Latest Update

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

RTE lottery Result 2025-26 | RTE Selection List PDF | आरटीई 25 टक्के प्रवेश प्रक्रिया सन 2025-26 करिता सूचना | Notification for RTE 25 percent Admission Process | selection list

सन 2025-26 शैक्षणिक वर्षासाठी आरटीई २५ टक्के प्रवेश प्रक्रियेची सोडत (लॉटरी) दिनांक 10 फेब्रुवारी 2025 रोजी दुपारी 01:00 वाजता महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद (विद्या प्राधिकरण) पुणे येथे विद्यार्थ्यांच्या हस्ते काढण्यात आली आहे. 

RTE 25% मोफत प्रवेश 2025-26 संपूर्ण माहिती वाचा. |  पात्रता, रजिस्ट्रेशन लिंक, आवश्यक कागदपत्रे - Click Here 


RTE act 2009 (मराठी / इंग्रजी) PDF डाउनलोड करा. Click Here


बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम, २००९ अन्वये दरवर्षीप्रमाणे २५ टक्के प्रवेश प्रक्रीया संपुर्ण राज्यात ऑनलाईन पध्दतीने राबविण्यात येते. त्यानुसार सन 2025-26 शैक्षणिक वर्षासाठी आरटीई २५ टक्के प्रवेश प्रक्रियेची सोडत (लॉटरी) दिनांक 10 फेब्रुवारी 2025 रोजी दुपारी 01:00 वाजता महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद (विद्या प्राधिकरण) पुणे येथे विद्यार्थ्यांच्या हस्ते काढण्यात आली आहे.



RTE lottery Result 2025-26 you tube live Here

https://www.youtube.com/live/2i3Cdb2_vEg?si=CFHURkBgbUTvVpZE


महत्त्वाची सूचना

आज १० फेब्रुवारी रोजी ऑनलाईन निकाल लागला असून आपल्या पाल्याचा नंबर लागला किंवा नाही हे आपल्याला एसएमएस व प्रतीक्षा यादी येण्यासाठी कमीत कमी तीन ते चार दिवस लागणार आहे त्यामुळे घाई करू नका. फक्त दोन दिवसांनी खालील दिलेल्या सूचनेप्रमाणे आपण आपल्या पाल्याचा नंबर कोणत्या शाळेमध्ये लागला आहे हे चेक करू शकता.


निवड यादी selection list जिल्हानिहाय डाउनलोड करा. - Click Here


प्रतिक्षा यादी जिल्हानिहाय PDF डाउनलोड करा. Click Here


RTE Admission Selection list निवड यादी कशी डाउनलोड करावी? 

वरील लिंक वरुन मूळ यादी / प्रतिक्षा यादी येथे टच करा. 

जिल्हा निवडा

Go या बटणावर टच करा. 

Downliad Selection list PDF येथे टच करा. 

PDF डाउनलोड होईल. 

ती PDF ओपन करा. आपल्या पाल्याचे नाव सर्च करा. 

application number वरुन ही नाव शोधता येईल. 


RTE 25% Selection List - Click Here

RTE Application Status - Click Here 

RTE Status - Click Here 

District Wise Selection List - Click Here

RTE Waiting List - Click Here



RTE 25% मोफत प्रवेश संपूर्ण माहिती वाचा. |  पात्रता, रजिस्ट्रेशन लिंक, आवश्यक कागदपत्रे - Click Here 


सन 2025-26 मधील RTE 25% प्रवेशाबाबत सर्वसाधारण सूचना


ज्या बालकांची लॉटरीद्वारे २५ टक्के प्रवेशासाठी निवड झाली आहे त्या बालकांच्या पालकांना त्यांनी अर्जामध्ये नमूद केलेल्या मोबाईल नंबर वर एसएमएस पाठविले जातील. सद्या प्रतिक्षा यादीतील मुलांना एस एम एस पाठविण्यात येत आहेत. 

प्रतिक्षा यादीतील ज्या बालकांची निवड यादीमध्ये प्रवेशासाठी निवड झाली आहे त्या बालकांच्या पालकांनी दिनांक 14 फेब्रुवारी 2025, ते 28 फेब्रुवारी 2025 या कालावधीत पंचायत समिती / महानगरपालिका स्तरावरील पडताळणी समितीकडे जाऊन कागदपत्रे तपासून घेऊन आपल्या पाल्याचा प्रवेश निश्चित करावा. 

