Latest Update

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

शाळा प्रवेश वय निश्चिती मानीव दिनांक 31 डिसेंबर - शाळा प्रवेशासाठी बालकाचे किमान वय निश्चित करणेबाबत मानीव दिनांक 31 डिसेंबर

शाळा प्रवेश वय निश्चिती मानीव दिनांक 31 डिसेंबर - शाळा प्रवेशासाठी बालकाचे किमान वय निश्चित करणेबाबत मानीव दिनांक 31 डिसेंबर अनुसरून प्रवेशासाठी वय निश्चित करण्यात येणार आहे. 

शाळा प्रवेशासाठी जन्मदिनांक व वयाबाबतचे परिपत्रक 2024-25 डाउनलोड करण्यासाठी येथे टच करा.


शासनाने दि.११ जून, २०१० च्या शासन निर्णयान्वये शाळा प्रवेशाबाबतची कार्यपध्दती निश्चित केलेली आहे. सदर शासन निर्णयात प्रवेशाबाबतच्या इतर तरतूदीबरोबरच शाळा प्रवेशासाठी बालकाचे वयाबाबतची तरतूद आहे. सदर तरतूदीनुसार इयत्ता १ ली मधील प्रवेशासाठीची वयोमर्यादा ६ वर्षे निश्चित केलेली होती. तथापि, ५ वर्षे पूर्ण झालेले बालक इयत्ता १ ली मधील प्रवेशासाठी पात्र राहतील, असे आदेशात नमूद केले होते. 


राज्यात राज्य मंडळाचा अभ्यासक्रम राबविणाऱ्या शाळा, सी.बी.एस.ई., आय. सी.एस.ई., आय.बी. अशा विविध प्रकारच्या शाळा आहेत. सदर सर्व प्रकारच्या शाळांमध्ये प्रवेशाच्या वेळेस इयत्ता १ ली साठी वेगवेगळी वयोमर्यादा वेगवेगळ्या दिनांकास ग्राह्य धरुन प्रवेश दिले जात होते. तसेच पूर्व प्राथमिकसाठी वर्गातील प्रवेशासाठी निश्चित अशी वयाची अट अस्तित्वात नव्हती. या बाबी विचारात घेऊन यामध्ये एकवाक्यता आणण्यासाठी उपाययोजना सुचविण्यासाठी शिक्षण संचालक (प्राथमिक) यांच्या अध्यक्षतेखाली एकसदस्यीय समिती नियुक्त करण्यात आली होती. सदर समितीने दिलेल्या शिफारशीनुसार 

1) शासन निर्णय दिनांक २१/०१/२०१५ व दि.२३/०१/२०१५ च्या शुध्दीपत्रकान्वये ३१ जुलै हा मानिव दिनांक गृहीत धरुन बालकाचे किमान वय पूर्व प्राथमिक (इयत्ता १ ली पूर्वीचा ३ रा वर्ग) (प्ले-ग्रुप/नर्सरीसाठी) साठी ३ वर्षे पूर्ण व इयत्ता १ ली साठी ६ वर्षे पूर्ण असे आदेश निर्गमित करण्यात आले आहेत. 

2) शासन निर्णय दि.२५/०१/२०१७ अन्वयेशाळा प्रवेशासाठी ३० सप्टेंबर हा मानिव दिनांक घोषित करण्यात आलेला आहे. 

3) तसेच शासन निर्णय दि.२५/०७/२०१९ अन्वये शाळा प्रवेशासाठी बालकांच्या किमान वयामध्ये जास्तीत जास्त १५ दिवसांची शिथिलता देण्याचे अधिकार मुख्याध्यापकांना देण्यात आले आहेत.


शिक्षण संचालक (प्राथमिक), महाराष्ट्र राज्य, पुणे यांनी दि. १८/०२/२०२० रोजीच्या पत्रान्वये बालकांच्या किमान वयामध्ये शिथिलता आणण्याबाबतचा प्रस्ताव सादर केला होता. त्यास अनुसरुन शाळा प्रवेशासाठी बालकांच्या किमान वयामध्ये शिथिलता देण्याबाबतची बाब शासनाच्या विचाराधीन होती. याबाबतचा शासन निर्णय खालीलप्रमाणे आहे.


शासन निर्णयः

सदर शासन निर्णयान्वये पूर्व प्राथमिक व इयत्ता १ ली मधील शाळा प्रवेशासाठीचे किमान वय 31 डिसेंबर ही मानीव तारीख धरुन पुढीलप्रमाणे निश्चित करण्यास मान्यता देण्यात येत आहे. 


1) प्रवेशाचा वर्ग - प्ले ग्रुप / नर्सरी (इ.१ ली पूर्वीचा ३ रा वर्ग)

किमान वय वर्ष ३+

वयाबाबत मानिव दिनांक 31 डिसेंबर

अंमलबजावणी वर्ष  2021-22 पासून


2) प्रवेशाचा वर्ग - इ.१ ली

किमान वय वर्ष 6+

वयाबाबत मानिव दिनांक 31 डिसेंबर

अंमलबजावणी वर्ष  2021-22 पासून


सदर आदेश राज्यातील सर्व प्रकारच्या, सर्व व्यवस्थापनाच्या शाळांना लागू राहतील.

सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेताक २०२००९१८१६११११९५२१ असा आहे.

