Latest Update

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

मुख्यमंत्री "माझी शाळा, सुंदर शाळा" अभियान - टप्पा -3, शाळा मूल्यांकन वेळापत्रक PDF | Chief Minister My School Beautiful School Assessment Schedule PDF

मुख्यमंत्री "माझी शाळा, सुंदर शाळा" या अभियानामध्ये शाळा स्तरावरुन माहिती अंतिम करणे व केंद्र स्तर, तालुका स्तर, जिल्हा स्तर, मनपा स्तर, विभाग स्तर, राज्य स्तर यानुसार शाळांचे मूल्यांकन करणे याचे वेळापत्रक तयार करण्यात आले आहे. "मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा" अभियानाच्या अंमलबजावणी व मूल्यांकन बाबतचे वेळापत्रक PDF उपलब्ध करुन देण्यात आली आहे. 

मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा अभियान' 200 गुणांचे मूल्यांकन निकष PDF


मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा" अभियानाच्या अंमलबजावणी व मूल्यांकन बाबतचे वेळापत्रक

राज्यातील सर्व व्यवस्थापनाच्या व सर्व माध्यमांच्या शाळांमधील शिक्षक, पालक, विदयार्थी व माजी विदयार्थी यांच्या शाळेप्रती उत्तरदायित्वाची भावना निर्माण व्हावी व त्यायोगे स्पर्धात्मक वातावरणातून विदयार्थ्यांना शिकण्यासाठी आनंददायी व प्रेरणादायी वातारवण मिळावे यासाठी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर आदर्श शाळा योजनेंतर्गत "मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा टप्पा 3' हे अभियान राबविण्यासाठी दि.16.१0.२०२5 अन्वये शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे.


या अभियानामध्ये शाळा स्तरावरुन माहिती अंतिम करणे, केंद्र स्तर, तालुका स्तर, जिल्हा स्तर, मनपा स्तर, विभाग स्तर, राज्य स्तर यानुसार शाळा मूल्यांकनाचे वेळापत्रक तयार करण्यात आले आहे. शासन निर्णय, दिनांक 16.१0.२०२5 अन्वये निश्चित केलेल्या मूल्यांकन समितीकडून शाळांचे मूल्यांकन दिलेल्या मुदतीमध्ये पूर्ण करुन माहिती अंतिम करावयाची आहे.

मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा अभियान शाळा मूल्यांकन समिती PDF


सदर अभियान हे अत्यंत कालमर्यादित स्वरुपाचे असून त्याचा मा. मुख्यमंत्री कार्यालयाकडून वेळोवेळी आढावा घेण्यात येतो. त्यामुळे सोबत जोडलेल्या वेळापत्रकामध्ये कोणत्याही परिस्थिती बदल केला जाणार नाही याची नोंद घ्यावी. तसेच शाळांकडून वा इतर कोणत्याही स्तरावर एकदा भरलेली माहिती ही अंतिम असेल त्यामध्ये पन्हा बदल करण्याची सुविधा उपलब्ध होणार नाही. याची देखील नोंद घ्यावी. या बाबत आपल्या स्तरावरुन सर्व संबंधितांना सूचित करावे. त्याकरीता आवश्यकतेनुसर सर्व मनुष्यबळाचा वापर करुन शाळांकडून माहिती भरण्याची व सर्व स्तरावरील मूल्यांकन हे विहित वेळापत्रकाप्रमाणेच पूर्ण करुन अभियान यशस्वी पार पाडले जाईल याची सर्वांनी दक्षता घ्यावी.

मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा अभियान टप्पा-3 मूल्यांकन वेळापत्रक

मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा अभियान टप्पा-3चे मूल्यांकन 01 डिसेंबर ते 19 डिसेंबर 2025 या कालावधीत करण्यात येणार आहे. 

मूल्यांकन प्रक्रिया 20 डिसेंबर ते 03 फेब्रुवारी 2026 पर्यंत करण्यात येणार आहे. 


“मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा" अभियान टप्पा 3 सन-2025
शाळा मूल्यांकन सुधारित वेळापत्रक


अ) शाळा स्तरावरुन माहिती अंतिम करण्याचा दिनांक 19/12/२०२5 वेळ सायं ५:०० वाजेपर्यत

ब) केंद्र स्तर :- दिनांक 20/12/२०२5 (माहिती अंतिम झाली त्यांच्याकरीता) ते दिनांक ०९/०1/२०२6 सायं ५:०० वाजेपर्यंत

क) तालुका :- दिनांक 22/12/२०२5 सोमवार (केंद्र पातळीवरुन अंतिम झालेली) ते दिनांक १6/०1/२०२6 शुक्रवार सायं.०५.०० वाजेपर्यत

ड) जिल्हा :- दिनांक 01/०1/२०२6 गुरुवार (अंतिम झालेल्या शाळांचे मूल्यांकन) ते दिनांक 22/०1/२०२6 गुरुवार सायं 05:०० वाजेपर्यत


इ) मनपा :- दिनांक 01/०1/२०२6 गुरुवार (अंतिम झालेल्यांचे मूल्यांकन) ते दिनांक 22/०1/२०26 गुरुवार सायं ५:०० वाजेपर्यंत


ई) विभाग :- दिनांक 15/०1/२०२6 गुरुवार ते 28/०1/२०२6 बुधवार सायं ५:०० वाजेपर्यंत


उ) राज्य :- दिनांक 27/०1/२०२6 मंगळवार ते दिनांक 03/०2/२०२6 मंगळवार सायं. ०५.०० वा.पर्यंत


"मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा" टप्पा 03 मूल्यांकन बाबतचे वेळापत्रक PDF डाउनलोड करा.




मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा टप्पा-03 वेळापत्रक

मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा" अभियान सन-२०२5 शाळा मूल्यांकन वेळापत्रक

मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा" अभियान सन-२०२5

शाळा मूल्यांकन वेळापत्रक

Post a Comment

0 Comments

close