Latest Update

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

जिल्हांतर्गत ऑनलाईन बदली प्रक्रियेतील समानीकरण या संदिग्ध मुद्द्याचे स्पष्टीकरण...

जिल्हांतर्गत ऑनलाईन बदली प्रक्रियेतील समानीकरण मुद्द्याचे स्पष्टीकरण पहा. काही शंका असल्यास अवश्य कमेंट करा. 

शिक्षक बदली 2022 नवीन अपडेट जाणून घ्या. - Click Here

जिल्हांतर्गत बदली शासन निर्णय 7 एप्रिल 2021 डाउनलोड करण्यासाठी येथे टच करा.  Click Here

आंतरजिल्हा बदली शासन निर्णय 7 एप्रिल 2021 डाऊनलोड करण्यासाठी येथे टच करा. 


अवघड / पेसा व सुगम क्षेत्रातील शिक्षकांचा समतोल राहावा. दोन्ही क्षेत्रात समान शिक्षक कार्यरत राहावेत. अशा चांगल्या हेतूने, तसेच सर्व शिक्षकांना समान न्याय देणारा, अवघड क्षेत्रातील विद्यार्थ्यांना लाभदायक ठरणारा मुद्दा आहे. पण हा मुद्दा बऱ्याच शिक्षकांना अन्यायकारक वाटतो. काय आहे समानीकरण मुद्दा पाहूया. 



  • RTE Act नुसार जिल्हा परिषद शाळांमध्ये कोणत्याही परिस्थितीत १०% पेक्षा जास्त जागा रिक्त ठेवणे शक्य नाही, त्यामुळे समानीकरणाचे धोरण नियमानुसार राबविण्यात येईल, याची दक्षता सर्व मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी घ्यावयाची आहे. 
  • समानीकरणातून अवघड /पेसा व सुगम क्षेत्रातील शिक्षकांचा समतोल साधला जाईल. 
  • समानीकरणाच्या जागा निश्चित करण्यासाठी संबंधित जिल्हा परिषदांच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली संबंधित जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी व शिक्षणाधिकारी (प्राथमिक) यांची समिती गठित करण्यात येईल. समानीकरणासाठी कोणत्या जागा निश्चित कराव्यात, याबाबत चा निर्णय सदर समिती घेईल. 
  • अवघड व सुगम क्षेत्रातील शिक्षकांचा समतोल राखण्यासाठी टप्पा क्र १ नुसार समानीकरणाची पदे निश्चित केली जातील. यातून बदलीस पात्र नसणारे शिक्षक बदलीस पात्र होवू शकतात. (कसे ते टप्पा क्र १ मधील स्पष्टीकरण पहा.
  • समानीकरणातून रिक्त ठेवलेली पदे कोणत्याही संवर्गातील शिक्षकांना उपलब्ध केली जाणार नाहीत. 🚫
  • टप्पा क्र. ५ मधील विस्थापित शिक्षकांना सुद्धा समानीकरणातून रिक्त ठेवलेली पदे घेता येणार नाहीत. 
  • प्रतिनियुक्ती (प्रसुती रजा, बालसंगोपन,गंभीर अपघात इ. साठी) देण्यात येणाऱ्या शिक्षकांना सुद्धा समानीकरणातील पदे रिक्त ठेवली जाणार नाहीत. 
  • समानीकरणासाठी रिक्त ठेवायची पदे भरती किंवा अतिरिक्त खाजगी शिक्षकांच्या समायोजनाद्वारे उपलब्ध झाल्याशिवाय ती पदे खुली करता येणार नाहीत. ❌

Post a Comment

0 Comments

close