Latest Update

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

'परीक्षा पे चर्चा 2024' live Telecast कार्यक्रमाचे फोटो MyGov.in वर अपलोड करावेत. | 29 जानेवारी 2024 रोजी भारत मंडपम, प्रगती मैदान, नवी दिल्ली येथे सकाळी 11.00 वाजता

केंद्र शासनामार्फत 'परीक्षा पे चर्चा 2024' हा कार्यक्रम दिनांक 29 जानेवारी 2024 रोजी आयोजित केलेला आहे. सदर कार्यक्रमाअंतर्गत मा. पंतप्रधान महोदय, विद्यार्थी, शिक्षक व पालक यांचेशी 'परीक्षा पे चर्चा 2024' च्या आणखी एका नवीन रोमांचक आवृत्तीमध्ये दिनांक 29 जानेवारी 2024 रोजी भारत मंडपम, प्रगती मैदान, नवी दिल्ली येथे सकाळी 11.00 वाजता संवाद साधणार आहेत.

परीक्षा पे चर्चा 2024 कार्यक्रम फोटो येथे अपलोड करा. 

'Pariksha Pe Charcha 2024' will be held on 29th January 2024, on 11.00 AM at Bharat Mandapam, Pragati Maidan, New Delhi

 

Pariksha Pe Charcha 2024 YouTube Live Streaming


परीक्षा पे चर्चा 2024 या कार्यक्रमाचे Live Telecast दूरदर्शन बरोबर YouTube Live केले जाणार आहे. त्यासाठी आपण पुढील चित्रावर क्लिक करून YouTube Live वर परीक्षा पे चर्चा कार्यक्रम पाहू शकता. दिनांक 29 जानेवारी 2024 रोजी हा कार्यक्रम सकाळी ठीक 11:00 वाजता आपणस पाहता येईल.

'Pariksha pe Charcha' 2024 live telecast link 01 - PMO web streaming. 





'Pariksha pe Charcha' 2024 live telecast link 02 - DD News


DD News link 
https://www.youtube.com/live/q5NugFNVFx8?si=JtGOaWm2xILOG9bt


'Pariksha pe Charcha' 2024 live telecast link 03 - DD National





'Pariksha pe Charcha' 2024 live telecast link 04 - myGov.in


'Pariksha pe Charcha' 2024 live telecast link 05 - MoE you tube (Ministry of Education)



MOE Ministry of Education link


'Pariksha pe Charcha' 2024 live telecast link 06 - PMO


PMO Office Link
https://www.youtube.com/live/mzXQU0H9kQ0?si=3XYE9rqRi2o3CtD3


शासन परिपत्रक - परीक्षा पे चर्चा 2024 कार्यक्रम राज्यातील सर्व शाळांमधून प्रक्षेपित करणेबाबत

माननीय पंतप्रधान २९ जानेवारी २०२४ रोजी भारत मंडपम, प्रगती मैदान, नवी दिल्ली येथे "परीक्षा पे चर्चा-२०२४ च्या आणखी एका रोमांचक आवृत्तीसाठी विद्यार्थी, शिक्षक आणि पालकांशी संवाद साधणार आहेत. माननीय पंतप्रधानांचा संवाद दूरदर्शनद्वारे डीडी नॅशनल, डीडी न्यूज आणि डीडी इंडिया इत्यादीद्वारे थेट प्रक्षेपित केला जाईल. तसेच रेडिओ चॅनेल (ऑल इंडिया रेडिओ मीडियम वैव्ह, ऑल इंडिया रेडिओ एफएम चैनल), वेबसाइटवर थेट वेब स्ट्रीमिंगद्वारे देखील उपलब्ध असेल, PMO, MOE, दूरदर्शन, MyGov.in आणि MOE चे YouTube चॅनेल, MoE चे Facebook Live आणि स्वयंप्रभा/दीक्षा चॅनेल यावर देखील सदर कार्यक्रम प्रक्षेपित केला जाणार आहे.

