शाळा प्रवेश वय निश्चिती मानीव दिनांक 30 जून - शाळा प्रवेशासाठी बालकाचे किमान वय निश्चित करणेबाबत मानीव दिनांक 30 जून अनुसरून प्रवेशासाठी वय निश्चित करण्यात येणार आहे.
शाळा प्रवेशासाठी जन्मदिनांक व वयाबाबतचे परिपत्रक डाउनलोड करण्यासाठी येथे टच करा.
बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा हक्क अधिनियम, २००९ नुसार बालकांच्या शाळा प्रवेशाबाबतची कार्यपध्दती शासन निर्णय, दि. ११.०६.२०१० अन्वये निश्चित करण्यात आलेली आहे. सदर शासन निर्णयात प्रवेशाबाबतच्या इतर तरतुदीबरोबरच शाळा प्रवेशासाठी बालकाचे वयाबाबतची तरतूद आहे. सदर तरतूदीनुसार इयत्ता १ ली मधील प्रवेशासाठीची वयोमर्यादा ६ वर्षे निश्चित केलेली होती. तथापि, ५ वर्षे पूर्ण झालेले बालक इयत्ता १ ली मधील प्रवेशासाठी पात्र राहतील, असे आदेशात नमूद केले होते. राज्यात राज्य मंडळाचा अभ्यासक्रम राबविणाऱ्या शाळा, सी. बी. एस. ई., आय. सी. एस. ई., आय. बी. अशा विविध प्रकारच्या शाळा आहेत. सदर सर्व प्रकारच्या शाळांमध्ये प्रवेशाच्या वेळेस इयत्ता १ ली साठी वेगवेगळी वयोमर्यादा वेगवेगळ्या दिनांकास ग्राह्य धरुन प्रवेश दिले जात होते. तसेच पूर्व प्राथमिकसाठी वर्गातील प्रवेशासाठी निश्चित अशी वयाची अट अस्तित्वात नव्हती. या बाबी विचारात घेऊन बालकांच्या किमान वयामध्ये शिथिलता आणण्यासाठी संदर्भाधीन शासन निर्णयान्वये बालकांच्या शाळा प्रवेशासाठी किमान वय निश्चित करण्यात आले आहे.
शैक्षणिक वर्ष सुरू होताना प्ले ग्रुप/ नर्सरी (इ. १ ली पूर्वीचा ३ रा वर्ग) २.५ वर्ष आणि इ. १ ली साठी प्रवेश देताना ५.५ वर्ष वयाच्या मुलांना प्रवेश दिला जातो. आता, केंद्र शासनाने इ. १ ली साठी प्रवेश देताना ६+ वर्ष वयाच्या मुलांना प्रवेश द्यावा, असे कळविलेले आहे. तसेच, नवीन शैक्षणिक धोरण २०२० नुसार, बालकांचे इयत्ता पहिलीतील वयाचे ६+ धोरण राबविताना पूर्व प्राथमिक (१ ली पूर्व) वर्गाना वयाचे धोरण ठरविल्यास इयत्ता पहिलीच्या वर्गात प्रवेश देताना वयाच्या अटीचा पुढील ३ वर्ष अडथळा येणार नाही, याकरिता बालवाडी/अंगणवाडी/ नर्सरी यात प्रवेश देताना मुलाचे वय ३० जून रोजी ३ वर्ष पूर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यासाठी प्रवेशाबाबतची टप्याटप्याने अंमलबजावणी करणे आवश्यक आहे. त्यास अनुसरून शाळा प्रवेशासाठी बालकांचे किमान वय निश्चित करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती.
शासन निर्णयः- 15 ऑक्टोबर 2026
सदर शासन निर्णयान्वये पूर्व प्राथमिक व इयत्ता १ मधील शाळा प्रवेशासाठीचे किमान वय खालील तक्त्यात नमूद करण्यात आल्याप्रमाणे निश्चित करण्यात येत आहे.
