चला शाळेत जाऊया अभियानांतर्गत अधिकारी देणार शाळांना भेटी | शाळा भेटीबाबत चे नियोजन जाहीर
राज्यातील सर्व माध्यम व व्यवस्थापनांच्या शाळांमधून दि.०५ सप्टेंबर २०२६ ते दि. २० ऑक्टोबर २०२६ या कालावधीत "चला शाळेत जाऊया अभियान" राबविले जाणार आहे. या अभियानांतर्गत शिक्षण विभागाच्या प्रशासकीय तसेच शैक्षणिक उपक्रमांच्या अनुषंगाने जिल्ह्यातील प्राचार्य, जिल्हा शिक्षण प्रशिक्षण संस्था, शिक्षणाधिकारी, (प्राथमिक, माध्यमिक व योजना) तसेच इतर क्षेत्रीय कार्यालयांची सखोल तपासणी करून सदर कार्यालयांना प्रशासकीय सुधारणेसाठी आवश्यक योग्य ते निर्देश देणे, विद्यार्थ्यांमध्ये पायाभूत साक्षरता व संख्याज्ञान कौशल्य विकसित करण्यासाठी शिक्षण विभागामार्फत राबविल्या जाणाऱ्या निपुण महाराष्ट्र अभियानांतर्गत कृती कार्यक्रम, विद्या समीक्षा केंद्र, दीक्षा पोर्टल, पीएम श्री शाळा, आदर्श शाळा, PGI Index, SD Goals, PAT, UDISE+, डॉ. जयंत नारळीकर गणित व विज्ञान अध्ययन समृद्धी कार्यक्रम, P. M. पोषण योजना, महाजीआयएस, इ. योजनांचा प्राधान्याने आढावा घेण्यात येणार आहे.
शाळा भेटीबाबत महत्त्वाच्या सूचना
1. शिक्षणाधिकारी, प्राथमिक व माध्यमिक यांनी सभेसाठी सभागृह, पुरेशी बैठक व्यवस्था, ध्वनी व्यवस्था, पिण्याचे पाणी, working lunch व अनुषंगिक व्यवस्था करण्यात यावी.
2. प्राचार्य, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था यांनी आयडॉल / नवोपक्रमशील शिक्षकांची निवड करणे व सादरीकरणासाठी उपस्थित ठेवावे.
3. शिक्षणाधिकारी, माध्यमिक यांनी नोडल अधिकारी यांच्या निवासाची व्यवस्था शासकीय विश्रामगृहामध्ये करावी.
4. जिल्हास्तरीय आढाव्यासाठी जिल्ह्यातील विषय साधन व्यक्ती, जिल्हा समग्र कर्मचारी, केंद्रप्रमुख, शिक्षण विस्तार अधिकारी, गटशिक्षणाधिकारी, उपशिक्षणाधिकारी, अधिव्याख्याता, ज्येष्ठ अधिव्याख्याता उपस्थित राहण्याबाबत आपल्या स्तरावरून लेखी कळवावे. कोणीही अनुपस्थित राहणार नाहीत याची दक्षता घ्यावी.
5. शाळा भेटीदरम्याने प्राचार्य, शिक्षणाधिकारी, प्राथमिक, माध्यमिक व योजना तसेच संबंधित गटशिक्षणाधिकारी, शिक्षण विस्तार अधिकारी, केंद्रप्रमुख यांनी उपस्थित राहावे.
चला जाऊया शाळेत अभियानाची अंमलबजावणी करणेबाबत शासन परिपत्रक - Click Here


0 Comments