SQAAF self assessment Registration | How to fill SQAAF self assessment? शाळा गुणवत्ता मूल्यांकन आणि आश्वासन आराखडा नोंदणी कशी करावी? माहिती कशी भरावी? संबंधित मानकांचे फोटो अपलोड कसे करावे? गुगल ड्राईव्ह फोल्डर व लिंक कशी तयार करावी? SQAAF संबंधित सर्व कामे कशी करावीत याविषयी माहिती जाणून घेऊया. School Quality Assessment and Assurance Framework Registration and self assessment
शाळा गुणवत्ता मूल्यांकन आणि आश्वासन आराखडा PDF download
School Quality Assessment and Assurance Framework PDF download
SQAAF संबंधित Video, PDF, शासन निर्णय व परिपत्रके पहा. Click Here
SQAAF शाळानिहाय लागू मानके PDF - Click Here
SQAAF 128 मानकांची माहिती PDF - Click Here
SQAAF Blank Form PDF | SQAAF कोरा फॉर्म PDF - Click Here
मुदतवाढ - SQAAF ऑनलाईन भरण्यास माहिती भरण्यास 31 मार्च पर्यंत मुदतवाढ देणेबाबत परिपत्रक
1️⃣ SQAAF अंतर्गत शाळेचे खाते कसे तयार करायचे?
1) scert-data.web.app या लिंक ला क्लिक करा.
SQAAF Web Portal - https://scert-data.web.app/
2) आता तुमच्यासमोर SQAAF चा इंटरफेस येईल. यात.
अ) खाते तयार करा
ब) लॉगिन
क) पासवर्ड बदला
हे तीन विंडो दिसतील.
3) "खाते तयार करा" या विंडो ला क्लिक करा.
यात तुम्हाला पुढील विंडो दिसतील.
अ) येथे ईमेल प्रविष्ठ करा - यात शाळेचा किंवा मुख्याध्यापकांचा ईमेल टाईप करावा.
ब) या संकेतस्थळासाठीचा पासवर्ड लिहा- यात तुमचा पासवर्ड तयार करा.
(पासवर्ड कमीत कमी 8 अक्षरी असावा 1 कॅपिटल, 1 स्मॉल, 1 स्पेशल कॅरेक्टर,1 अंक सर्व मिळून 8)
क) बनवलेल्या पासवर्ड ची पुष्टी/खात्री करा - यात तुम्ही जो पासवर्ड तयार केला आहे तोच पुन्हा प्रविष्ठ करा.
4) आता खाते तयार करा या विंडो ला क्लिक करा.
5) आता तुम्ही जो ईमेल एंटर केला होता त्या gmail वर जा. तुम्हाला SQAAF कडून शाळा व्हेरिफाय करण्यासाठी एक मेल येईल. त्यावर क्लिक करा व तुमची शाळा व्हेरिफाय करा.
6) आता पुन्हा scert-data.web.app या लिंक ला क्लिक करा.
7) आता तुमच्या स्क्रीन वर जो इंटरफेस येईल त्यातील लॉगिन या विंडो ला क्लिक करा.
8)आता तुम्हाला 2 विंडो दिसतील.
अ) येथे ईमेल प्रविष्ठ करा.
आता जो ईमेल तुम्ही अगोदर प्रविष्ठ केला होता तोच ईमेल या विंडो मध्ये टाईप करा.
ब) या संकेतस्थळासाठीचा पासवर्ड लिहा.
यात तुम्ही जो पासवर्ड तयार केला आहे तो टाईप करा.
क) लॉगिन - आता लॉगिन वर क्लिक करा.
https://scert-data.web.app/
9) आता तुम्ही तुमच्या शाळेच्या SQAAF च्या साईट वर आला आहात.
10) तुम्हाला एकूण 128 मानके दिसत आहेत. त्यापैकी काही मानके तुमच्या शाळेला लागू नाहीत. शिवाय प्रत्येक मानकाला क्लिक केल्यावर मुख्य मानकामध्ये आणखी काही उपमानके आहेत.
शाळा गुणवत्ता मूल्यांकन आणि आश्वासन आराखडा वेब पोर्टल लिंक - Click Here
SQAAF web link - https://scert-data.web.app/
शाळा प्रकार / माध्यमनिहाय शाळांसाठी लागू असलेली मानके PDF डाउनलोड करा. - Click Here
मानक क्रमांक निहाय कोणते पुरावे जोडावेत?
मानक क्र. 1 ते 128 पुरावे यादी - Click Here
2️⃣ किती मानके भरावीत?
