Latest Update

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

शासकीय व निमशासकीय कर्मचारी व त्यांचे कुटुंबिय यांचे १०० % आयुष्मान कार्ड निर्माण करण्यात येणार | आयुष्यमान कार्ड निर्माण करण्याकरिता वेबसाइट https://beneficiary.nha.gov.in | https://abha.abdm.gov.in/

शासकीय व निमशासकीय कर्मचारी व त्यांचे कुटुंबिय यांचे १००% आयुष्मान कार्ड निर्माण करण्यात येणार आहे. सदर कार्ड निर्माण झाल्याने सर्व कर्मचारी यांना रुपये 5 लक्ष प्रती कुटुंब प्रतिवर्ष आरोग्य विषयक लाभ मिळण्यास पात्र आहेत. 




१००% कर्मचाऱ्यांचे आयुष्मान कार्ड निर्माण करणेबाबत परिपत्रक 22 मे 2026

राज्यातील सर्व जिल्हा परिषद व खाजगी १०० टक्के अनुदानित शाळांमधील कर्मचाऱ्यांचा आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेमध्ये समावेश करुन कर्मचाऱ्यांना कॅशलेस वैद्यकिय सुविधा उपलब्ध करुन देण्याबाबत मागणी केली होती.

त्याअनुषंगाने आभा कार्ड काढण्याची कार्यपध्दती तसेच व्हिडीयो लिंक या पत्रासोबत जोडण्यात येत आहे. त्यानुसार सर्व शिक्षक/शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी आभा कार्ड काढणे अनिवार्य आहे. यापुढे कोणत्याही कर्मचाऱ्याचे रु ५.०० लाखापर्यंतचे वैद्यकीय प्रतिपूर्तीचे देयक स्विकारले जाणार नाही.

कर्मचाऱ्यांचे आयुष्यमान कार्ड निर्माण करणे व वैद्यकीय प्रतिपूर्ती देयकाबाबत परिपत्रक 22 मे 2026 -  Click Here


आयुष्मान कार्ड निर्माण करण्याकरिता वेबसाइट

ABHA Card Website

https://beneficiary.nha.gov.in/

आभा हेल्थ कार्ड कसे काढावे?

How to create Abha Card? 

आभा (ABHA - आयुष्मान भारत हेल्थ अकाउंट) कार्ड हे तुमच्या आरोग्याची सर्व माहिती डिजिटल स्वरूपात सुरक्षित ठेवण्यासाठी एक १४ अंकी ओळखपत्र आहे. तुम्ही हे कार्ड ऑनलाइन (मोबाईल/कॉम्प्युटर) किंवा ऑफलाइन (रुग्णालय/CSC केंद्र) अत्यंत सोप्या पद्धतीने मोफत काढू शकता.


ऑनलाइन नोंदणी प्रक्रियाः

अधिकृत संकेतस्थळः नॅशनल डिजिटल हेल्थ मिशनच्या ABHA नोंदणी पोर्टलवर जा。


Create ABHA Number: मुख्य पानावर 'Create ABHA Number' हा पर्याय निवडा,


आधार कार्ड किंवा ड्रायव्हिंग लायसन्सः नोंदणीसाठी आधार कार्ड किंवा ड्रायव्हिंग लायसन्सचा वापर करा.


ओटीपी पडताळणीः तुमच्या आधार कार्डशी लिंक असलेल्या मोबाईल क्रमांकावर आलेला OTP (One Time Password) टाका.

shaleyshikshan.in

आभा ॲड्रेस (ABHA Address) तयार कराः तुमचे नाव किंवा पसंतीचा युझरनेम टाका。


कार्ड डाउनलोडः यशस्वी नोंदणीनंतर तुमचे १४ अंकी आभा कार्ड स्क्रीनवर दिसेल, ते तुम्ही PDF स्वरूपात डाउनलोड करू शकता.


ऑफलाइन नोंदणी प्रक्रियाः

जर तुमच्याकडे मोबाईल किंवा इंटरनेट नसेल, तर तुम्ही तुमच्या जवळच्या सरकारी रुग्णालयात किंवा अधिकृत कॉमन सर्व्हिस सेंटर (CSC) ला भेट देऊ शकता. तिथे तुमचे आधार कार्ड आणि ओळखपत्र दाखवून संबंधित कर्मचारी तुम्हाला आभा कार्ड तयार करून देतील.


