हिंगणघाट शहराजवळील सातेफळ येथील निवासी शाळेतील कोरोनाबधितांचा आकडा 100 वर पोहोचला आहे. शाळेतील मोठ्या संख्येत विद्यार्थी पॉजिटीव्ह येत असल्याने शहरात खळबळ माजली आहे. अँटिजन टेस्ट मध्ये निगेटिव्ह आलेल्या 23 लोकांचा आज आरटीपीसीआर चाचणीत अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.
हिंगणघाट कोरोना अपडेट Hinganghat school corona
वर्धा: येथील हिंगणघाटमधील निवासी शाळेतील कोरोनाबाधित विद्यार्थी आणि कर्मचाऱ्यांची संख्या 100 वर पोहोचली आहे. 100 रुग्णांमध्ये 94 विद्यार्थ्यांसह 6 शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. रॅपिड अँटीजन टेस्ट मध्ये निगेटिव्ह आलेल्या 23 लोकांचा आरटीपीसीआर अहवाल पॉजिटिव्ह आल्यानं चिंता वाढली आहे. (Wardha School corona positive cases number increased to hundred)
सातेफळ निवासी शाळेतील कोरोनाबाधितांची संख्या 100 वर
1 फेब्रुवारीला अनलॉक प्रक्रियेदरम्यान निवासी शाळा उघडण्यात आलीय.या दरम्यान सर्व शिक्षकांची कोरोना चाचणी सुद्धा करण्यात आली. सातेफळ येथील निवासी शाळा सुद्धा एक फेब्रुवारीला सुरू झालीय. शाळेत विदर्भाच्या पाच जिल्ह्यातील विद्यार्थी शिकतात .एकूण 292 विद्यार्थी येथे शिकतात. 6 फेब्रुवारीला एका विद्यार्थ्यांची प्रकृती अस्वस्थ होती. त्याला खासगी रुग्णालयात दाखविण्यात आले. दरम्यान त्याचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला. 9 तारखेला 30 विद्यार्थ्यांची चाचणी करण्यात आली. त्यांचा अहवाल बुधवारी प्राप्त झाला. यामध्ये 30 जण पॉझिटिव्ह आले. त्यानंतर 247 विद्यार्थी व 30 कर्मचाऱ्यांची ॲंटीजन चाचणी करण्यात आली. यामध्ये 45 विद्यार्थी पॉझिटिव्ह आढळून आले तर कर्मचारी निगेटिव्ह आले.
यादरम्यान सर्वांची कोरोना चाचणी करण्यात आल्यावर 77 लोकांचा चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला होता. यात एका शिक्षकेतर कर्मचाऱ्याचा समावेश होता.अँटीजेन टेस्ट मध्ये निगेटिव्ह आलेल्या सर्वांना विलगीकरणात ठेवत त्यांचीही आरटीपीसीआर टेस्ट करण्यात येत आहे. यात आज 23 आणखी रुग्ण पॉझिटिव्ह आढळले आहेत.
भिती न बाळगता सावधानता बाळगा - तालुका आरोग्य अधिकारी
कोरोनाची लागण झालेले विद्यार्थी हे एकाच वसतीगहातील असून कोरोना पॉझिटिव्ह आलेल्या सर्वांना विलगीकरण कक्षात ठेवण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. इतर विद्यार्थी व पालकांनी भिती न बाळगता सावधानता बाळगावी तरच आपण कोरोना ला हरवू शकतो. असे आवाहन तालुका आरोग्य अधिकारी डॉ माधुरी कुचेकर यांनी सांगितले आहे.



0 Comments