Latest Update

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

प्रशिक्षण - इयत्ता पहिलीच्या शिक्षकांसाठी नवीन अभ्यासक्रमाचे प्रशिक्षण होणार जूनमध्ये | जिल्हास्तर व तालुकास्तर प्रशिक्षण आयोजनासाठी मार्गदर्शक सूचना परिपत्रक

इयत्ता १ लीच्या शिक्षकांसाठी नवीन अभ्यासक्रमानुसार प्रशिक्षण जून महिन्यात आयोजित करण्यात येणार आहे. सदर प्रशिक्षणाच्या तारखा जाहीर करण्यात आल्या आहेत.


राज्यामध्ये राष्ट्रीय शिक्षण धोरण २०२० अंमलबजावणीचे अनुषंगाने नवीन अभ्यासक्रमाची टप्प्याटप्याने अंमलबजावणी सन २०२५-२६ पासून करण्यात येणार आहे. त्याबाबत दि. १६/०४/२०२५ रोजी शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे. 

नवीन अभ्यासक्रमाची अंमलबजावणी करणेबाबत शासन निर्णय - Click Here


नवीन अभ्यासक्रम प्रशिक्षण Group
https://chat.whatsapp.com/KQSAxPidb2a2PAp9qPXxwm


राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 नुसार राज्यातील शासकीय व खाजगी अनुदानित शाळांतील इयत्ता १ लीच्या सर्व शिक्षकांचे नवीन अभ्यासक्रम अंमलबजावणीसाठी प्रशिक्षण देणे प्रस्तावित आहे. शैक्षणिक वर्ष माहे जून २०२५ पासून सुरु होणार असलेमुळे त्यापुर्वी हे शिक्षक प्रशिक्षण पूर्ण होणे आवश्यक आहे. इयत्ता १ लीच्या सर्व शिक्षकांच्या प्रशिक्षणासाठी राज्यस्तर, जिल्हास्तर व तालुकास्तर प्रशिक्षण नियोजन पुढीलप्रमाणे आहे.


A. इयत्ता १ ली शिक्षकांच्या नवीन अभ्यासक्रम शिक्षक प्रशिक्षणासाठी विषयांची निवडः

प्रस्तुत शिक्षक प्रशिक्षणासाठी पुढीलप्रमाणे एकूण ७ विषयांची निवड करण्यात आलेली आहे.

1. SCF-FS 2024,

2.मूल्यमापन व HPC पार्श्वभूमी व नमुना

3. भाषा शिक्षण 

4. गणित शिक्षण 

5. कला शिक्षण 

6. आरोग्य व शारीरिक शिक्षण 

7. कार्यशिक्षण


B. प्रशिक्षणाचे माध्यमः

प्रस्तुत शिक्षक प्रशिक्षण मराठी, उर्दू व इंग्रजी माध्यमाच्या शिक्षकांसाठी स्वतंत्रपणे आयोजित करण्यात येईल. अन्य माध्यमांना मराठी माध्यमांसोबत सामावून घेतले जाईल.


C. प्रशिक्षणार्थी संख्या व वेळापत्रक-

प्रत्येक वर्गात अपेक्षित विषयांच्या निर्धारित तासिका होण्यासाठी तीन दिवसांचे वेळापत्रक निश्चित केलेले आहे तसेच त्यासोबत महाराष्ट्र स्काऊट व गाईड संस्थेकडून एक दिवसीय बनी प्रशिक्षण देण्यात येईल.


जिल्हास्तर व तालुका स्तर प्रशिक्षण आयोजनाची जबाबदारी DIET यांचेवर असेल. त्यानुसार प्रशिक्षण स्थळ व तज्ज्ञांची निवड करणेबाबत आवश्यक पूर्वतयारी करावी. इ.१ली च्या ज्या शिक्षकांचे दि.०२ ते १5 जून, २०२५ कालावधील निवडश्रेणी प्रशिक्षण आहे त्यांचेसाठी नवीन अभ्यासक्रमाचे प्रशिक्षण दि.१३ ते १५ जून, २०२५ कालावधीत आयोजित करावे.

इ. 1ली नवीन अभ्यासक्रम प्रशिक्षण आयोजन सूचना

जिल्हास्तर व तालुकास्तर प्रशिक्षण आयोजनासंदर्भात मार्गदर्शक सूचना.