उत्तर - सर्वप्रथम आपल्या शाळेला किती मानके भरायची आहेत व किती लागू नाहीत हे पहा. लागू नसलेली मानके भरायची नाहीत.
3️⃣ SQAAF म्हणजे शाळेतील सर्व शिक्षकांचे टीम वर्क
उत्तर - SQAAF हे शाळेतील सर्व शिक्षकांनी एकत्रित करायचे टीम वर्क आहे. त्यामुळे लागू नसलेली मानके वगळून जेवढी मानके येतात त्यांना आपल्या शाळेतील एकूण शिक्षक संख्येने भाग द्या व जे उत्तर येईल तेवढी मानके प्रत्येक शिक्षकांनी भरावीत त्यामुळे काम सोपे व एकदम लवकर होईल.
उदाहरण - 128 मानकांपैकी 14 मानके तुम्हाला भरायची नाहीत म्हणजे 128-14=114 मानके भरायची आहेत. तुमच्या शाळेत 20 शिक्षक आहेत असे गृहीत धरू. म्हणजे 114÷20=5.7म्हणजे 14 शिक्षकांना 6 मानके भरायची आहेत व उरलेल्या 6 शिक्षकांना 5 मानके भरायची आहेत.
SQAAF बाबत मुख्याध्यापक यांचेसाठी सर्वसाधारण सूचना PDF - Click Here
4️⃣ SQAAF अंतर्गत मानकांच्या डॉक्युमेंट्स pdf कशा तयार कराव्यात?
उत्तर
1) दिलेल्या 128 मानकांना क्लिक केल्यावर तुम्हाला त्यात पुन्हा 3 ते 6 उप मानके दिसतील.
2) त्या त्या उप मानकात जे वर्णन दिले आहे त्या वर्णनाशी संबंधित फोटो/डॉक्युमेंट यांची pdf कॉपी तयार करावी.
उदाहरण
1) तुम्ही मानक क्रमांक 1 या विंडो ला ओपन केले. त्यात तुम्हाला 4 उप मानके दिसत आहेत. त्यात उप मानक क्र -1 शी संबंधित जे काही डॉक्युमेंट असतील ते तयार करावेत.
2) उप मानक क्र-2 शी संबंधित जे काही डॉक्युमेंट असतील ते तयार करावेत.
3) उप मानक क्र-3 शी संबंधित जे डॉक्युमेंट असतील ते तयार करावेत.
या प्रमाणे ज्या ज्या उप मानकांचे जे जे डॉक्युमेंट तयार होऊ शकतात त्या प्रत्येक उप मानकांचे डॉक्युमेंट तयार करून घ्यावेत.
3) प्रत्येक उप मानकाच्या डॉक्युमेंट्स ची एकच pdf फाईल बनवावी.
5️⃣ गुगल ड्राईव्ह ला SQAAF चे फोल्डर बनवणे व pdf फाईल अपलोड करणे.
उत्तर
1) ज्या ज्या शिक्षकांकडे जेवढी मानके बनवण्याचे निर्धारित झाले आहे त्या त्या शिक्षकांनी आपापल्या गुगल ड्राईव्ह वर SQAAF नावाचे एक मुख्य फोल्डर बनवावे.
2) त्या मुख्य फोल्डर च्या आत तुम्हाला ज्या ज्या क्रमांकाच्या मानकाचे डॉक्युमेंट अपलोड करायचे आहेत त्या प्रत्येक मानकाच्या क्रमांकाचे पुन्हा एक मुख्य फोल्डर बनवून घ्या.
3) प्रत्येक मानकाच्या फोल्डर च्या आत असलेल्या प्रत्येक उप मानाकाची वेगवेगळी माहिती देणाऱ्या डॉक्युमेंट्स ची एक वेगळी वेगवेगळी pdf फाईल बनवायची आहे.
उदाहरण
मानक क्रमांक 1 मध्ये 4 उप मानके आहेत तर प्रत्येक उप मानकांची माहिती देणारी फोटो व इतर घटकांची एकत्रित pdf फाईल बनवावी
उदाहरण
मानक क्र -1 मध्ये 4 उप मानके आहेत तर.
अ) मानक क्र - 1 हा मुख्य फोल्डर तयार होईल
ब) या मानक क्र - 1 च्या फोल्डर च्या आत चारही उप मानकांची माहिती देणाऱ्या pdf फाईल असतील
क) त्या प्रत्येक pdf फाईल ला.
मानक 1-1
मानक 1-2
मानक 1-3
मानक 1-4
अशी नावे द्यावीत.
