शिक्षण अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली पडताळणी समिती गठीत करण्यात यावी. 

पडताळणी समितीची रचना खालीलप्रमाणे राहील.

पडताळणी समितीने प्रवेशपात्र बालकांच्या प्रवेशाकरीता आवश्यक त्या सर्व कागदपत्रांची पडताळणी करण्यात यावी. गट शिक्षण अधिकारी यांनी प्रत्येक बालकाला ३ वेळा प्रवेशाकरीता दिनांक देवून संधी पालकांनी संपर्क केला नाही अथवा प्रवेशासाठी आले नाही तर विहित मुदतीत आरटीई पोर्टल वर Not Approch करावे. पडताळणी समिती केंद्रावर गर्दी होणार नाही व बालक प्रवेशापासून वंचित राहणार नाही याची दक्षता घ्यावी.

RTE admission Portal link 2024-25 - Click Here


RTE 25% मोफत प्रवेशासाठी आवश्यक कागदपत्रे - Click Here

RTE 25% admission notice 2024-25 - Click Here

RTE 25% मोफत प्रवेशासाठी आवश्यक वयाबाबत Age limit - Click Here

RTE 25% मोफत प्रवेशासाठी हमीपत्र - Click Here

RTE 25% admission user manual for parents - Click Here

RTE 25% मोफत प्रवेशासाठी FAQS (प्रश्न व उत्तरे) - Click Here

Post a Comment

0 Comments

close