प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षक क्षमतावृद्धी जिल्हास्तरीय प्रशिक्षण (TOT) आणि तालुकास्तरीय प्रशिक्षण आयोजन करताना घ्यावयाच्या दक्षतेबाबत सूचना | प्रशिक्षण सुविधा व खर्च तपशील
राष्ट्रीय शिक्षण धोरण २०२० नुसार राज्यात शैक्षणिक गुणवत्ता विषयक उपक्रमाची अंमलबजावणी सुरू आहे. त्यासाठी शालेय शिक्षणाच्या सर्व स्तरावरील शिक्षकांचे सक्षमीकरण होणे आवश्यक आहे त्यानुमार राज्यातील प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षक सक्षमीकरण प्रशिक्षण व पर्यवेक्षकीय यंत्रणेसाठी प्रशिक्षण आयोजन राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे मार्फत करण्यात येत आहे.
शिक्षक सक्षमीकरण प्रशिक्षण हे इ.१ली ते ५ वी तसेच ६वी ते ८वी आणि ९वी ते १२वी इयत्तानां शिकविणाऱ्या सर्व शिक्षकासाठी आणि पर्यवेक्षकीय स्वतंत्र असणार आहे. जिल्हास्तर प्रशिक्षण सुरू आहे. सदरील प्रशिक्षण तालुक्यातील स्थानिक स्वराज्य संस्था, शासकीय लावा, खाजगी अनुदानित शाळेतील इयत्ता १ली ते १२वी च्या सर्व शिक्षकांना द्यावयाचे आहे. या प्रशिक्षणाचा कालावधी पाच दिवसाचा असून सदर प्रशिक्षण सहा टप्प्यात पूर्ण होईल.
शिक्षक क्षमतावृध्दी प्रशिक्षण सुट्टी बाबत
शिक्षक क्षमता वृद्धी प्रशिक्षण तालुका स्तरावर सुरु असून त्याचा पहिला टप्पा पूर्ण झाला आहे. दुसऱ्या टप्प्यातील प्रशिक्षणासाठी कालावधी निश्चित करताना दि. 17 ते 21 फेब्रुवारी दरम्यान घेणेबाबत आदेश निर्गत झाले होते. मात्र या कालावधीत दि. 19 फेब्रुवारी रोजी शिवजयंती उत्सव असून शासकीय सुट्टी आहे. शाळा तसेच स्थानिक पातळीवर देखील अनेक कार्यक्रम सर्वत्र आयोजित केले जातात. शिवाय तिसऱ्या टप्प्यातील प्रशिक्षण कालावधीत देखील दि. 26 फेब्रुवारी रोजी महाशिवरात्री या पवित्र सणाची शासकीय सुट्टी आहे. या दोन्ही दिवसांचे महत्त्व विचारात घेऊन प्रशिक्षण कालावधीत आलेला सुट्टीचा दिवस वगळून या दोन्ही टप्प्यातील प्रशिक्षण सुट्टीचा दिवस वगळून एक दिवसासाठी पुढे ढकलण्यात आले आहे.
शिक्षक क्षमतावृध्दी प्रशिक्षण सुट्टी बाबत शासन परिपत्रक
शिक्षक क्षमतावृध्दी 2.0 प्रशिक्षणासाठी सूचना | प्रशिक्षण सुविधा व खर्च तपशील
शिक्षक क्षमतावृद्धी २.० प्रशिक्षणासाठी सर्वसाधारण सूचना-
१. हे प्रशिक्षण शासकीय, स्थानिक स्वराज्य संस्था व खाजगी अनुदानित शाळांमधील इ. १ ली ते ५ वी तसेच इ. ६ वी ते ८ वी आणि इ. ९ वी ते १२ वी इयत्तांना शिकविणाऱ्या सर्व माध्यमांच्या शिक्षकासाठी लागू असेल.
२. जिल्हा व तालुकास्तरासाठी अपेक्षित प्रशिक्षणार्थी संख्या निश्चित करुन देण्यात आलेली आहे त्या मर्यादेत प्रशिक्षण प्रत्येक घटकास दिले जाईल असे नियोजन करावे.
३. या प्रशिक्षणाचा कालावधी एकूण ०५ दिवस असून एका वर्गामध्ये ५०-६० प्रशिक्षणार्थी याप्रमाणे बैठक व्यवस्था करावी.