१. हे प्रशिक्षण शासकीय, स्थानिक स्वराज्य संस्था व खाजगी अनुदानित शाळांमधील सर्व माध्यमांच्या शिक्षकासाठी लागू असेल. तसेच खाजगी विना अनुदानित व स्वयंअर्थसहायित शाळांमधील शिक्षकासाठी स्वतंत्रपणे लागू असेल,

२. जिल्हा व तालुकास्तरासाठी अपेक्षित प्रशिक्षणार्थी संख्या निश्चित करुन देण्यात आलेली आहे त्या मर्यादेतच प्रत्येक घटकास प्रशिक्षण दिले जाईल, प्रत्येक शाळेतून इ.१ली वर्गास शिकविणारे सर्व शिक्षक याचा लाभ घेतील असे नियोजन करावे. त्यानंतरच उपलब्धतेनुसार पुढील वर्षी इ.१ली वर्गास शिकविणाऱ्या शिक्षकांचा यामध्ये समावेश करावा.

३. शाळेत इ.१ली वर्गाच्या जेवढ्या तुकड्या मंजूर असतील त्यांवरील शिक्षकांनाही हे प्रशिक्षण मिळेल असे नियोजन करावे.

४. प्रशिक्षण घेणाऱ्या शिक्षकांच्या एकूण संख्येनुसार ५० प्रशिक्षणार्थ्यांची एक बेंच याप्रमाणे बैठक व्यवस्था करावी,

५. प्रत्येक वर्गासाठी कमाल ०३ तज्ज्ञ मार्गदर्शक / सुलभक अनुज्ञेय असतील. जिल्हा अथवा तालुका स्तरावरील प्रशिक्षण एकापेक्षा अधिक टप्प्यामध्ये आयोजित केले जात असेल तर त्यासाठी उपलब्ध सुलभक दुबार वापरता येतील,

६. या प्रशिक्षणाचा कालावधी एकूण ०३ दिवस असून, प्रशिक्षणासाठी दिलेल्या विषयांनुसार एक तासिका ९० मिनिटांची याप्रमाणे दररोज ०४ तासिका होतील.

७. प्रशिक्षणादरम्यान घ्यावयाच्या तासिकांचे नियोजन, व आशय यास्तरावरुन पुरविण्यात येईल. त्यानुसार चर्चा, सादरीकरण, गटकार्य, प्रात्यक्षिक पूर्ण होतील याची दक्षता घ्यावी.

८. प्रशिक्षणार्थी यांचेसाठी पूर्वचाचणी, उत्तरचाचणी आणि अभिप्राय फॉर्म ऑनलाईन स्वरुपात प्रशिक्षार्थी वेळचेवेळी नोंदवतील याची खात्री करावी.

९. प्रशिक्षकांसाठी घटकसंच जिल्हास्तरापर्यंत आणि वाचन साहित्य म्हणून पायाभूत शिक्षण अभ्यासक्रम २०२४ भाग-१ व भाग-२ (प्रत्येक शाळेस एक संच याप्रमाणे) तालुकास्तरापर्यंत पुरविण्यात आलेले आहे. सर्व प्रशिक्षणार्थी यांना आपल्या शाळेस पुरविण्यात आलेला पायाभूत शिक्षण अभ्यासक्रम संच सोबत आणणेबाबत कळवावे,

१०. जिल्हास्तरीय प्रशिक्षण आवश्यकतेप्रमाणे निवासी स्वरुपाचे असू शकेल व तालुकास्तर प्रशिक्षण हे अनिवासी स्वरूपाचे असेल.

११. सदर प्रशिक्षण हे मराठी, उर्दू व इंग्रजी माध्यमाच्या शाळेतील शिक्षकांसाठी स्वतंत्रपणे घ्यावयाचे आहे.



१२. केवळ मराठी माध्यमासाठी जिल्हा व तालुकास्तर प्रशिक्षणाचे नियोजन असेल.

१३. उर्दू व इंग्रजी माध्यमांसाठी तालुकास्तरावर पुरेशी संख्या होऊ शकत नसल्याने त्यांचेसाठी जिल्हास्तर हा शेवटचा टप्पा असेल. संख्येनुसार वर्ग पूर्ण होण्यासाठी काही ठिकाणी एकापेक्षा अधिक जिल्ह्याचे प्रशिक्षण नियोजन एकत्र दिलेले आहे. सदर प्रशिक्षण ज्या जिल्ह्यात असेल त्या DIET मार्फत सदर प्रशिक्षणाचे आयोजन होईल.

