Latest Update

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

शालेय आरोग्य कार्यक्रम प्रशिक्षण वेळापत्रक व पोर्टल लिंक : https://scertmaha.ac.in/shp

आयुष्मान भारत अंतर्गत शालेय आरोग्य कार्यक्रम ऑनलाईन प्रशिक्षणास उपस्थित राहणेबाबत परिपत्रक, प्रशिक्षण वेळापत्रक व पोर्टल लिंक https://scertmaha.ac.in/shp




भारत सरकारच्या वतीने शालेय विद्यार्थ्यांचे आरोग्य आणि रोग प्रतिबंधक उपाययोजना करण्याच्या दृष्टीने "आयुष्मान भारत" या उपक्रमांतर्गत शालेय आरोग्य कार्यक्रम (School Health and wellness Programme) सुरु करण्यात आला आहे. आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय आणि शालेय शिक्षण आणि साक्षरता विभाग, केंद्रीय शिक्षा मंत्रालय यांच्या संयुक्त विद्यमाने सर्व शासकीय (स्थानिक स्वराज्य संस्थाच्या शाळासह) व शासन अनुदानित शाळांमध्ये शालेय आरोग्य प्रोत्साहन कार्यक्रम इ. ६वी ते १२वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी राबविला जात आहे. सदर कार्यक्रमामध्ये अध्यापनाच्या नियमित अभ्यासक्रमाचा समावेश असेल तसेच शालेय आरोग्य कार्यक्रम सत्राचा समावेश हा नियमित वेळापत्रकातच असेल. सशक्त राष्ट्रनिर्मितीचे खालील उद्दिष्टे समोर ठेवून हा कार्यक्रम कार्यान्वित करण्यात आला आहे.


महाराष्ट्र राज्यातील ठाणे, जालना, पालघर, नाशिक, यवतमाळ, हिंगोली, अहिल्यानगर, रायगड, परभणी, लातूर व वर्धा अशा एकूण ११ जिल्ह्यांमध्ये कार्यक्रमाची अंमलबजावणी सुरु आहे. उपरोक्त ११ जिल्ह्यातील १३३५५ शाळेतील एक मुख्याध्यापक व दोन शिक्षक यांचेसाठी एकूण ४००६५ शालेय आरोग्य कार्यक्रम प्रशिक्षण साहित्य कीटचे वाटप करण्यात आले आहे.


जिल्ह्यातील इयत्ता ६ वी ते १२ वी पर्यंतच्या शासकीय / स्थानिक स्वराज्य संस्थांच्या व शासकीय अनुदानित प्रकारच्या प्रत्येक शाळेतील मुख्याध्यापक, एक पुरुष शिक्षक व एक महीला शिक्षिका असे एकूण तीन व्यक्तींना आरोग्यवर्धिनी दूत (School Health and Wellness Ambassador) म्हणून ऑनलाईन प्रशिक्षण देण्यात येणार आहे. तथापि, उपरोक्त प्राचार्य, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था व शिक्षणाधिकारी माध्यमिक/प्राथमिक यांनी समन्वयाने आपल्या जिल्ह्यातील इयत्ता ६ वी ते १२ वी पर्यंतच्या शासकीय/स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळा व शासकीय अनुदानित शाळांमधील मुख्याध्यापक व एक पुरुष शिक्षक व एक महिला शिक्षक यांची आरोग्यवर्धिनी दूत म्हणून तात्काळ नियुक्ती करून जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातील निकषातील शाळा मुख्याध्यापक व शिक्षकांची लिंकद्वारे विहित कालावधीत १००% नोंदणी करणेबाबतची संपूर्ण कार्यवाही दिनांक २४ ऑगस्ट, २०२६ रात्री १२ वाजेपर्यंत करणेबाबत निर्देशित करण्यात आले होते.

लिंकद्वारे नोंदणी करणेबाबत दिनांक २९ ऑगस्ट, २०२६ रात्री १२ वाजेपर्यंत मुदतवाढ देण्यात आली होती. तदनुषंगाने सद्यस्थितीत बहुतांश शाळांनी संगणकीय प्रणालीवर नोंदणी केली आहे.


संबंधित जिल्ह्यातील सर्व शासकीय शाळा (स्थानिक स्वराज्य संस्थाच्या शाळासह) व शासकीय अनुदानित शाळांमधील शिक्षकांचे चार दिवसीय ऑनलाईन प्रशिक्षण आयोजित करण्यात आले आहे. नोंदणी केलेल्या प्रशिक्षणार्थीचे ऑनलाईन प्रशिक्षण दि. २१/०९/२०२६ ते २४/०९/२०२६ या कालावधीत आयोजित करण्यात आले आहे. सदर ऑनलाईन प्रशिक्षणासाठी पोर्टल विकसित करण्यात आले आहे. शालेय आरोग्य कार्यक्रम प्रशिक्षण वेळापत्रक सोबत दिले आहे, त्याचे अवलोकन व्हावे. सदर ऑनलाईन प्रशिक्षणासाठी राज्यस्तरावरील आरोग्य व शिक्षण विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित राहणार आहेत. त्यामुळे नोंदणी केलेल्या आपल्या जिल्ह्यातील सर्व शाळांचे १००% मुख्याध्यापक व प्रशिक्षणार्थी दोन शिक्षक ऑनलाईन प्रशिक्षणातील प्रत्येक सत्रास १५ मिनिटे वेळेअगोदर उपस्थित राहतील याची सर्वस्वी जबाबदारी शिक्षणाधिकारी माध्यमिक/प्राथमिक यांचेवर निश्चित करण्यात येत आहे. तदनुषंगाने योग्य ते आदेश आपले स्तरावरून निर्गमित करावेत.


शालेय आरोग्य कार्यक्रम प्रशिक्षण पोर्टल लिंक

School Health and Wellness Programme portal link

https://scertmaha.ac.in/shp


शालेय आरोग्य कार्यक्रम प्रशिक्षण कालावधी दि. २१/०९/२०२६ ते २४/०९/२०२६


School Health and wellness Programme Timetable 

शालेय आरोग्य कार्यक्रम प्रशिक्षण वेळापत्रक



Post a Comment

0 Comments

close