४. यापूर्वी बैठकीमध्ये दिलेल्या सूचनांनुसार दोन प्रशिक्षण वर्गासाठी ०४ तज्ज्ञ मार्गदर्शक व पुढील प्रत्येक वर्गासाठी अतिरिक्त ०२ तज्ज्ञ मार्गदर्शक घ्यावेत परंतु, प्रत्यक्षात प्रत्येक वर्गाचे आर्थिक हिशेब सादर करताना प्रतिवर्ग ०२ तज्ज्ञ मार्गदर्शक असे करुन सादर करावे.
५. प्रशिक्षणासाठी दिलेल्या विषयांनुसार एक तासिका ९० मिनिटांची याप्रमाणे ०५ दिवस दररोज ०४ तासिका होतील.
६. प्रशिक्षणादरम्यान घ्यावयाच्या प्रत्येक तासिकेचे नियोजन व आशय ppt यास्तरावरुन पुरविण्यात आलेले आहेत. त्यानुसार चर्चा, सादरीकरण, गटकार्य, प्रात्यक्षिक पूर्ण होतील याची दक्षता घ्यावी.
७. प्रशिक्षणार्थी यांचेसाठी पूर्वचाचणी, उत्तरचाचणी आणि अभिप्राय फॉर्म ऑनलाईन स्वरुपात SCERTM मार्फत पुरविण्यात येईल. त्यामध्ये सर्व प्रशिक्षार्थी वेळचेवेळी नोंदी करतील याचा आढावा घ्यावा.
८. जिल्हास्तरीय प्रशिक्षण निवासी स्वरुपाचे असेल व त्यानंतर तालुकास्तर प्रशिक्षण हे अनिवासी स्वरूपाचे असेल.
९. इयत्ता. १ ते ५, ६ ते १२ व पर्यवेक्षकीय यंत्रणा प्रशिक्षण नोंदी स्वतंत्र ठेवाव्यात. प्रत्येकाचे खर्चाचे लेखाशीर्ष स्वतंत्र आहे. त्यानुसार निधी मागणी व वितरण होईल.
शिक्षक क्षमतावृध्दी प्रशिक्षण खर्च लेखाशीर्ष (१-५ साठी)-
STARS Project- SIG ३: Improved Teachers Performance and Classroom Practice
३.२: Learning Enhancement Programme.
a) Capacity Building of Primary Teachers (Grade १-५)
११. खर्च लेखाशीर्ष (६-८ साठी) -
SAMAGRA SHIKSHA-Scheme- १: Elementary Education.
Activity- ५.७.१: In-service training (Elementary) (VI-VIII)
१२. खर्च लेखाशीर्ष (९-१२ साठी) आणि (पर्यवेक्षकीय यंत्रणा प्रशिक्षासाठी)-
SAMAGRA SHIKSHA-Scheme- २: Secondary Education Component: Quality Interventions,
Activity- ३.२.१: In-Service Training (IX-XII)
१३. पर्यवेक्षकीय यंत्रणेसाठी प्रशिक्षण-
2. तालुकास्तर शिक्षक प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर पर्यवेक्षकीय यंत्रणेसाठी ०२ दिवसांचे स्वतंत्र प्रशिक्षण आयोजित करावे,
b. पर्यवेक्षकीय यंत्रणेसाठीच्या प्रशिक्षणामध्ये पुढील विषयांचा समावेश करावा - NEP-२०२०, SCF-SE, SCF-FS, CBA-२ क्षमताधारित मूल्यांकन संकल्पना, HPC संकल्पना, SQAAF- १, SQAAF- २, SQAAF-३ (एकूण-८)
c. पर्यवेक्षकीय यंत्रणेसाठीच्या प्रशिक्षणासाठी सर्व जिल्हास्तरीय व क्षेत्रीय अधिकारी जसे प्राचार्य, शिक्षणाधिकारी, वरिष्ठ अधिव्याख्याता, अधिव्याख्याता, संबंधित तालुक्यातील गटशिक्षणाधिकारी, प्रशासन अधिकारी, विस्तार अधिकारी, पर्यवेक्षक, केंद्रप्रमुख, साधनव्यक्ती यांचा समावेश करावा.
d. पर्यवेक्षकीय यंत्रणेसाठीचे प्रशिक्षण २-३ तालुके एकत्र करुन आयोजित करावे, एका प्रशिक्षण स्थळावर किमान ०२ वर्ग व ०४ तज्ज्ञ मार्गदर्शक असतील असे नियोजन करावे.
