शुद्ध व अशुद्ध शब्द
लक्षात ठेवा :
व्याकरणातील नियमांना अनुसरून केलेल्या निर्दोष लेखनाला शुध्दलेखन म्हणतात . अर्थपूर्ण शुध्दलेखणासाठी अनुस्वार ,ऱ्हस्व- दीर्घ व जोडाक्षरे इत्यादींचे ज्ञान असणे आवश्यक आहे . त्यासाठी शुध्दलेखनाचे काही प्रमुख नियम अभ्यासू या .
१) एखाद्या शब्दातील ज्या अक्षरांचा उच्चार स्पष्टपणे नाकातून होतो , त्या अक्षरांवर नेहमी अनुस्वार द्यावा .
उदा . कांदा , भिंत , सुगंध , दिंडी , संबंध , धांदल इत्यादी .
२) एकाक्षरी शब्दातील ' इ ' व ' उ 'स्वर दीर्घ लिहावेत .
उदा ., मी , ती , तू , धू , जू इत्यादी
३) सामान्यपणे , कोणत्याही शब्दातील शेवटचा ' इ ' व ' उ ' हे सर्व दीर्घ लिहावेत .
उदा ., कवी ,रवी , विद्यार्थी ,गुरु ,अणू ,पशू इत्यादी .
मात्र हे शब्द जोडशब्दांत प्रारंभी आले , तर त्यांतील शेवटचा ' इ ' किंवा ' उ ' सर्वर ऱ्हस्व लिहावा .
उदा ., कविचरित्र ,विद्यार्थिभांडार .गुरुकृपा इत्यादी .
४) अकारान्त शब्दातील उपांत्य ( शेवटून दुसरे अक्षर ) ' इकार ' व ' उकार ' दीर्घ लिहावेत.
उदा ., वीट , मीठ , खीर ,दूध , तूप ,नवनीत ,जमीन इत्यादी .
५) शब्दातील शेवटचे अक्षर दीर्घ असेल तर त्याच्यामागील ' इकार ' व 'उकार ' बहुधा ऱ्हस्व लिहावेत .
उदा ., गरिबी , पाहुणा ,किती ,दिवा , महिना , नमुना ,बहिणी , वकिली इत्यादी .
शुद्ध व अशुध्द शब्द या घटकावर आधारित सराव चाचणी सोडव. 👇
0 Comments