वरिष्ठ वेतनश्रेणी व निवडश्रेणी प्रशिक्षण 2026 करिता पात्र शिक्षकांची प्रशिक्षणासाठी नाव नोंदणी करणे व प्रशिक्षण फी बाबत शासन परिपत्रक जाहीर.
वरिष्ठ वेतनश्रेणी व निवडश्रेणी प्रशिक्षणाचे नियोजन व संनियंत्रणाची जबाबदारी राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेकडे सोपविण्यात आलेली आहे. त्यानुसार वरिष्ठ वेतनश्रेणी व निवडश्रेणी प्रशिक्षण 2026 या प्रशिक्षणासाठी ऑनलाईन नोंदणीकरिता राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेमार्फत पोर्टल विकसित करण्यात आलेले आहे. सदरील पोर्टलवर प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक व अध्यापक विद्यालय या चार गटातील पात्र शिक्षक/ मुख्याध्यापक/प्राध्यापक/प्राचार्य यांनी नोंदणी करावयाची आहे.
वरिष्ठ व निवडश्रेणी प्रशिक्षण WhatsApp Group
https://chat.whatsapp.com/KsFBYconkzd2kFC30Tfugq?mode=gi_t
वरिष्ठ वेतनश्रेणी व निवडश्रेणी प्रशिक्षण 2026 चुकीची दुरुस्ती करण्याची सुविधा सुरु करणेबाबत...
वरिष्ठ वेतनश्रेणी व निवडश्रेणी प्रशिक्षण 2026
New Update - 13 May 2026
वरिष्ठ व निवडश्रेणी प्रशिक्षणास नावनोंदणी प्रक्रियेसाठी दिनांक १२/०५/२०२६ रोजी सायं. ६:०० वाजेपर्यंतची मुदतवाढ देण्यात आलेली होती.
यानुसार ऑनलाईन प्रशिक्षण नावनोंदणी करत असताना काही पात्र प्रशिक्षणार्थ्यांनी प्रशिक्षण प्रकार व प्रशिक्षण गट यांची निवड करत असताना चुका केलेल्या आहेत, अशा प्रशिक्षणार्थ्यांना दिनांक १४/०५/२०२६ ते १६/०५/२०२६ या कालावधीमध्ये आपण स्वतः निवड केलेल्या प्रशिक्षण गट आणि प्रशिक्षण प्रकारच्या चुका दुरुस्ती करणेसाठीची सुविधा राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे च्या संकेतस्थळावर (https://www.maa.ac.in) प्रशिक्षणे मेनूअंतर्गत वरिष्ठ व निवड श्रेणी प्रशिक्षण tab मध्ये link द्वारे उपलब्ध करून देण्यात येत आहे. तरी यानुसार केवळ ज्या प्रशिक्षणार्थ्यांना आवश्यक दुरुस्ती करावयाची आहे, केवळ अशाच प्रशिक्षणार्थ्यांनी सदरच्या कालावधीमध्ये आवश्यक दुरुस्ती करावी. ज्या प्रशिक्षणार्थ्यांची नावनोंदणी अचूक झालेली आहे अशा प्रशिक्षणार्थ्यांनी कोणतीही दुरुस्ती यामध्ये नोंदवू नये. तसेच दुरुस्तीची ही अंतिम संधी प्रशिक्षणार्थ्यांना उपलब्ध करून देण्यात येत आहे. याची नोंद घ्यावी.
वरिष्ठ वेतनश्रेणी व निवडश्रेणी प्रशिक्षण 2026 चुकीची दुरुस्ती करण्यासाठी लिंक - Click Here
वरिष्ठ वेतनश्रेणी व निवडश्रेणी प्रशिक्षण 2026
वरिष्ठ वेतनश्रेणी व निवडश्रेणी प्रशिक्षण 2026 कालावधी निश्चित करणे व नवीन नोंदणी बाबत
वरिष्ठ वेतनश्रेणी व निवड श्रेणी प्रशिक्षण 2026
वरिष्ठ वेतनश्रेणी व निवडश्रेणी प्रशिक्षण 2026 रजिस्ट्रेशन / नावनोंदणी करणेबाबत सूचना
Email ID व मोबाईल क्रमांक अपडेट करण्यासाठी वेबसाइटच्या लिंक
शालार्थ वेबसाइट - https://shalarth.maharashtra.gov.in/login.jsp
सेवार्थ वेबसाइट - https://sevaarth.mahakosh.gov.in/login.jsp
वरिष्ठ वेतनश्रेणी व निवडश्रेणी प्रशिक्षण 2026 रजिस्ट्रेशन / नावनोंदणी करणेबाबत सूचना
१) दि. 30 एप्रिल 2026 रोजी 12 वर्षे सेवा पूर्ण होणारे किंवा त्यापूर्वीच 12 वर्षे सेवा पूर्ण झालेले शिक्षक वरिष्ठ वेतन श्रेणी प्रशिक्षण नोंदणीसाठी पात्र ठरतील.