टीप: हे कार्ड काढण्यासाठी आधार कार्ड असणे अनिवार्य नसले, तरीही ते असल्यास नोंदणी प्रक्रिया अतिशय सोपी होते.



१००% कर्मचाऱ्यांचे आयुष्यमान कार्ड निर्माण करणेबाबत परिपत्रक 10 नोव्हेंबर 2025

संदर्भ 

१. मा. सचिव २ सार्वजनिक आरोग्य विभाग यांचे पत्र क्र. PHD/३७/२०२५-MJPJAY/AB-PMJAY दि. १३.०८.२०२५

२. जिल्हा शल्य चिकित्सक, सिंधुदूर्ग यांचे पत्र क्र जिशचिसिं/ MJPJAY/आ. का/१५०९४-९७/२०२५-२६ दि. ३०.१०.२०२५


एकत्रित आयुष्मान भारत प्रधान मंत्री जन आरोग्य योजना व महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेंतर्गत राज्यातील शासकीय कार्यालयांमध्ये कार्यरत असलेल्या शासकीय आणि निमशासकीय अधिकारी/कर्मचा-यांच्या कार्ड निर्माणाकरीता सुचना देण्यात आल्या अहेत. त्यानुसार सर्व शासकीय आणि निमशासकीय अधिकारी व कर्मचारी तसेच त्यांचे कुटुंबीय हे सुद्धा राज्याच्या महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत रुपये 5 लक्ष प्रती कुटुंब प्रतिवर्ष आरोग्य विषयक लाभ मिळण्यास पात्र आहेत. यासाठी सर्व शासकीय आणि निमशासकीय अधिकारी व कर्मचारी यांनी स्वतःचे आणि त्यांच्या कुटुंबीयांचे तसेच आप्तस्वकीयांचे आयुष्मान कार्ड Beneficiary Login मधून निश्चित कालावधीत निर्माण करावे यासाठी प्रत्येक शासकीय कार्यालयाने आदेश निर्गमित करावेत आणि त्याबाबतची माहिती स्वतंत्रपणे संकलित करून सादर करण्याबाबत कळविण्यात आले होते.


वरिल सूचनानुसार दि. १६ ऑगस्ट २०२५ ते ७ सप्टेंबर २०२५ या कालावधीतील विशेष मोहिमेदरम्यान शासकीय व निमशासकीय कर्मचारी आणि त्यांचे कुटुंबीय यांच्या कार्ड निर्माणाबाबतचा अहवाल या कार्यालयास प्राप्त झालेले नाहीत.


आता संदर्भ २ च्या पत्राने जिल्हाधिकारी सिंधुदूर्ग यांनी विशेष शिबीरांचे आयोजन करून जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा परिषद, जिल्हा पोलिस अधिक्षक कार्यालय, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, जिल्हा समाजकल्याण कार्यालय इ. ठिकाणी शिबीरांचे आयोजन करून शासकीय आणि निमशासकीय अधिकारी/कर्मचारी यांचे आयुष्मान कार्ड तयार करण्याचे नियोजन केले आहे.


सिंधुदूर्ग जिल्ह्याच्या धर्तीवर इतर सर्व जिल्ह्यांत सर्व कार्यालयातील शासकीय आणि निमशासकीय अधिकारी/कर्मचारी (कंत्राटी कर्मचा-यांसह) यांचे व त्यांच्या कुटुंबीयांचे १०० टक्के आयुष्मान कार्ड निर्माण करण्यात यावेत. आयुष्यमान कार्ड निर्माण करण्याकरीता कालबद्ध कार्यक्रम निश्चित करावा तसेच याबाबत सर्व कार्यालय प्रमुख यांना लेखी सुचना निर्गमित कराव्यात. अशा कर्मचा-यांसाठी Beneficiary लॉगीनद्वारे कार्ड निर्माणाकरीता मार्गदर्शन करण्यासाठी प्रत्येक कार्यालयात आशा सेविका व आरोग्यमित्र यांच्या मदतीने शिबीरे आयोजीत करण्यात येणार आहेत. 

आयुष्यमान कार्ड निर्माण करण्याकरिता वेबसाइट

https://beneficiary.nha.gov.in/


शासकीय व निमशासकीय कर्मचारी व त्यांचे कुटुंबिय यांचे १०० % आयुष्मान कार्ड निर्माण करणेबाबत परिपत्रक डाउनलोड करा. Click Here

Post a Comment

0 Comments

close