Latest Update

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

Udise Teacher Module | udise शिक्षक माहिती | detach, attach / import

Udise Teacher Module मध्ये शिक्षक माहिती कशी भरावी? बदली झालेल्या शिक्षकांना नवीन शाळेत युडायस पोर्टलवर कसे Attach / Detach करावे? याविषयी जाणून घेऊया. 


Udise Teacher Module - शिक्षक माहिती कशी भरावी? - Click Here


बदली झालेल्या शिक्षकांना नवीन शाळेत युडायस पोर्टलवर कसे Attach / Detach करावे? 


प्रथमतः युडायस पोर्टलवर Teacher Module वर खालील लिंक ने लॉगिन करावे.

https://udiseplus.gov.in/udiseteacher/home


UDISE  Main Profile and facilities - Click Here

UDISE Teacher Module link - Click Here

UDISE Student Module link - Click Here

UDISE Report Module link - Click Here


Teacher module Login झाल्यावर आपल्याला Total आणि Incomplete शिक्षकसंख्या दिसेल त्यापैकी INCOMPLETE संख्येवर क्लिक करावे.


आता आपल्यापुढे शिक्षकांची नावे आलेली असतील त्यापैकी ज्या शिक्षकांची शाळेतून बदली झालेली आहे त्यांच्या नावापुढे शेवटच्या रकान्यात Left हा पर्याय उपलब्ध आहे. त्यावर क्लिक करावे. नंतर Remark मध्ये Transfer हा पर्याय निवडावा व दिनांक मध्ये कार्यमुक्त झाल्याचा दिनांक टाकावा.


हे करत असताना शिक्षकांच्या नावाखाली असणारा त्यांचा नॅशनल कोड नमूद करून ठेवावा. नाही ठेवला तरीही नंतर तो आपल्याला inactive  Teacher या टॅब मधून मिळवता येईल.


अशा पद्धतीने बदली झालेल्या शिक्षकांना Detach करता येईल.


Udise मध्ये शिक्षकांना Attach कसे करावे? 

नंतर नवीन शाळेत हजर झालेल्या शिक्षकांना तिथेच DASHBOARD वर IMPORT ही टॅब उपलब्ध आहे त्यामधून आपल्याला त्यांचा नॅशनल कोड व जन्मतारीख टाकून Import / attach करता येईल.


फक्त हे करत असताना कार्यमुक्त दिनांक व हजर दिनांक बरोबर टाकावा.


Udise Student माहिती (वजन,उंची,रक्तगट, promotion,import, attach, dettach, New add ) कशी भरावी? -Click Here

Post a Comment

0 Comments

close