Form No 17 SSC / HSC Student Application Login | महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (इ. १०वी) व उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ. १२वी) परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना खाजगीरित्या फॉर्म नं.17 भरुन परीक्षेस प्रविष्ट होण्याची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आलेली आहे. फॉर्म नंबर 17 संपूर्ण माहिती व अर्ज लिंक - http://www.mahahsscboard.in
इ. १० वी व इ. १२वी परीक्षेसाठी खाजगी विद्यार्थ्यांकरिता सर्व शाळा/कनिष्ठ महाविद्यालये मंडळाच्या अटी शर्तीनुसार नावनोंदणी करण्याकरिता उपलब्ध आहेत. यासंदर्भातील सर्व माहिती व मार्गदर्शक पुस्तिका मंडळाच्या http://www.mahahsscboard.in या संकेतस्थर प्रसिद्ध करण्यात येत आहे. तसेच अधिक माहितीसाठी सर्व विद्यार्थी/शाळा/कनिष्ठ महाविद्यालय कार्यकक्षेतील विभागीय मंडळाशी संपर्क साधावा.
फेब्रु-मार्च २०२६ मध्ये होणाच्या माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (ड. १०वी) व उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ १२वी) परीक्षेसाठी खाजगी विद्यार्थी नावनोंदणी अर्ज (फॉर्म नं. १७) ऑनलाईन स्वीकारण्याच्या तारखा खालीलप्रमाणे निश्चित करण्यात आल्या आहेत.
१. विद्यार्थ्यांनी नावनोंदणी अर्ज व नियमित शुल्क ऑनलाईन भरुन अर्जाची प्रत (print out), ऑनलाईन नावनोंदणी शुल्क जमा केल्याबाबत पोहोचपावतीची प्रिंटआऊट व मूळ कागदपत्रे अर्जावर नमूद केलेल्या शाळेत/कनिष्ठ महाविद्यालयात जमा करणे.
विद्यार्थ्यांनी नावनोंदणी अर्ज ऑनलाईन स्वीकारण्याच्या तारखा - दि. ०१/०८/२०२५ ते दि. ३१/०८/२०२५
फेब्रु-मार्च २०२६ मध्ये होणाच्या माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (ड. १०वी) व उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ १२वी) परीक्षेसाठी खाजगी विद्यार्थी नावनोंदणी अर्ज (फॉर्म नं. १७) संबंधी महत्त्वाच्या सूचना
१ खाजगिरित्या प्रविष्ट विद्यार्थ्यांनी विहित मुदतीत अर्ज करावा.
अर्ज करण्यासाठी लिंक - http://www.mahahsscboard.in
२ खाजगी विद्यार्थ्यांना इ. १० वी व इ. १२वी साठी नावनोंदणी अर्ज ऑनलाईन (online) पध्दतीनेन भरावयाचे आहेत, त्यामुळे कोणाचाही ऑफलाईन (offline) अर्ज स्वीकारला जाणार नाही, यानी नोंद घ्यावी
३ खाजगी विद्यार्थ्यांनी इ १०वी/इ. १२वी साठी नावनोंदणी अर्ज ऑनलाईन भरण्यापूर्वी ज्या शाळा कनिष्ठ महाविद्यालयातून मंडळाची परीक्षा द्यावयाची आहे, त्या शाळा/कनिष्ठ महाविद्यालयात जाऊन शाळा/कनिष्ठ महाविद्यालयाचा सांकेतिक क्रमांक, विषय योजना, माध्यम, शाखा (Stream) व इतर आवश्यक माहिती घेऊनच नोंदणी करावी.
४ नावनोंदणी अर्ज करतांना विद्यार्थ्यांनी http://www.mahahsscboard.in या मकेतस्थळावरील Student Corner या option या वापर करावा, अर्ज भरण्यासाठीच्या सूचना संकेतस्थळावर मराठी /इंग्रजीमधून उपलब्ध आहेत, त्या वाचून अर्ज भरण्यास सुरुवात करावी.
17 नंबर फॉर्म विद्यार्थी रजिस्ट्रेशन लिंक
उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षा (इ १२ वी) खाजगी विद्यार्थी (फॉर्म नं.१७) माहिती व मार्गदर्शक सूचना.
५ विद्यार्थ्यांने अर्ज भरण्याकरिता १) शाळा सोडल्याचा दाखला (मूळ प्रत्त), नसल्यास द्वितीयप्रत व प्रतिज्ञापत्र २) आधारकार्ड ३) स्वतःचा पासपोर्ट आकारातील फोटो स्वतः जवळ ठेवावा ऑनलाईन अर्ज भरतांना सदर मूळ कागदपत्रे स्कॅन करुन अपलोड करावयाची आहेत. काही कारणास्तव विद्यार्थ्यांकडे दुय्यम शाळा सोडल्याचा दाखला असेल तर त्याची मूळ प्रत जोडणे आवश्यक आहे.
६ कागदपत्रे स्कॅन करण्यासाठी विद्यार्थ्यांनी स्कॅनर/मोबाईलद्वारे कागदपत्रांचे फोटो (pdf) काढून ते upload करावेत. विद्यार्थ्यांचा मोबाईल कमांक व ई-मेल आयडी पुढील संपर्कासाठी अनिवार्य आहे.
