Latest Update

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

माणुसकीला सलाम! 20 चिमुकल्यांचे प्राण वाचवताना अंगणवाडी सेविका कांचनबाई मेघवाल यांचे बलिदान!

माणुसकीला सलाम! 20 चिमुकल्यांचे प्राण वाचवताना अंगणवाडी सेविका कांचनबाई मेघवाल यांचे  बलिदान!



एका अंगणवाडी सेविकेने स्वत:च्या जीवाची बाजी लावत गावातील 20 मुलांचे प्राण वाचवल्याची घटना घडली आहे. या महिलेच्या धाडस आणि प्रेमाचे सर्वत्र कौतुक होताना दिसत आहे. मध्य प्रदेशातील कांचनबाई मेघवाल (40) असं या अंगणवाडी सेविकेचं नाव आहे. अचानक मधमाशांचा थवा 20 मुलांवर अंगावर कोसळला होता. या महिलेने स्वत: च्या जीवाची पर्वा न करता या मुलांचे प्राण वाचवले. मात्र, दुसऱ्या बाजूल मधमाशांनी केलेल्या हल्ल्यात या  अंगणवाडी सेविकेचा मृत्यू झाला आहे. मात्र, अंगणवाडी सेवेकेच्या पराक्रमाचे सर्वत्र कौतुक केलं जात आहे.






आपल्या पोटच्या नसलेल्या, पण आपल्याच लेकरांसारख्या चिमुकल्यांना वाचवण्यासाठी एका मातेने स्वतःच्या प्राणांची आहुती दिली…ही बातमी डोळे पाणावणारी आणि माणुसकीवरचा विश्वास दृढ करणारी आहे.

मध्यप्रदेशातील नीमच जिल्ह्यातील रानपूर गावात एका अंगणवाडी केंद्रावर अचानक मधमाशांचा भीषण हल्ला झाला. अंगणवाडीत असलेली लहान मुले घाबरून सैरावैरा पळू लागली. त्याच क्षणी अंगणवाडी सेविका कंचन बाई मेघवाल यांनी क्षणाचाही विचार न करता स्वतःचा जीव धोक्यात घालून 20 निष्पाप मुलांना सुरक्षित ठिकाणी पोहोचवले. मुलांचे प्राण वाचले पण कांचन बाई स्वतः मात्र मधमाशांच्या भीषण हल्ल्याला बळी पडल्या. गंभीर अवस्थेत त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.


नेमकी कशी घडली घटना?

मध्य प्रदेशातील मडवडा पंचायतीतील रानपूर अंगणवाडी केंद्रात ही घटना घडली आहे. मधमाशांचा एक मोठा थवा अचानक अंगणात खेळणाऱ्या मुलांवर कोसळला होता. त्याच क्षणी, केंद्रातील स्वयंपाकी कांचनबाई मेघवाल यांनी स्वतःच्या सुरक्षेचा विचार न करता जवळच पडलेले ताडपत्री आणि चटई घेतली. एक एक करुन, तिने मुलांना गुंडाळले, स्वतःच्या शरीराने त्यांचे रक्षण केले आणि त्यांना केंद्रात नेले. ती मधमाश्या आणि मुलांच्या मध्ये उभी असतानाच, मधमाशांनी तिच्यावर हल्ला केला. शेकडो मधमाश्यांनी तिला चावा घेतला. तरीही, शेवटचे मूल सुरक्षित होईपर्यंत ती मागे हटली नाही. गावकरी मदतीसाठी धावले तोपर्यंत कांचनबाई कोसळल्या होत्या होत्या. तिला तातडीने रुग्णालयात नेत्यात आले मात्र, डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. तिच्या शरीरावर असंख्य मधमाशांनी डंक केले होते.


कांचनबाई यांच्या कुटुंबाला कुटुंबाला आर्थिक मदत देण्याची मागणी

कांचनबाई फक्त अंगणवाडी सेविका नव्हत्या. त्या गावातील मुलांसाठी मध्यान्ह जेवण बनवत होत्या, जय माता दी स्वयंसहायता गटाच्या अध्यक्षा होत्या आणि त्यांच्या कुटुंबाचा एकमेव आधारस्तंभ होत्या. त्यांचे पती शिवलाल हे आजाराने ग्रस्त आहेत. त्यांच्या मागे एक मुलगा आणि दोन मुली आहेत. शवविच्छेदनानंतर त्यांचा मृतदेह रानपूर गावात पोहोचला, तेव्हा गावकरी शांतपणे उभे राहिले आणि ज्या महिलेचे धाडस शब्दांत आवरता येत नाही तिला सलाम केला. गावात अजूनही भीतीचे वातावरण आहे. अंगणवाडी केंद्राजवळ एका झाडावर एक मोठा मधमाशांचा पोळा लटकलेला आहे, जिथे गावाचा एकमेव हातपंप आहे. पुन्हा एकदा हल्ला होण्याची भीती असल्याने रहिवाशांनी पाणी आणणे बंद केले आहे. गावकरी मधमाशांचा पोळा त्वरित काढून टाकण्याची आणि कांचनबाईंच्या शोकाकुल कुटुंबाला आर्थिक मदत देण्याची मागणी करत आहेत.


कांचन बाईंचं धाडस, माया आणि कर्तव्यनिष्ठा ही एका खऱ्या ‘सुपरवुमन’ची ओळख आहे.

त्यांचं बलिदान व्यर्थ जाणार नाही, तर ते अनेक पिढ्यांना प्रेरणा देत राहील. संपूर्ण गावावर शोककळा पसरली असून, एका आईच्या मायेने 20 लेकरांना नवे आयुष्य दिले आहे.

🙏 कांचनबाई मेघवाल यांच्या आत्म्यास शांती लाभो.

त्यांच्या अदम्य साहसाला आणि माणुसकीला आमचा मानाचा सलाम!

Post a Comment

0 Comments

close