त्या त्या फाईल ची लिंक त्या त्या उप मानकाला क्लिक करून लिंक कॉपी करा व मगच SQAAF च्या प्रत्येक उप मानाकाला क्लिक करून त्या त्या उप मानकाच्या संबंधित ड्राईव्ह च्या विंडो मध्ये पेस्ट करायची आहे व सबमिट बटण क्लिक करायचे आहे
6️⃣ अपलोड केलेल्या प्रत्येक मानकांच्या उप फोल्डर च्या pdf फाईल ला "anyone with the लिंक" हा access देणे
1) तुम्ही प्रत्येक मानकांची जी pdf फाईल तुमच्या SQAAF फोल्डर मध्ये अपलोड केली आहे. त्या PDF फाईल च्या उजव्या बाजूला जे तीन बिंदू आहेत त्याला क्लिक करा.
2) त्यात 2 नंबर चा पर्याय manage access ला क्लिक करा.
3) आता तुम्हाला 2 नंबरचे Restricted हे असा विंडो दिसेल त्यावर क्लिक करा.
4) पुन्हा Restricted असा विंडो दिसेल. त्यावर क्लिक करा.
5) आता Anyone With the link यावर क्लिक करा व अपडेट झाल्यावर ड्राईव्ह च्या बाहेर या.
7️⃣ प्रत्येक मानाकाच्या फाईल ची गुगल ड्राईव्ह लिंक बनवणे.
SQAAF या मुख्य फोल्डर च्या आत तुम्ही प्रत्येक मानकांच्या ज्या pdf फाईल अपलोड केल्या आहेत त्या प्रत्येक pdf फाईल ची लिंक बनवायची आहे.
1) pdf फाईल च्या उजव्या बाजूला जे 3 बिंदू दिले आहेत त्याला क्लिक करा.
2) आता तुम्हाला 4 थ्या क्रमांकावर copy link चा पर्याय दिसेल. त्यावर फक्त क्लिक करा. त्या मानकाच्या pdf फाईल ची लिंक आपोआपच कॉपी होईल.
3) आता ती लिंक त्या त्या मानकाचा नंबर देवून तुमच्या वैयक्तिक व्हॉट्सअप अकाऊंट वर कॉपी करून पेस्ट करा.
4) अशा रीतीने प्रत्येक शिक्षकाने त्यांना जेवढ्या मानकांचे काम करायचे आहे तेवढ्या मानकांच्या लिंक तयार करून घ्या.
8️⃣ SQAAF च्या साईट वर त्या त्या मानकांचा विंडो ओपन करून त्या त्या मानकाच्या गुगल ड्राईव्ह ची लिंक भरणे व माहिती सबमिट करणे
1) SQAAF ची साईट ओपन करा.
2) तुम्हाला ज्या मानकाची गुगल ड्राईव्ह ची लिंक भरायची आहे ते मानक ओपन करा.
3) आता त्या मुख्य मानकातील प्रत्येक उपमानकाची गुगल ड्राईव्ह ची लिंक जी तुम्ही तुमच्या व्हॉट्सॲप वर पेस्ट करून ठेवली आहे ती पुन्हा कॉपी करा. जर अगोदरच तुम्हाला कोणत्या उप मानकाची लिंक भरायची आहे हे तुमचे निश्चित झाले असेल तर अगोदरच त्या मुख्य मानकाच्या उप मानकाची लिंक कॉपी करून SQAAF ड्राईव्ह ओपन करा.
4) आता जे मानक तुम्ही ओपन केले आहे त्यातील ज्या उप मांकाची लिंक तुम्हाला भरायची आहे त्या उप मान कावर क्लिक करा. ताबडतोब ते उप मानक आकाशी रंगाचे होईल.
5) आता सर्वात खाली "पुरावे" या विंडो वर या.
6) "उपरोक्त विषयांचे समर्थन करणारी....." असे वाक्य ज्या विंडो मध्ये लिहिले आहे त्या विंडो वर क्षणभर बोट दाबून धरा.
तुम्हाला paste असा शब्द दिसला की त्यावर क्लिक करा व तुम्ही उप मानकाची जी लिंक कॉपी केली होती ती पेस्ट करा.
7) ताबडतोब तुम्हाला सबमिट हे बटण हाय लाईट झालेले दिसेल त्यावर क्लिक करा व माहिती सबमिट करा.
8) अशा रीतीने सर्व मुख्य मानकांच्या उप मानकांची लिंक भरा व सबमिट करा व SQAAF चे काम पूर्ण करा.
0 Comments