२) दि. 30 एप्रिल 2026 रोजी 24 वर्षे सेवा पूर्ण होणारे किंवा त्यापूर्वीच 24 वर्षे सेवा पूर्ण झालेले शिक्षक निवड श्रेणी प्रशिक्षण नोंदणीसाठी पात्र ठरतील.
3) 2017 मध्ये सेवानिवृत्त होणारे व 12 किंवा 24 वर्षे सेवा पूर्ण करणारे शिक्षक/मुख्याध्यापक यांना सदर प्रशिक्षणासाठी नोंदणी करता येईल.
३) प्रशिक्षण नोंदणी दिनांक 20 एप्रिल 2026 ते 29 एप्रिल 2026 पर्यंत मुदत देण्यात आलेली होती. आता ती वाढवून 12 मे पर्यंत वाढविण्यात आली आहे.
Registration
वरिष्ठ वेतनश्रेणी व निवड श्रेणी प्रशिक्षण नाव नोंदणी
रजिस्ट्रेशन मुदत - 29 April 2026
रजिस्ट्रेशन मुदतवाढ - 12 May 2026 पर्यंत
1) शालार्थ क्रमांक असलेल्यांसाठी नोंदणी लिंक
2) शालार्थ क्रमांक नसलेल्यांसाठी नोंदणी लिंक
https://portal.maa.ac.in/
वरिष्ठ वेतनश्रेणी व निवड श्रेणी प्रशिक्षण 2026 सूचना परिपत्रक Click Here
वरिष्ठ व निवडश्रेणी प्रशिक्षण 2025-26 नावनोंदणी करणेस 06 एप्रिल पर्यंत मुदतवाढ देणेबाबत परिपत्रक - 30 April 2025
वरिष्ठ व निवडश्रेणी प्रशिक्षण नोंदणी कशी करावी? मार्गदर्शक PDF डाउनलोड करा - Click Here
वरिष्ठ वेतनश्रेणी व निवड श्रेणी प्रशिक्षण कोणासाठी?
प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक व अध्यापक विद्यालय अध्यापकाचार्य या चार गटातील 12 वर्षे / 24 वर्षे झालेल्या शिक्षकांना या प्रशिक्षणासाठी नोंदणी करता येईल.
Join शालेय शिक्षण WhatsApp Group
वरिष्ठ वेतनश्रेणी व निवडश्रेणी प्रशिक्षण 2025-26 बाबत सविस्तर सूचना
वरिष्ठ वेतनश्रेणी व निवड श्रेणी प्रशिक्षण 2023-24
वरिष्ठ/ निवड श्रेणीचे प्रस्ताव कॅम्प आयोजित करुन तात्काळ निकाली काढणेबाबत.. .
वरिष्ठ वेतनश्रेणी व निवड श्रेणी प्रशिक्षण प्रमाणपत्र लिंक
वरिष्ठ वेतनश्रेणी व निवड श्रेणी प्रशिक्षण प्रमाणपत्र लिंक 2023-24
वरिष्ठ वेतनश्रेणी व निवड श्रेणी प्रशिक्षण प्रमाणपत्र असे करा डाउनलोड
1) वरील लिंकवर आपला प्रशिक्षणाचा नोंदणी क्रमांक नोंदविल्यानंतर आपणास आपल्या मोबाईल क्रमांकावर ओटीपी प्राप्त होईल.2) आपणास आपल्या मोबाईल क्रमांकावर प्राप्त झालेला ओटीपी आपण प्रविष्ट केल्यानंतर आपणासनोंदणी क्रमांकइंग्रजी मधील आपले नावमोबाईल क्रमांकईमेलप्रशिक्षण गटआपले मराठीतील नावशाळेचे नावजिल्हातालुका3) यातील आपले मराठीतील नाव, शाळेचे मराठीमधील नाव, आपला जिल्हा व तालुका यामध्ये आपली स्वतःची व्यवस्थित माहिती भरावी/ चूक असल्यास आवश्यक बदल करावेत.
