Latest Update

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

Google Search

आंतरजिल्हा बदली 2022 नवीन अपडेट.| आंतरजिल्हा बदली झालेल्या शिक्षकांना कार्यमुक्त करणेबाबत शासन निर्णय | टप्पा 1 ते 5 च्या याद्या डाउनलोड करा.

जिल्हा परिषदेतील प्राथमिक शिक्षकांच्या आंतरजिल्हा बदल्या ह्या ऑनलाईन पध्दतीने करण्याबाबत दिनांक ७.४.२०२१ च्या शासन निर्णयान्वये धोरण निश्चित करण्यात आले आहे. त्यानुसार आंतरजिल्हा बदली प्रक्रिया ही ऑनलाइन असणार आहे. 


आंतरजिल्हा बदली शासन निर्णय 7 एप्रिल 2021 डाऊनलोड करण्यासाठी येथे टच करा. 


Join WhatsApp Group

   आंतरजिल्हा बदली संदर्भात परिपत्रके



16) 13 सप्टेंबर 2023 - आंतरजिल्हा बदली 2022 मध्य बदलीस अर्ज केलेल्या प्रतिक्षाधीन शिक्षकांच्या बदलीबाबत वेळापत्रक- Click Here


15 एप्रिल 2023 पर्यंत आदेश 
30 एप्रिल 2023 पूर्वी सोडण्यात येणार




13) 20 ऑक्टोबर 2022 - स्तनदा माता व गरोदर माता यांना त्यांच्या सोईनुसार पदस्थापना देणेबाबत शासन परिपत्रक - Click Here

12) 19 सप्टेंबर - आंतरजिल्हा बदली ने आलेल्या शिक्षकांना पद स्थापना देणेबाबत - Click Here

11) 7 सप्टेंबर 2022 - आंतरजिल्हा बदली टप्पा 5 मध्ये झालेल्या बदल्या संदर्भात तक्रार निवारण करण्यासाठी नियमावली - Click Here



9) आंतरजिल्हा बदली याद्या टप्पा 5 Click Here

8) ज्या शिक्षकांच्या आंतरजिल्हा बदली झालेल्या आहेत त्यांना बदली झाले बाबत Email येत आहे. तसेच ज्या शिक्षकांच्या आंतरजिल्हा बदली झाल्या नाहीत त्यांना  बदली न झाले बाबत E-mail आलेले आहेत. आंतरजिल्हा बदली आदेश 24 ऑगस्ट रोजी निर्गमित होणार. 




5) आंतरजिल्हा बदली 2022  - 1 ऑगस्ट 2022 अपडेट - आंतरजिल्हा बदली बाबतचे वेळापत्रक.

5 ऑगस्ट पासून पोर्टल सुरु होणार
13 ऑगस्ट ला बदली आदेश निर्गमित होणार

3 ऑगस्ट रोस्टर अपलोड करणे. 
4 ऑगस्ट रोस्टर प्रदर्शित करणे. 



शिक्षक आंतरजिल्हा बदली पोर्टल वेबसाईट 

https://ottportal.mahardd.in/

बदली प्रक्रिया 5 ऑगस्ट पासून सुरु होणार. 


5) New Update 9.08.2022 शासन स्तरावरून सर्वानाच आंतरजिल्हा बदली फॉर्ममध्ये दुरुस्तीची संधी देण्यात येत आहे.

*त्यासाठी शिक्षकांनी प्रथम आपले बदली पोर्टल लॉगिन करावे.*

👉 शिक्षकांनी पोर्टलवर लॉगिन केल्यावर *Appliction Form* वर क्लिक करावे

👉आपणास आपल्या बदलीफॉर्म च्या माहितीसह *Withdraw* हे बटण दिसेल त्यावर क्लिक करावे.

👉यानंतर आपल्या मोबाईल नंबरवर *OTP* येईल सदर OTP नोंद केल्यावर *Action Performed Successfully* असा मेसेज दिसेल.

👉त्यानंतर पोर्टलवर परत एकदा  फॉर्म भरण्यासाठी सुविधा उपलब्ध झालेली दिसेल यामध्ये सुरवातीला *Demotion Disclaimer* दिसेल ती वाचल्यावर शेवटी *Accept*-या बटनावर क्लिक करावे.

👉 त्यांतर आपणास ज्या संवर्गातून  बदली फॉर्म भरायचा आहे त्यातून योग्यरित्या फॉर्म भरावा.

*महत्वाची सूचना*

बदली फॉर्म दुरुस्ती संधी दिली आहे. त्यामुळे बदली फॉर्म काळजीपूर्वक भरावा त्यामध्ये कोणतीही चूक होणार नाही याची काळजी घ्यावी.


4) आंतरजिल्हा बदली एकेरी NOC रद्द बाबत - शासन परिपत्रक - 10 जून 2022




3) आंतरजिल्हा बदली 2022  - 1 जून 2022 अपडेट - आंतरजिल्हा बदली मध्ये सर्व जिल्ह्यांचा समावेश करणेबाबत.. 

