पुण्यातील एका प्रतिष्ठित शाळेत ११ वर्षांच्या मुलीवर शाळेच्या स्वच्छतागृहात बलात्कार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला होता. त्यानंतर मुलींच्या सुरक्षेसंदर्भात कडक पाऊले उचलण्यात आली असून हा महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी विधानसभेत यासंदर्भात माहिती दिली.
शासकीय शाळांमध्ये येत्या वर्षभरात सीसीटीव्ही कॅमेरा बसविण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. यासाठी जिल्हा नियोजन आणि विकास निधी / स्थानिक स्वराज्य संस्था/सीएसआर / किंवा लोकसहभागातून निधी गोळा करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
सीसीटीव्हीचे धोरण
दि. ०७.०४.२०१६ च्या परिपत्रकान्वये राज्यातील सर्व माध्यमांच्या खाजगी व्यवस्थापनांच्या शाळांमध्ये सी.सी.टी.व्ही. बसविणे बाबत निर्देश देण्यात आले आहेत. त्यानुसार येते शैक्षणिक वर्ष सुरू होण्यापुर्वी सर्व खाजगी शाळांमध्ये सी.सी.टी.व्ही. कॅमेरे बसविण्याबाबत व ते सुरू असतील याबाबत काटेकोरपणे अंमलबजावणी करण्यात येईल.येते शैक्षणिक वर्ष सुरु होण्यापूर्वी सर्व खासगी शाळांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरा (CCTV Camera) बसविण्याचे आणि ते सुरु असतील याची काळजी घेण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
यासोबतच राज्यातील शासकीय/स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमध्ये विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी सीसीटीव्ही बसविण्याचे धोरण ठरविण्यात आले आहे. एकूण ६५ हजार शासकीय आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांपैकी आतापर्यंत १६२४ शाळांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत. उर्वरित शाळांतसुद्धा वर्षभरात कॅमेरे बसविण्यात येणार आहेत.
0 Comments