सर्व विभागीय शिक्षण उपसंचालक तसेच शिक्षणाधिकारी (प्राथमिक व माध्यमिक) यांना निर्देशित करण्यात येते की, आपल्या विभागातील / जिल्ह्यातील सर्व माध्यमाच्या सर्व शाळांमध्ये संगणक, टि.व्ही. तसेच मोठ्या स्क्रीन बसविण्याची आवश्यक व्यवस्था करण्यासाठी संबंधित मुख्याध्यापक यांना आवश्यक ते निर्देश देण्यात याव्यात. बहुतांश शाळांमध्ये टीव्ही आणि लाईट जोडणीबाबत काही अडचणी असल्यास, त्या दिवशी सर्व शाळांमध्ये विद्यार्थ्यांना पंतप्रधानांचे थेट भाषण पाहता/ऐकता येईल याची खात्री करण्यासाठी आवश्यक ती पर्यायी व्यवस्था उपलब्ध करुन देण्यात यावी. जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था (DIETs) यांनीही क्षेत्रीयस्तरावरील यंत्रणांशी समन्वय साधून जिल्ह्यातील सर्व शाळांमधील इयत्ता ६ वी ते १२ वी मधील सर्व विद्यार्थी थेट प्रक्षेपण पाहू/ऐकू शकतील याबाचत आवश्यक ती व्यवस्था उपलब्ध करुन देण्याचे नियोजन करावे. कार्यक्रमानंतर, कार्यक्रम पाहणाऱ्या मुलांची छायाचित्रे आणि तपशील कृपया MyGov या पोर्टलवर अपलोड करण्यात यावेत.



प्रत्येक जिल्ह्यातील सार्वजनिक ठिकाणी किंवा निवडलेल्या ठिकाणी विद्यार्थी, शिक्षक आणि पालकांना आकर्षित करणाऱ्या मोठ्या स्क्रीन बसवता आली तर अधिक लोकांपर्यंत सदरचा कार्यक्रम प्रक्षेपित करता येऊ शकेल. 

अतिदुर्गम भागात जेथे टीव्ही पाहण्याची सुविधा शक्य नाही, अशा ठिकाणी रेडिओ/ट्रान्झिस्टरची व्यवस्था करण्यात यावी, जेणेकरुन शालेय मुले पंतप्रधानांचे मार्गदर्शन व संवाद ऐकू शकतील. या संदर्भात, समग्र शिक्षा अंतर्गत उपलब्ध निधीचा वापर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळा तथा इतर अनुदानित शाळांना टीव्ही इत्यादी भाड्याने घेणे आणि इतर व्यवस्थेसाठी करता येऊ शकेल.

विद्यार्थी हे आपल्या राष्ट्राचे भविष्य आहेत, आणि या भावी राष्ट्रनिर्मात्यांसाठी शिक्षण हे अधिक आनंददायी आणि कमी ताणतणावपूर्ण बनवण्यासाठी आणि त्यांना माहिती देण्यासाठी आपल्या माननीय पंतप्रधानांच्या कल्पनेनुसार परीक्षांचा उत्सव 'परीक्षा पे चर्चा २०२४' साजरा करण्यासाठी आपण सर्वांनी उचित कार्यवाही करावी व केलेल्या कार्यवाहीचा अहवाल विभागीय शिक्षण उपसंचालक यांचेमार्फत संचालनालयास सादर होईल, याची दक्षता घ्यावी. 

परीक्षा पे चर्चा 2024 कार्यक्रम राज्यातील सर्व शाळांमधून प्रक्षेपित करणेबाबत परिपत्रक डाउनलोड करा. Click Here


शासन परिपत्रक - परीक्षा पे चर्चा २०२४' या कार्यक्रमास राज्यातील सर्व शाळांमधून प्रसिद्धी देणेबाबत... 


परीक्षा पे चर्चा 2024 च्या अनुषंगाने आपल्या अधिनस्त कार्यक्षेत्रात सदर योजनेबद्दल पुरेशी प्रसिद्धी मिळणेकरीता

https://drive.google.com/drive/folders/1iCoDDBbijPVJIVM2X3jH5OvAQkI6606?usp=sharing

वरील link वर उपलब्ध करून देण्यात आलेले बॅनर प्रत्येक शाळेतील दर्शनीय ठिकाणी लावावेत. तसेच सदर योजनेकरिता लागणारा खर्च समग्र शिक्षा अभियान योजनेमधील योग्य त्या लेखाशिर्षा अंतर्गत भागविण्यात यावा.


परीक्षा पे चर्चा बॅनर डाउनलोड करा. - Click Here



परीक्षा पे चर्चा 2024 निमित्ताने शाळेमध्ये आयोजित करावयाचे कार्यक्रम व संबंधित हॅशटॅग पहा.


परीक्षा पे चर्चा 2024 नाव नोंदणी / प्रमाणपत्र | Pariksha pe Charcha 2024 Registration/ Certificate


Post a Comment

0 Comments

close