ज्या जिल्हा परिषदेमध्ये रिक्त पदांची टक्केवारी १०% पेक्षा जास्त असेल त्या जिल्हा परिषदेला बदली प्रक्रियेमध्ये सहभाग घेता येणार नाही, अशी कुठलीही तरतुद दिनांक ७.४.२०२१ च्या शासन निर्णयामध्ये करण्यात आलेली नाही. सदरची बदली प्रक्रिया ही बिंदुला बिंदु अशापध्दतीने होणे अपेक्षीत आहे जर काही जिल्हा परिषदेमधील रिक्त पदांची टक्केवारी १०% पेक्षा जास्त असल्यास त्या जिल्ह्यामध्ये शिक्षकांची नियुक्ती झाल्यानंतर तेथील बदली झालेल्या शिक्षकांना अन्य जिल्हा परिषदेमध्ये आंतरजिल्हा बदलीने कार्यमुक्त करणे शक्य होईल. त्यामुळे जिल्हा परिषदांमध्ये रिक्त पदांची टक्केवारी १०% पेक्षा जास्त असली तरी अशा सर्व जिल्हा परिषदांना, जिल्हा परिषद शिक्षकांच्या सन २०२२ मध्ये होणाऱ्या ऑनलाईन बदली प्रक्रियेमध्ये सहभागी करुन घेणे आवश्यक आहे.

2) आंतरजिल्हा बदली 2022 - 06 एप्रिल 2022 अपडेट - रोस्टर तपासणी करणे बाबत

शासन परिपत्रक - 6 एप्रिल 2022 - Click Here

आंतरजिल्हा बदल्या करण्यापूर्वी संबंधित जिल्ह्यांची रोस्टर तपासणी पुर्ण झालेलो असणे आवश्यक आहे. यासंदर्भात संबंधित जिल्हा परिषदांनी आपल्या कार्यालयातील मागासवर्ग कक्षाकडे मागासवर्गीय कक्षास रोस्टर तपासून देण्याचे प्रस्ताव सादर केलेले आहेत. सबब आपणास विनंती करण्यात येते की, संबंधित जिल्हा परिषदांच्या रोस्टर तपासणीबाबतच्या प्रस्तावावर त्वरित कार्यवाही करण्याच्या सूचना मागासवर्गीय कक्षास देण्यात आलेल्या आहेत.

1) आंतरजिल्हा बदली 2022 - 21 जानेवारी 2022 अपडेट - आंतरजिल्हा बदली सुरु करणेबाबत... 

आंतरजिल्हा बदली व जिल्हांतर्गत बदली सन २०२२ या ऑनलाईन पध्दतीने करण्याबाबत सॉफ्टवेअर कंपनीची नियुक्ती करण्यात आली असून सदर कंपनीने बदल्यांबाबतची कार्यवाही करण्याकरिता कार्यपध्दती सुरु केलेली आहे. सन २०२२ मध्ये करावयाच्या प्राथमिक शिक्षकांच्या आंतरजिल्हा बदल्यांकरिता 7 एप्रिल 2021 च्या शासन निर्णयामध्ये दिलेल्या सूचनांनुसार प्राथमिक शिक्षकांच्या संदर्भात खालीलप्रमाणे माहितीची पुर्तता करण्याबाबत सर्व जिल्हा परिषदांना कळविण्यात आले आहे.

आंतरजिल्हा बदली 2022 ऑनलाईन प्रक्रिया सुरु करणेबाबत परिपत्रक - Click Here.

आंतरजिल्हा बदली याद्या - Click Here

१) शिक्षकांचे रोस्टर (बिंदुनामावली) विभागीय आयुक्त, मागासवर्गीय कक्षाकडून तपासून घेणे. 

२) रोस्टर तपासणी करुन घेतल्यानंतर रोस्टरनिहाय रिक्त पदाची यादी.

३. जिल्हा परिषदेतील प्राथमिक शिक्षकांची आंतरजिल्हा बदलीसंदर्भतील ऑनलाईन प्रक्रिया सुरु असताना खालील बाबींचा विचार करावा.

३.१) शिक्षणाचा हक्क अधिनियमातील तरतुदी विचारात घेऊन आंतरजिल्हा बदलीकरिता पदोन्नत झालेल्या शिक्षकांनी स्वखुशीने पदावनत करण्याबाबत दिलेल्या संमतीपत्राबाबत निर्णय घ्यावा.

३.२) संदर्भाधीन शासन निर्णयासोबतच्या परिशिष्टातील अ.क्र.६ येथे नमूद केल्यानुसार आंतरजिल्हा बदलीसाठी अर्ज करणारा शिक्षक स्थानिक अनुसूचित जमातीचा आहे किंवा कसे याबाबतची खात्री करुनच संमती देण्यात यावी.

३.३. उपरोक्त परिच्छेद क्र.२ प्रमाणे कार्यवाही आपल्याकडून अद्याप झालेली नसेल तर त्याबाबतची प्रक्रिया दिनांक १०.२.२०२२ पर्यंत पूर्ण करण्याची दक्षता आपण घ्यावी.

Post a Comment

0 Comments

close