उपरोक्त मुद्दा क्रमांक तीन मध्ये नमूद केलेले सर्व तपशील व नमूद माहिती १००% अचूक व खरी असून यामध्ये कोणतीही चूक आढळल्यास व चुकीच्या नावाचे, गटाचे प्रमाणपत्र डाऊनलोड झाल्यास संबंधित प्रशिक्षणार्थी स्वतः जबाबदार असतील.
ज्या प्रशिक्षणार्थीनी वरिष्ठ वेतन श्रेणी/ निवड श्रेणी प्रशिक्षण यशस्वीरीत्या पूर्ण केले आहे, असे प्रशिक्षणार्थी आपले प्रमाणपत्र येथून डाऊनलोड करून घेऊ शकतात.
वरिष्ठ वेतनश्रेणी व निवड श्रेणी प्रशिक्षण प्रमाणपत्र लिंक 2022-23
वरिष्ठ वेतनश्रेणी व निवड श्रेणी प्रशिक्षण रजिस्ट्रेशन बाबत सूचना
१) दि. 30 एप्रिल 2025 रोजी 12 वर्षे सेवा पूर्ण होणारे किंवा त्यापूर्वीच 12 वर्षे सेवा पूर्ण झालेले शिक्षक वरिष्ठ वेतन श्रेणी प्रशिक्षण नोंदणीसाठी पात्र ठरतील.
२) दि. 30 एप्रिल 2025 रोजी 24 वर्षे सेवा पूर्ण होणारे किंवा त्यापूर्वीच 24 वर्षे सेवा पूर्ण झालेले शिक्षक निवड श्रेणी प्रशिक्षण नोंदणीसाठी पात्र ठरतील.
३) प्रशिक्षण नोंदणी दिनांक 15 एप्रिल 2025 ते 25 एप्रिल 2025 पर्यंत मुदत देण्यात आलेली आहे.
वरिष्ठ वेतनश्रेणी व निवड श्रेणी प्रशिक्षण कोणासाठी?
प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक व अध्यापक विद्यालय अध्यापकाचार्य या चार गटातील 12 वर्षे / 24 वर्षे झालेल्या शिक्षकांना या प्रशिक्षणासाठी नोंदणी करता येईल.
Join शालेय शिक्षण WhatsApp Group
New Update - वरिष्ठ श्रेणी व निवडश्रेणी प्रशिक्षण साठी रजिस्ट्रेशन केलेल्या सर्वांना user ID व Password प्राप्त होणार 👇
वरिष्ठ वेतनश्रेणी व निवडश्रेणी प्रशिक्षण मार्गदर्शन
वरिष्ठ व निवडश्रेणी प्रशिक्षण नोंदणी दुरुस्ती प्रक्रिया
New Update 07 जुलै 2022
वरिष्ठ वेतनश्रेणी व निवड श्रेणी प्रशिक्षण 10 जुलै पासून सरु होणार आहे. सदर प्रशिक्षणस 45 दिवसांत पूर्ण करावे लागणार आहे. पाससवर्ड नोंदणीकृत ईमेल वर प्राप्त होईल. तेव्हा आपला ईमेल चेक करत राहावे.
दररोजचा दिवसनिहाय सेतू अभ्यास PDF इ. 2री ते इ. 10वी (1 ते 20 दिवस)
वरिष्ठ वेतनश्रेणी व निवड श्रेणी प्रशिक्षण नाव नोंदणी
रजिस्ट्रेशन मुदत - 12 जून 2023
1) शालार्थ क्रमांक असलेल्यांसाठी नोंदणी लिंक
2) शालार्थ क्रमांक नसलेल्यांसाठी नोंदणी लिंक
वरिष्ठ व निवड श्रेणी प्रशिक्षण नोंदणी दुरुस्ती प्रक्रिया
3) वरिष्ठ वेतनश्रेणी व निवड श्रेणी प्रशिक्षणासाठी ॲप - प्रशिक्षण ॲप Infosys Springboard डाउनलोड लिंक - Click Here.