शाळा प्रवेशासाठी बालकाचे किमान वय निश्चित करणेबाबत मानीव दिनांक 31 डिसेंबर निश्चित शासन निर्णय डाउनलोड करा. Click Here



शैक्षणिक वर्ष 2024-2025 साठी इयत्ता पहिलीत दाखल करावयाच्या मुलांसाठी मानीव दिनांक म्हणून 31 डिसेंबर ही मानीव दिनांक निश्चित करण्यात आली आहे. admission date for academic year 2024-2025 (standard -1st, nursery, L.K.G.)

RTE 25% Admission Online Application all process and website link - Click Here

31 डिसेंबर 2024 रोजी 6 वर्ष पूर्ण असणारी बालके इयत्ता पहिलीत दाखल करण्यात येतील. 6 वर्ष पूर्ण असणाऱ्या अशा बालकांना सक्ती पात्र / दाखल पात्र म्हणून समजण्यात येईल. RTE act  नुसार अशी बालके शाळेत दाखल करुन घ्यावीच लागतील. 


Join WhatsApp Group


शाळा प्रवेशासाठी बालकाचे किमान वय निश्चित करण्याबाबत दिनांक १८/०९/२०२० रोजीच्या शासन निर्णयान्वये मानीव दिनांक ३१ डिसेंबर करण्यात आला आहे. शासनाने किमान वयोमर्यादा ठेवलेली आहे परंतू कमाल वयोमर्यादा नाही. मानिव दिनांक बदलामुळे माहे जुलै ते नोव्हेंबर महिन्यात जन्मलेल्या विद्यार्थ्याचे शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून शैक्षणिक वर्ष सन २०२4-२5 साठी आरटीई २५ टक्के प्रवेशासाठी वयोमर्यादा दिनांक ३१ डिसेंबर २०२4 अखेर पुढील प्रमाणे राहील.. या वर्षी सन 2024-2025 साठी कमाल व किमान वयोमर्यादा पुढीलप्रमाणे असणे आवश्यक आहे



शैक्षणिक वर्ष 2024-2025 साठी दाखल जन्मदिनांक/वयो मर्यादा

प्रवेशाचा वर्ग वयोमर्यादा किमान वय कमाल वय
नर्सरी / प्ले ग्रुप 1 जुलै 2020 ते 31 डिसेंबर 2021 3 वर्षे 4व 5म 30दि
ज्युनिअर KG 1 जुलै 2019 ते 31 डिसेंबर 2020 4 वर्षे 5व 5म 30दि
सिनिअर KG 1 जुलै 2019 ते 31 डिसेंबर 2019 5 वर्षे 6व 5म 30दि
इयत्ता पहिली 1 जुलै 2017 ते 31 डिसेंबर 2018 6 वर्षे 7व 5म 30दि


शाळा प्रवेशासाठी जन्मदिनांक व वयाबाबतचे परिपत्रक 2024-25 डाउनलोड करण्यासाठी येथे टच करा. 

शंका समाधान

शंका १) शैक्षणिक वर्ष 2024-2025 साठी इयत्ता पहिलीत कोणत्या मुलाला दाखल कराल? 

उत्तर - ज्या बालकाची जन्मतारीख 1 जुलै 2017 ते 31 डिसेंबर 2018 या दरम्यान आहे अशी बालके इयत्ता पहिलीत दाखल करावीत. 

शंका २) जुुुलै 2018 ते डिसेंबर 2019 मधील बालकांचा प्रवेश कसा करावा? 

उत्तर - ज्या बालकाची जन्मतारीख 01 जुलै 2018 ते 31 डिसेंबर 2019 मधील आहे अशा बालकांना सिनिअर के जी मध्ये दाखल करावे.

शंका 3) जुुुलै 2019 ते डिसेंबर 2020 मधील बालकांचा प्रवेश कसा करावा? 

उत्तर - ज्या बालकाची जन्मतारीख 01 जुलै 2019 ते 31 डिसेंबर 2020 मधील आहे अशा बालकांना ज्युनियर के जी मध्ये दाखल करावे.

शंका 4) जुुुलै 2020 ते डिसेंबर 2021 मधील बालकांचा प्रवेश कसा करावा? 

उत्तर - ज्या बालकाची जन्मतारीख 01 जुलै 2020 ते 31 डिसेंबर 2021 मधील आहे अशा बालकांना प्ले ग्रुप / नर्सरी मध्ये दाखल करावे.


शाळा प्रवेश वय निश्चिती बाबत परिपत्रक डाउनलोड करा. 

शाळा प्रवेशासाठी जन्मदिनांक व वयाबाबतचे परिपत्रक 2024-25 डाउनलोड करण्यासाठी येथे टच करा.

शाळा प्रवेशासाठी जन्मदिनांक व वयाबाबतचे परिपत्रक 2023-24 डाउनलोड करण्यासाठी येथे टच करा.

शाळा प्रवेशासाठी जन्मदिनांक व वयाबाबतचे परिपत्रक 2022-23 डाउनलोड करण्यासाठी येथे टच करा.

शाळा प्रवेशासाठी जन्मदिनांक व वयाबाबतचे परिपत्रक 2021-22 डाउनलोड करण्यासाठी येथे टच करा.

Post a Comment

0 Comments

close