Latest Update

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

Google Search

इयत्ता पहिली शाळा प्रवेशासाठी वय निश्चिती | शैक्षणिक वर्ष 2023-24 | इयत्ता पहिली प्रवेश व अंगणवाडी (नर्सरी) मध्ये दाखल करावयाच्या बालकांच्या जन्मदिनांकाबाबत स्पष्टीकरण सन 2023-24

शैक्षणिक वर्ष 2023-2024 साठी इयत्ता पहिलीत दाखल करावयाच्या मुलांसाठी मानीव दिनांक म्हणून 31 डिसेंबर  ही तारीख निश्चित करण्यात आली आहे. admission date for academic year 2023-2024 (standard -1st, nursery, L.K.G.)

RTE 25% Admission Online Application all process and website link - Click Here

31 डिसेंबर 2023 रोजी 6 वर्ष पूर्ण असणारी बालके इयत्ता पहिलीत दाखल करण्यात येतील. 6 वर्ष पूर्ण असणाऱ्या अशा बालकांना सक्ती पात्र / दाखल पात्र म्हणून समजण्यात येईल. RTE act  नुसार अशी बालके शाळेत दाखल करुन घ्यावीच लागतील. 

शाळापूर्व तयारी अभियान 2023-24 तयारी कशी करावी? मेळावा तयारीसाठी महत्त्वपूर्ण PDF पहा. - Click Here

Join WhatsApp Group


शाळा प्रवेशासाठी बालकाचे किमान वय निश्चित करण्याबाबत दिनांक १८/०९/२०२० रोजीच्या शासन निर्णयान्वये मानीव दिनांक ३१ डिसेंबर करण्यात आला आहे. शासनाने किमान वयोमर्यादा ठेवलेली आहे परंतू कमाल वयोमर्यादा नाही. मानिव दिनांक बदलामुळे माहे जुलै ते नोव्हेंबर महिन्यात जन्मलेल्या विद्यार्थ्याचे शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून शैक्षणिक वर्ष सन २०२३-२४ साठी आरटीई २५ टक्के प्रवेशासाठी वयोमर्यादा दिनांक ३१ डिसेंबर २०२३ अखेर पुढील प्रमाणे राहील.. या वर्षी सन 2023-2024 साठी कमाल व किमान वयोमर्यादा पुढीलप्रमाणे असणे आवश्यक आहेशैक्षणिक वर्ष 2023-2024 साठी दाखल जन्मदिनांक/वयो मर्यादा

प्रवेशाचा वर्ग वयोमर्यादा किमान वय कमाल वय
नर्सरी / प्ले ग्रुप 1 जुलै 2019 ते 31 डिसेंबर 2020 3 वर्षे 4व 5म 30दि
ज्युनिअर KG 1 जुलै 2018 ते 31 डिसेंबर 2019 4 वर्षे 5व 5म 30दि
सिनिअर KG 1 जुलै 2017 ते 31 डिसेंबर 2018 5 वर्षे 6व 5म 30दि
इयत्ता पहिली 1 जुलै 2016 ते 31 डिसेंबर 2017 6 वर्षे 7व 5म 30दि


शाळा प्रवेशासाठी जन्मदिनांक व वयाबाबतचे परिपत्रक 2023-24 डाउनलोड करण्यासाठी येथे टच करा. 

शंका समाधान

शंका १) शैक्षणिक वर्ष 2023-2024 साठी इयत्ता पहिलीत कोणत्या मुलाला दाखल कराल? 

उत्तर - ज्या बालकाची जन्मतारीख 1 जुलै 2016 ते 31 डिसेंबर 2017 या दरम्यान आहे अशी बालके इयत्ता पहिलीत दाखल करावीत. 

शंका २) जुुुलै 2017 ते डिसेंबर 2018 मधील बालकांचा प्रवेश कसा करावा? 

उत्तर - ज्या बालकाची जन्मतारीख 01 जुलै 2017 ते 31 डिसेंबर 2018 मधील आहे अशा बालकांना सिनिअर के जी मध्ये दाखल करावे.

शंका 3) जुुुलै 2018 ते डिसेंबर 2019 मधील बालकांचा प्रवेश कसा करावा? 

उत्तर - ज्या बालकाची जन्मतारीख 01 जुलै 2018 ते 31 डिसेंबर 2019 मधील आहे अशा बालकांना ज्युनियर के जी मध्ये दाखल करावे.

शंका 4) जुुुलै 2019 ते डिसेंबर 2020 मधील बालकांचा प्रवेश कसा करावा? 

उत्तर - ज्या बालकाची जन्मतारीख 01 जुलै 2019 ते 31 डिसेंबर 2020 मधील आहे अशा बालकांना प्ले ग्रुप / नर्सरी मध्ये दाखल करावे.

परिपत्रक डाउनलोड करा. 

शाळा प्रवेशासाठी जन्मदिनांक व वयाबाबतचे परिपत्रक 2023-24 डाउनलोड करण्यासाठी येथे टच करा.

शाळा प्रवेशासाठी जन्मदिनांक व वयाबाबतचे परिपत्रक 2022-23 डाउनलोड करण्यासाठी येथे टच करा.

शाळा प्रवेशासाठी जन्मदिनांक व वयाबाबतचे परिपत्रक 2021-22 डाउनलोड करण्यासाठी येथे टच करा.

Post a Comment

0 Comments

close