४) प्रशिक्षणासाठी नोंदणी करतेवेळी शिक्षकाने स्वतःचा शालार्थ ID. शाळेचा UDISE क्रमांक, मोबाईल, ईमेल इत्यादी माहिती सोबत ठेवावी.
5) सदर प्रशिक्षण सशुल्क असल्याने प्रति प्रशिक्षणार्थी रु.२,०००/- (अक्षरी रुपये दोन हजार मात्र ) शुल्क असेल.
वरिष्ठ वेतनश्रेणी व निवडश्रेणी प्रशिक्षण २०२2-23 बाबत सविस्तर सूचना
१. प्रशिक्षणाकरिता नोंदणी करणेसाठी परिषदेच्या https://training.scertmaha.ac.in या संकेत स्थळास भेट द्यावी.
२. दि. ३१ मार्च २०२4 रोजी १२ वर्षे सेवा पूर्ण होणारे किंवा त्यापूर्वीच १२ वर्षे सेवा पूर्ण झालेले शिक्षक वरिष्ठ वेतन श्रेणी प्रशिक्षण नोंदणीसाठी पात्र ठरतील.
३. दि. ३१ मार्च २०२4 रोजी २४ वर्षे सेवा पूर्ण होणारे किंवा त्यापूर्वीच २४ वर्षे सेवा पूर्ण झालेले शिक्षक निवड श्रेणी प्रशिक्षण नोंदणीसाठी पात्र ठरतील.
४. प्रशिक्षण नोंदणी दिनांक २9 मे, २०२3 ते 20 जून, २०२3 पर्यंत सुरु राहील.
५. सदरचे प्रशिक्षण हे ऑनलाईन पद्धतीने घेण्यात येणार आहे. याबाबत नोंदणीनंतर पुढील सूचना संबंधितांना ई-मेलद्वारे देण्यात येतील.
६. प्रस्तुत प्रशिक्षणासाठी पुढीलप्रमाणे ०४ गट करण्यात आलेले आहेत-
गट क्र.१ प्राथमिक गट, गट
क्र. २- माध्यमिक गट,
गट क्र. ३- उच्च माध्यमिक गट,
गट क्र. ४ अध्यापक विद्यालय गट.
७. प्रशिक्षणासाठी नोंदणी करतेवेळी शिक्षकाने स्वतःचा शालार्थ ID. शाळेचा UDISE क्रमांक इत्यादी माहिती सोबत ठेवावी.
८. नोंदणी करत असताना नोंदणीसाठीचा आवश्यक OTP आपल्या मोबाईल क्रमांकावर तात्काळ येणार असल्याने आपला वापरात असणारा मोबाईल सोबत ठेवावा.
९. प्रशिक्षणार्थी यांच्याकडे स्वतःचा वापरात असणारा ई-मेल आय. डी. असणे आवश्यक आहे. सदर प्रशिक्षणाचे पुढील सर्व पत्रव्यवहार व सूचना या नोंदणी करत असताना नोंदविलेल्य आय. डी. वर पाठविण्यात येतील.
१०. नोंदणी फॉर्म अंतिम करण्यापूर्वी आपली भरलेली संपूर्ण माहिती काळजीपूर्वक पडताळणी करण्यात याची. आपल्या माहितीमध्ये काही बदल / दुरुस्ती असल्यास "माहितीत बदल करा" या बटणावर क्लिक करून सुधारित माहिती भरता येईल.
११. प्रस्तुत प्रशिक्षणासाठी आवश्यक शासन निर्णय https://training.scertmaha.ac.in या पोर्टलवर उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत. तसेच प्रशिक्षणाशी निगडीत अद्ययावत सूचना वेळोवेळी संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येतील.
१२.या प्रशिक्षणासाठी जिल्हा नोडल अधिकारी म्हणून संबंधित जिल्ह्याचे प्राचार्य, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था असतील तर मुंबई शहर व उपनगर या जिल्ह्यांसाठी उपसंचालक, प्रादेशिक विद्या प्राधिकरण, मुंबई हे जिल्हा नोडल अधिकारी असतील.