पडताळणी समितीने प्रवेश निश्चित केल्यानंतर पालकांनी दिनांक 10 मार्च 2025 पर्यंत शाळेमध्ये जाऊन बालकाचा प्रवेश घ्यावा.


RTE 25% admission web portal link - Click Here


RTE 25% admission selection list - Click Here


सोडतीद्वारे शाळेमध्ये प्रवेशासाठी निवड झालेल्या बालकांच्या पालकांना त्यांनी नोंदणी केलेल्या मोबाईल क्रमांकावर सोमवार दिनांक 14/02/2025 पासून SMS जाण्यास सुरुवात होईल.

प्रवेश मिळाल्याचा SMS प्राप्त झालेल्या पालकांनी दिनांक फेब्रुवारी पर्यंत आपल्या जिल्ह्यातील संबंधित तालुकास्तरावरील पडताळणी समितीकडे कागदपत्रांची पडताळणी करुन पडताळणी समितीमार्फत आपल्या बालकांचा प्रवेश निश्चित करुन घेण्याबाबत सूचना देण्यात याव्यात.

तरी आपणांस कळविण्यात येते की, सन 2025-26 शैक्षणिक वर्षासाठी आरटीई २५ टक्के प्रवेश प्रक्रिये अंतर्गत ऑनलाईन सोडतीद्वारे निवड झालेल्या निवड यादीतील बालकांच्या पालकांना प्रवेशासाठी आपल्या जिल्हयातील सर्व तालुकास्तरावरील पडताळणी केंद्राची तपासणी करुन पडताळणी केंद्र अपडेट करण्यात यावी, पालकांना अडचण होणार नाही यांची दक्षता घ्यावी. तसेच पालकांनी केवळ SMS वर अवलंबून न राहता RTE PORTAL वरील अर्जाची स्थिती या टॅबवर आपल्या बालकाचा अर्ज क्र. टाकून अर्जाची स्थिती पहावी वेळोवेळी दिलेल्या सूचनांचे अवलोकन करावे व सदरील सूचनांचे पालन करावे अशा सूचनांना आपल्यास्तरावरुन मोफत प्रसिध्दी देण्यात यावी.





1 - सर्वात आगोदर RTE 25 % च्या ऑफिशियल वेबसाईटवर जावे


2 - आपला लॉगिन आयडी व पासवर्ड टाकून लॉगिन करावे

3 - Admit 2025 वर क्लिक करावे

4 - आपल्या लागलेल्या शाळेचा ऍडमिट कार्ड प्रिंट काढून जतन करावा.


२५ टक्के प्रवेश प्रक्रिया पारदर्शक पध्दतीने नियमानुसार राबविली जात असून प्रवेश प्रक्रियेअंतर्गत प्रवेश क्षमते एवढ्या विद्यार्थ्यांची लॉटरीद्वारे निवड होणार आहे. सबब, पालकांनी २५ टक्के प्रवेश प्रक्रियेबाबत कोणतेही दलाल / संस्था यांच्या प्रलोभनांना बळी पडू नये.


२५ टक्के प्रवेश प्रक्रियेतून प्रवेशित होणाऱ्या बालकांना कोणत्याही प्रकारे शाळेमध्ये वेगळी / सापत्न वागणूक दिली जाणार नाही अथवा त्यांच्याबद्दल भेदभाव केला जाणार नाही याची दक्षता शाळा प्रशासनाने घेणे अनिवार्य आहे. 



२५ टक्के प्रवेश प्रक्रियेतून येणाऱ्या विद्यार्थ्यांची गळती होणार नाही तसेच ही बालके शिक्षणापासून वंचित राहणार नाहीत याचे सामाजिक दायित्व शाळा प्रशासनाचे राहील. 

याबाबत पालकांची तक्रार असल्यास त्यांनी शासन निर्णय दिनांक २१ एप्रिल, २०१४ अन्वये स्थापित झालेल्या तक्रार निवारण समितीकडे तक्रार दाखल करावी.


RTE 25% मोफत प्रवेशासाठी आवश्यक कागदपत्रे - Click Here

Post a Comment

0 Comments

close