आझादी का अमृत महोत्सव अंतर्गत "हर घर तिरंगा" / "घरोघरी तिरंगा" उपक्रम 13 ऑगस्ट ते 15 ऑगस्ट दरम्यान राबविण्यात येणार आहे.
हर घर तिरंगा अभियान 2024
स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव अंतर्गत "हर घर तिरंगा या उपक्रमाची अंमलबजावणी सन २०२३-२४ मध्ये अतिशय यशस्वी प्रकारे करण्यात आली होती. अनेक कोटी लोकांनी आपल्या स्वताच्या घरावर तिरंगा झेंडा फडकाविला होता. तसेच ६ कोटी लोकांनी दिलेल्या वेबसाईटवर सेल्फी वुईथ तिरंगा अपलोड केले होते.
Selfie with Tiranga Upload Link - Click Here
त्याचप्रमाणे याही वर्षी म्हणजेच दि. १३/०८/२०२४ ते दि. १५/०८/२०२४ या कालावधीत राज्यातील प्रत्येक नागरिकाच्या घरावर तसेच सर्व शासकीय, निमशासकीय, खाजगी आस्थापना, सहकारी संस्था यांच्या कार्यालयांवर राष्ट्रध्वजाची उभारणी करण्याबाबतचा कार्यक्रम यशस्वीपणे राबवायचा आहे.
सदर उपक्रमाचे उद्देश स्वातंत्र्याचा लढा आणि स्वातंत्र्योत्तर काळात देशाने गाठलेले प्रगतीचे टप्पे याबाबत नागरिकांमध्ये जागरूकता निर्माण करणे, देशभक्तीची भावना निर्माण करणे, आणि भारत देश घडविणाऱ्या महान व्यक्तींची आठवण करणे असे आहेत. सबब त्या अनुषंगाने आवश्यक ती कार्यवाही करण्याबाबत आणि हा उपक्रम कार्यान्वित करण्याबाबत आपल्या कार्यक्षेत्रातील सर्व क्षेत्रीय अधिकारी, सर्व शाळांचे मुख्याध्यापक यांना उपरोक्त प्राचार्य, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था आणि शिक्षण अधिकारी यांनी आपल्या स्तरावरून सूचित करावे. तसेच जास्तीत जास्त नागरिकांनी सदर उपक्रमात सहभागी होऊन व्हिडीओ समाज माध्यमांवर शेअर करावेत, याकरिता जिल्ह्यातील नोडल अधिकारी यांनी प्रयत्न करणेबाबत प्राचार्यांनी सूचित करावे.
तसेच जिल्ह्यातील कला व क्रीडा विभागाचे नोडल अधिकारी यांनी सदर कार्यक्रमाचा अहवाल म्हणजे घेतलेले उपक्रम, सहभागी शाळा संख्या, सहभागी विद्यार्थी संख्या, सहभागी नागरिक संख्या, अशा स्वरूपात परिषदेतील कलाक्रीडा विभागाच्या arts.sportsdept@maa.ac.in या ईमेलवर दि. २० ऑगस्ट २०२४ पर्यंत सादर करावा.
हर घर तिरंगा 2024 उपक्रम राबविणे बाबत ग्रामविकास व पंचायत राज विभागाचे परिपत्रक डाउनलोड करा.
हर घर तिरंगा 2024 उपक्रम राबविणे बाबत परिपत्रक डाउनलोड करा.
हर घर तिरंगा 2023 उपक्रम राबविणे बाबत परिपत्रक डाउनलोड करा. 👇
ध्वज संहिता - ध्वज प्रतिज्ञा | ध्वज फडकवणे संबंधित माहिती ची PDF डाउनलोड करा. 👇
हर घर तिरंगा उपक्रम बाबत सर्व माहितीची PDF डाउनलोड करा. 👇
हर घर तिरंगा अभियान 2022
केंद्र शासनाच्या सूचनांनुसार हर घर तिरंगा (घरोघरी तिरंगा) हा उपक्रम दि. १३ ऑगस्ट ते १५ ऑगस्ट, २०२२ या कालावधीत राबविण्यात येत आहे. सदर उपक्रम उच्च व तंत्र शिक्षण विभागांतर्गत शासकीय/ निमशासकीय कार्यालये, सर्व विद्यापीठे, महाविद्यालये, वसतिगृहे, निवासस्थाने, इ. इमारतींवर राष्ट्रध्वज फडकविला जाईल याची खातरजमा सर्व संबंधित अधिकाऱ्यांनी करावी. सदर उपक्रम राबविताना त्यात प्रामुख्याने पुढील बाबींचा समावेश करावा.