७ विद्यार्थ्यांनी अर्ज, ऑनलाईन नावनोंदणी शुल्क जमा केल्याबाबत पोहोचपावतीची प्रिंटआऊट व मूळ कागदपत्रे नावनोंदणी अर्जावर नमूद केलेल्या शाळा/कनिष्ठ महाविद्यालयात विहीत मुदतीत जमा करावयाची आहेत.
८ खाजगी विद्यार्थी नावनोंदणी शुल्काचा तपशील खालीलप्रमाणे
इ.१०वी :- रु.१११०/- नाव नोंदणी शुल्क रु.१००/- प्रक्रिया शुल्क (Processing Fee)
रु. १००/- विलंब शुल्क प्रति विद्यार्थी
इ.१२वी
रु.१११०/- नाव नोंदणी शुल्क रु.१००/- प्रकिया शुल्क (Processing Fee)
रु. १००/- विलंब शुल्क प्रति विद्यार्थी
९ इ. १०वी/इ. १२वी फेब्रु मार्च २०२६ परीक्षेसाठी खाजगी विद्यार्थी (फॉर्म नं. १७) नावनोंदणी शुल्क ऑनलाईन पध्दतीने (Debit Card/Credit Card/UPI/Net Banking द्वारे) भरणे अनिवार्य राहील. ऑनलाईन पध्दतीने शुल्क जमा केल्याबाबतची पोहोचपावती विद्यार्थी / संबंधित शाळा/कनिष्ठ महाविद्यालयास त्यांच्या Login मध्ये प्राप्त होईल.
१० अ) माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (इ. १०वी) परीक्षेस प्रविष्ट होणाऱ्या खाजगी विद्यार्थ्यांची नावनोंदणी ऑनलाईन पध्दतीने होणार असून नावनोंदणी करतांना विद्यार्थ्यांच्या सध्याच्या पत्त्यातील (Current Address) जिल्हा, तालुका व त्याने निवडलेल्या माध्यमानुसार, त्यास माध्यमिक शाळांची यादी दिसेल, त्यामधील एका माध्यमिक शाळेची निवड विद्यार्थ्याने करावयाची आहे. या माध्यमिक शाळेने परीक्षेचे आवेदनपत्र, अंतर्गत मूल्यमापन, प्रात्यक्षिक/तोंडी, श्रेणी विषय संदर्भातील कामकाज व अनुषंगिक मूल्यमापन तसेच पुढील कार्यवाही करावयाची आहे.
ब) उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ. १२वी) परीक्षेस प्रविष्ट होणाऱ्या खाजगी विद्यार्थ्यांची नावनोंदणी ऑनलाईन पध्दतीने होणार असून नावनोंदणी करतांना विद्यार्थ्यांच्या सध्याच्या पत्त्यातील (Current Address) जिल्हा, तालुका व त्याने निवडलेल्या माध्यम व शाखेनुसार (Stream), त्यास उच्च माध्यमिक शाळा/कनिष्ठ महाविद्यालयांची यादी दिसेल. त्यामधील एका उच्च माध्यमिक शाळा/कनिष्ठ महाविद्यालयाची निवड विद्याथ्यनि करावयाची आहे. या उच्च माध्यमिक शाळा/कनिष्ठ महाविद्यालयाने परीक्षेचे आवेदनपत्र, अंतर्गत मूल्यमापन, प्रात्यक्षिक/तोंडी, श्रेणी विषय संदर्भातील कामकाज व अनुषंगिक मूल्यमापन तसेच पुढील कार्यवाही करावयाची आहे.
११ दिव्यांग विद्यार्थ्यांना खाजगीरित्या प्रविष्ट व्हावयाचे असेल तर त्यांनी त्यांच्या दिव्यांगत्वाचे जिल्हा शल्य चिकित्सकांच्या प्राधिकृत केलेल्या रुग्णालयाच्या प्रमाणपत्र UDID Card ची छायाप्रत प्रमाणित करुन अर्जासोबत सादर करावी व आवश्यकतेनुसार विभागीय मंडळ/माध्यमिक शाळा / कनिष्ठ महाविद्यालयाकडून माहिती प्राप्त करुन घ्यावी.
१२ महाराष्ट्र राज्य मुक्त विद्यालय मंडळामार्फत इ. ५वी किंवा इ. ८वी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना इ. १० वी साठी (१७ नं.) खाजगी विद्यार्थी म्हणून नावनोंदणी करता येईल.
१३ ऑनलाईन अर्ज भरतांना अडचण आल्यास कार्यालयीन वेळेत Website वर दिलेल्या Helpline वर संपर्क साधावा.
१४ पात्र (Eligible) विद्यार्थ्यांना नावनोंदणी प्रमाणपत्र (Enrollment Certificate) ऑनलाईन देण्यात येणार आहे, याची नोंद घ्यावी. तसेच पात्र (Eligible) विद्यार्थ्यांना नावनोंदणी प्रमाणपत्र प्राप्त झाल्यानंतर त्यांनी परीक्षेची आवेदनपत्रे (Examination Form) मंडळाने विहीत केलेल्या कालावधीत परीक्षा शुल्कासह भरणे आवश्यक आहे.
0 Comments