१४. वरिष्ठ व निवड श्रेणी (दि.०२ ते १२ जून) प्रशिक्षणामध्ये काही इ.१ली चे प्रशिक्षणार्थी सहभागी असू शकतील त्यांचेसाठी स्वतंत्र बेंच दि. १३ ते १५ जून, २०२५ दरम्यान आयोजित करावी.


१५. खर्च लेखाशीर्ष (शासकीय व स्थानिक स्वराज्य संस्था यांच्या साठी)-

Samagra Shiksha २०२५-२६

Component: ५.६-Training for In-service Teacher and Head Teachers

Activity: ५.६.१ - In-Service Training (Elementary)

Sub Activity: 3-Teachers Class I to V (Government Schools)

२६. खर्च लेखाशीर्ष (खाजगी अनुदानित साठी) -

Samagra Shiksha २०२५-२६

Component: ५.६-Training for In-service Teacher and Head Teachers

Activity: ५.६.१ - In-Service Training (Elementary)

Sub Activity: -Teachers Class I to V (Government Aided Schools)

१७. खर्चाच्या बाबी व निकष (प्रशिक्षण, प्रशिक्षणार्थी व तज्ज्ञ मार्गदर्शक यांचेसाठी)


तालुकास्तरीय प्रशिक्षण खर्च - रु.१५०/-प्रतिव्यक्ती प्रतिदिन (प्रशिक्षणार्थी व तज्ज्ञ खर्च मान्य सदर खर्च खालील बाबींवर करण्यात येईल. 

स्टेशनरी, प्रमाणपत्र व अनुषंगिक खर्च,

उपस्थित प्रशिक्षणार्थी व सुलभकांसाठी- २ वेळ चहा व दुपारचे भोजन यावरील खर्च,

सुलभकांना मानधन - रु.४०० प्रतिव्यक्ती प्रतिदिन मर्यादेत.


नेमून दिलेल्या मर्यादत खर्चाचे नियोजन करावे, दिलेल्या खर्च मयदितच एकूण खर्च होईल याची दक्षता घ्यावी

आर्थिक तरतूदीनुसार निधी प्राप्त झाल्यानंतर PFMS/ NEFT च्या माध्यमातून अदा करण्यात येईल.

सर्व खर्च व देयके, अभिलेखे वित्तीय नियमानुसार ठेवली जातील याची दक्षता घ्यावी.


१८. शासकीय व स्थानिक स्वराज्य संस्था यांच्या प्रशिक्षण नोंदी स्वतंत्र व खाजगी अनुदानित प्रशिक्षण नोंदी स्वतंत्र ठेवाव्यात. खर्चाचे लेखाशीर्ष स्वतंत्र आहे. त्यानुसार निधी मागणी व वितरण होईल.

१९. खाजगी विना अनुदानित व स्वयंअर्थसहायित शाळांतील शिक्षकांसाठी सदर प्रशिक्षण स्वतंत्रपणे व मोफत आयोजित करावे त्यासाठी कोणतीही आर्थिक तरतूद उपलब्ध असणार नाही.

२०. दि.१५ जून २०२५ पर्यंत सर्वांचे प्रशिक्षण पूर्ण होईल याची खात्री करावी. 

२१. परिणामकारकतेसाठी पायाभूत शिक्षण अभ्यासक्रम २०२४ नुसार नवीन पाठ्यक्रमाचे प्रशिक्षण घेतलेल्या शिक्षकांनाच इ.१लीचा वर्ग अध्यापनासाठी दिला जाईल याची खात्री शिक्षणाधिकारी (प्राथमिक) यांनी करावी.


तरी, आपल्या कार्यक्षेत्रातील इ.१ली इयत्तेस शिकविणाऱ्या प्रत्येक शाळेतील शिक्षकांचे प्रशिक्षण निर्धारित वेळेत पूर्ण केले जाईल याची दक्षता गटशिक्षणाधिकारी, प्रशासन अधिकारी यांनी घ्यावी, प्राचार्य डाएट व शिक्षणाधिकारी (प्राथमिक) यांनी संनियंत्रण करावे.

जिल्हास्तर व तालुकास्तर प्रशिक्षण आयोजनासंदर्भात मार्गदर्शक सूचना, खर्च तपशील बाबतचे परिपत्रक (24 मे) डाउनलोड करा. Click Here


इयत्ता १ लीच्या शिक्षकांसाठी नवीन अभ्यासक्रमानुसार प्रशिक्षण आयोजित करणेबाबत परिपत्रक डाउनलोड करा - Click Here

Post a Comment

0 Comments

close