Latest Update

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

TAIT Exam Result and Marksheet | शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी निकाल व गुणपत्रक

TAIT Exam Result and Marksheet | शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी निकाल व गुणपत्रक डाउनलोड करा. 


महाराष्ट्र राज्यातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्था व खाजगी व्यवस्थापनाच्या शाळांमध्ये पवित्र या संगणकीय प्रणालीव्दारे शिक्षक भरती करीता शिक्षक अभियोग्यता व बुध्दीमत्ता चाचणी (TAIT) - २०२२ या परीक्षेचे ऑनलाईन पध्दतीने दिनांक २२/०२/२०२३ ते ०३/०३/२०२३ या कालावधीत आयोजन करण्यात आले होते.

सदर परीक्षेचा निकाल दि. २४/०३/२०२३ रोजी प्रसिध्द करण्यात आला व गुणयादी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या www.mscepune.in या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आली आहे.


सर्व उमेदवारांची गुणयादी PDF डाउनलोड करा. 


सदर परीक्षेस प्रविष्ठ झालेल्या उमेदवारांना त्यांचे गुणपत्रक (Marklist / Score Card) वेबलिंकव्दारे उपलब्ध करून देण्यात येत आहे. सदर वेबलिंक महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या www.mscepune.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

परीक्षेला प्रविष्ठ उमेदवारांनी त्यांचे गुणपत्रक दि. २०/०४/२०२३ पर्यंत डाऊनलोड करुन घ्यावे व त्याची प्रत आपले जवळ संपुर्ण प्रक्रिये दरम्यान जपून ठेवावी.

TAIT Exam Marksheet Download link 1 - Click Here

TAIT Exam Marksheet Download link 2  - Click Here

शिक्षक अभियोग्यता व बुध्दीमत्ता चाचणी (TAIT) - 2022 - गुणपत्रक डाऊनलोड वेबलिंक - Click Here


Official website - www.mscepune.in


शिक्षक अभियोग्यता व बुध्दीमत्ता चाचणी (TAIT) - 2022 - गुणपत्रक डाऊनलोड करणे संदर्भात परिपत्रक 


महाराष्ट्र शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी ही प्रामुख्याने अभियोग्यता व बुद्धिमत्ता या दोन घटकावर आधारित असेल, शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमतामध्ये शेकडा ६०% म्हणजेच १२० प्रश्न हे अभियोग्यता या घटकावर आधारित असतील, तर शेकडा ४०% म्हणजेच ८० प्रश्न हे बुद्धिमत्ता या घटकावर आधारित असतील. शिक्षक अभियोग्यता व बुध्दिमत्ता चाचणी (TAIT Exam)- 2022 ही परीक्षा ऑनलाईन घेतली जाते. 

Post a Comment

0 Comments

close