१) प्रत्येक विभाग/ उप विभाग, विद्यापीठ / महाविद्यालय, कार्यालय यांच्या वेबसाईटच्या दर्शनी भागावर "घरोघरी तिरंगा" ही टॅगलाईन तसेच तिरंग्याचे चित्र प्रदर्शित करावे.
२) सर्व शासकीय / निम शासकीय अधिकारी/कर्मचारी/शिक्षक/शिक्षेतर कर्मचारी / विद्यार्थी / पालक यांनी समाज माध्यामांद्वारे (फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, व्हॉटसअप, इ.) तिरंग्याविषयक चित्र, संदेश प्रदर्शित करण्यासाठी संबंधित विभाग प्रमुख/कार्यालय प्रमुखांनी आवाहन करावे.
३) उच्च व तंत्र शिक्षण विभागांतर्गत महाविद्यालयीन विद्यार्थ्यामार्फत प्रभात फेरीचे आयोजन करुन या उपक्रमाबाबत पालक व नागरिकांमध्ये प्रचार प्रसार व जाणीव जागृती करावी. त्यामध्ये राष्ट्रीय सेवा योजनेच्या स्वयंसेवकांचा समावेश करून मोठ्या प्रमाणावर आयोजन करता येईल.
४) शासकीय / निम शासकीय इमारतींबरोबरच खाजगी इमारतीवर अथवा राहत्या घरावर तिरंगा फडकविण्याबाबत सर्व अधिकारी / कर्मचारी यांनी पुढाकार घ्यावा. जेणेकरुन इतर नागरिकांमध्ये या उपक्रमाची जागृती निर्माण होण्यास मदत होईल.
५) सांस्कृतिक कार्य विभागाने सदर उपक्रमाच्या जागृती मोहिमेसाठी जिंगल, गीते, ध्वनीचित्रफित इ. ची निर्मिती केली आहे. त्याबाबतची माहिती शासनाच्या https://mahaamrut.org या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. सदर जिंगल्स, गीते, पोस्टर्स, इ.चा वापर शासकीय अधिकारी/कर्मचारी तसेच सर्वसाधारण नागरिकांनी देखील सदर उपक्रमाच्या प्रचार प्रसारासाठी करावा.
६) सदर उपक्रमाकरिता राष्ट्रध्वजाची उपलब्धता महसूल विभागामार्फत तसेच इतर विभागांमार्फत देखील तालुका / गांव पातळीपर्यंत करण्यासंबंधीच्या सूचना यापूर्वीच शासन स्तरावरुन देण्यात आलेल्या आहेत. त्यांच्याकडून सुनिश्चित केलेल्या दराने राष्ट्रध्वज सर्वांना खरेदीसाठी उपलब्ध असतील.
(७) स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव" अंतर्गत विभागाकडून राबविण्यात येत असलेल्या कार्यक्रमांबाबतचे फोटो, चित्रफिती सांस्कृतिक कार्य विभागाच्या वेबसाईटवर अपलोड करण्याची कार्यवाही राज्य संपर्क अधिकारी, राष्ट्रीय सेवा योजना यांचेमार्फत सुरु आहे. त्याचप्रमाणे "घरोघरी तिरंगा कार्यक्रमाचे फोटो, चित्रफिती, इ. मोठ्या प्रमाणावर वेबसाईटवर अपलोड होण्यासाठी राज्य संपर्क अधिकारी, रा.से.यो. यानी विशेष पथक तयार करून त्यांचेमार्फत अपलोड करण्याची कार्यवाही करावी. जेणेकरुन राज्यातील उपक्रमाची जास्तीत जास्त माहिती देश पातळीवर पोहचेल.
८) वरील सर्व उपक्रम राबविताना भारतीय ध्वज संहितेचे पालन होणे आवश्यक असून जाणते अजाणतेपणी राष्ट्रध्वजाचा अवमान होऊ नये याची सर्वांनी दक्षता घेणे आवश्यक आहे. त्यामुळे याबाबत देखील जाणीव जागृती करण्यात यावी.
Join WhatsApp Group
https://chat.whatsapp.com/DjUw24EEnfB2i2F4wtefOO
0 Comments