१३ प्रशिक्षण शुल्क भरणा करणेसाठी प्रशिक्षणार्थी यांचेकडे स्वतःच्या बँक खात्याचा सर्व तपशील इंटरनेट बैंकिंग/ क्रेडीट / डेबिट कार्ड / UPI payment ने सदर प्रशिक्षण शुल्क ज्या बँक खात्यावरून भरणार आहे त्याचा आवश्यक तपशील सोबत ठेवावा. उदा. युझर आयडी, पासवर्ड इ.
१४. सदर प्रशिक्षण सशुल्क असल्याने प्रति प्रशिक्षणार्थी रु.२,०००/- (अक्षरी रुपये दोन हजार मात्र ) शुल्क ऑनलाईन पद्धतीने (Credit & Debit Card, Internet Banking, UPI Payment) अदा करणे आवश्यक आहे. प्रशिक्षणासाठी आवश्यक सर्व माहिती अचूक पद्धतीने भरली आहे याची खातरजमा झाल्यानंतरच प्रशिक्षण शुल्क ऑनलाईन अदा करावे, एकदा जमा केलेले प्रशिक्षण शुल्क कोणत्याही कारणात्सव परत केले जाणार नाही याची नोंद घ्यावी. यासंदर्भात परिषदेशी कोणताही पत्रव्यवहार करू नये.
१५. नोंदणी अर्ज भरताना काही तांत्रिक अडचण उद्भवल्यास स्वतःच्या रजिस्टर ईमेल वरून trainingsupport@maa.ac.in या ई मेल आयडीवर संपर्क करावा.
१६. वरिष्ठ वेतन श्रेणीसाठी व निवड श्रेणीसाठी पात्र होणेकरिता विहित गटातील संदर्भीय शासन निर्णयातील प्रशिक्षण पूर्ण करणे ही एक अट आहे. केवळ प्रशिक्षण पूर्ण केले म्हणजे संबंधित शिक्षक वरिष्ठ/निवड श्रेणीसाठी पात्र ठरणार नाहीत. त्याकरिता उपरोक्त शासन निर्णयातील इतर नमूद अटी पूर्ण करणे बंधनकारक आहे.
१७. नोंदणी केलेल्या शिक्षकांचे उपरोक्त प्रशिक्षण गटनिहाय प्रशिक्षणाचे नियोजन करण्यात येईल.
१८. शासन निर्णयातील अटी व शर्ती तपासून त्याबाबत वरिष्ठ / निवडश्रेणी मंजूर करण्याची कार्यवाही विभागीय / जिल्हा स्तरावर करण्यात येईल.
१९. सदर प्रशिक्षणासंबंधी अद्ययावत माहितीसाठी वेळोवेळी https://training.scertmaha.ac.in हे संकेतस्थळ पहावे.
वरिष्ठ वेतनश्रेणी व निवडश्रेणी प्रशिक्षण २०२3-२4 बाबतचे परिपत्रक डाउनलोड करण्यासाठी येथे टच करा.















7 Comments
यात शिक्षकांचे पैसे जमा झाल्याची पावती बघण्यासाठी लिंक नाहीये कृपया आपण ते यात ताकने गरजेचे आहे.
ReplyDeleteयात शिक्षकांचे पैसे जमा झाल्याची पावती बघण्यासाठी लिंक नाहीये कृपया आपण ते यात ताकने गरजेचे आहे.
ReplyDeleteThe teachers who have received CHESS TRAINING must be exempted for other special trainings..
ReplyDeleteMe register kelay pan mala mail var samore chi mahiti nahi aali.... Dates Kay ahet training che
ReplyDeleteज्या शिक्षकाने निवड श्रेणीच्या ऑनलाइन प्रशिक्षणासाठी नांव नोंदणी केलेली आहे त्याला त्याचे नाव यादीत सामाविष्ट आहे की नाही ; नंबर किती आहे ते कुठे पाहता येईल ते सांगावे ८९९९७०६७४४
ReplyDeleteनिवड श्रेणी चे कालच्या प्रोसिजर नुसार रजिस्ट्रेशन झाले की नाही हे कसे समजेल
ReplyDeleteकालच्या प्रोसिजर नुसार रजिस्ट्रेशन झाले की नाही हे कसे समजेल
ReplyDelete