१४. खर्चाच्या बाबी व निकष (प्रशिक्षण, प्रशिक्षणार्थी व तज्ज्ञ मार्गदर्शक यांचेसाठी)
1. आर्थिक तरतूदीनुसार निधी प्राप्त झाल्यानंतर PFMS च्या माध्यमातून अदा करण्यात येईल.
ii. नेमून दिलेल्या मर्यादेत खर्चाचे नियोजन करावे. सर्व खर्च व देयके, अभिलेखे वित्तीय नियमानुसार ठेवली जातील याची दक्षता घ्यावी,
१५. आपल्या कार्यक्षेत्रातील शासकीय, स्थानिक स्वराज्य संस्था व खाजगी अनुदानित शाळांमधील इ. १ली ते १२वी इयत्तांना शिकविणाऱ्या सर्व शिक्षकांचे जिल्हा व तालुकास्तरीय प्रशिक्षण क्षमतावृद्धी २.० प्रशिक्षण तसेच सर्व पर्यवेक्षकीय अधिकाऱ्यांचे प्रशिक्षण निर्धारित वेळेत पूर्ण केले जाईल याची दक्षता गटशिक्षणाधिकारी, प्रशासन अधिकारी यांनी घ्यावी. प्राचार्य डाएट व शिक्षणाधिकारी (प्राथमिक व माध्यमिक) यांनी संनियंत्रण करावे.
संचालक
राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे.
राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० च्या अनुषंगाने राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र, पुणे या कार्यालयामार्फत राज्यातील माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षकांच्या क्षमता वृद्धी जिल्हास्तरीय प्रशिक्षकांचे प्रशिक्षण आणि तालुकास्तरीय प्रशिक्षणाचे आयोजन दिलेल्या वेळापत्रकानुसार करण्याबाबत कळविण्यात आले होते.
तथापि इयत्ता १० वी आणि १२ वी बोर्ड परीक्षांच्या अनुषंगाने परीक्षा कालावधीमध्ये शासकीय आणि अनुदानित शाळांमधील मुख्याध्यापक, पर्यवेक्षक, शिक्षक यांना परिरक्षक, केंद्रप्रमुख, पर्यवेक्षण इत्यादी कामकाजासाठी परीक्षा मंडळाकडून नियुक्त्या देण्यात आलेल्या आहेत.
सदर पार्श्वभूमीवर तालुकास्तर प्रशिक्षण वर्गांचे आयोजन करताना आणि प्रशिक्षणार्थी म्हणून आदेश देताना मुख्याध्यापक, पर्यवेक्षक आणि शिक्षक यांच्या सदर कामकाजाचा कालावधी लक्षात घेऊन प्रशिक्षण वर्गांचे आयोजन करावे. ज्या प्रशिक्षणार्थी मुख्याध्यापक, शिक्षक यांना अशा नियुक्त्या नाहीत अशा प्रशिक्षणार्थीचे प्रशिक्षण प्रथम टप्यात आणि जसजसे प्रशिक्षणार्थी या परीक्षा कामकाजातून कार्यमुक्त होतील या बेताने उर्वरित प्रशिक्षण वर्गांचे आयोजन आपल्या स्तरावरून करण्यात यावे.
कोणत्याही प्रकारे बोर्ड परीक्षांच्या व्यवस्थापनामध्ये प्रशिक्षणामुळे अडथळा येणार नाही याची जिल्हा व तालुका प्रशासनाने सर्वोतोपरी दक्षता घ्यावी तसेच २० मार्च २०२४ पर्यंत तालुक्यातील माध्यमिक व उच्च माध्यमिक स्तरावरील १०० टक्के शिक्षकांचे प्रशिक्षण टप्याटप्याने पूर्ण होईल याकडेही लक्ष द्यावे.
शिक्षक क्षमता वृद्धी प्रशिक्षण PDF 1 - Click Here
शिक्षक क्षमतावृध्दी प्रशिक्षण PDF 2 - Click Here
SQAAF राज्य अभ्यासक्रम आराखडा PPT/PDF 3 - Click Here
प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षक क्षमतावृद्धी जिल्हास्तरीय प्रशिक्षण शासन परिपत्रक डाउनलोड करा. - Click Here
0 Comments