1) प्रवेशाचा वर्ग - बालवाटिका 1 / नर्सरी (इ.१ ली पूर्वीचा ३ रा वर्ग)
किमान वय वर्ष ३+
वयाबाबत मानिव दिनांक 30 जून
अंमलबजावणी वर्ष 2027-28 पासून
2) प्रवेशाचा वर्ग - बालवाटिका 2 / ज्युनिअर के जी (इ.१ ली पूर्वीचा 2रा वर्ग)
किमान वय वर्ष 4+
वयाबाबत मानिव दिनांक 30 जून
अंमलबजावणी वर्ष 2028-29 पासून
3) प्रवेशाचा वर्ग - बालवाटिका 3 / सिनियर के जी (इ.१ ली पूर्वीचा 1ला वर्ग)
किमान वय वर्ष 5+
वयाबाबत मानिव दिनांक 30 जून
अंमलबजावणी वर्ष 2029-30 पासून
4) प्रवेशाचा वर्ग - इ.१ ली
किमान वय वर्ष 6+
वयाबाबत मानिव दिनांक 30 जून
अंमलबजावणी वर्ष 2030-31 पासून
२. पायाभूत वर्गासाठी नामांकन, नर्सरी ते इयत्ता पहिलीमध्ये प्रवेशासाठी किमान वय निकषांसह, राष्ट्रीय शिक्षण धोरण, २०२० मध्ये दिलेल्या सुचनांचे पालन करण्यात यावे.
३. उपरोक्त तक्त्यात नमूद केल्याप्रमाणे वयाचे निकष शैक्षणिक वर्ष २०२७-२८ पासून टप्प्याटप्प्याने लागू केले जातील.
४. सन २०२६-२७ च्या शैक्षणिक सत्रासाठी नर्सरी ते इयत्ता पहिलीच्या विद्यमान विद्यार्थ्यांसाठी हे वयाचे निकष लागू होणार नाहीत.
५. पूर्व-प्राथमिक वर्गाच्या (नर्सरी) ते इयत्ता पहिलीसाठी शाळाप्रमुख स्तरावर किमान आणि कमाल वय १५ दिवसांची वयाची सूट दिली जाईल.
६. कोणत्याही मान्यताप्राप्त शाळेतून मागील वर्ग उत्तीर्ण झालेल्या नियमित विद्यार्थ्यांना पुढील उच्च वर्गात प्रवेशासाठी वयानुसार निकष लागू करण्यापासून सूट दिली जाईल.
७. शैक्षणिक वर्ष २०२७-२८ पासून प्रवेश घेण्यासाठी, बालकांचे दि. ३० जून रोजी उपरोक्त तक्त्यात दर्शविल्यानुसार किमान वय पूर्ण केलेले असणे आवश्यक आहे. (म्हणजेच, शैक्षणिक वर्ष २०२७-२८ मध्ये ३+ वर्षांच्या वयात नर्सरीमध्ये प्रवेश करणारे बालक ६+ वर्षांच्या वयात इयत्ता पहिलीमध्ये असेल.)
८. पूर्व-प्राथमिक वर्ग आणि इयत्ता पहिलीसाठी नवीन वयाच्या निकषांनुसार विद्यार्थ्यांच्या प्रवेशाबाबत सूचना/मार्गदर्शक सुचना शिक्षण संचालक (प्राथमिक), प्राथमिक शिक्षण संचालनालय, पुणे यांच्या स्तरावरून देण्यात याव्यात.
९. सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेत स्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेतांक २०२६१०१५१७१४४७१०४९ असा आहे. हा शासन निर्णय डिजिटल स्वाक्षरीने साक्षांकित करून काढण्यात येत आहे.
शाळा प्रवेशासाठी बालकाचे किमान वय निश्चित करणेबाबत शासन निर्णय - 15 ऑक्टोबर 2026 - Click Here
शाळा प्रवेशासंदर्भात यापूर्वीचे शासन निर्णय
शाळा प्रवेशासाठीचे किमान वय 31 डिसेंबर ही मानीव तारीख ग्राह्य धरणेबाबत शासन निर्णय
शासनाने दि.११ जून, २०१० च्या शासन निर्णयान्वये शाळा प्रवेशाबाबतची कार्यपध्दती निश्चित केलेली आहे. सदर शासन निर्णयात प्रवेशाबाबतच्या इतर तरतूदीबरोबरच शाळा प्रवेशासाठी बालकाचे वयाबाबतची तरतूद आहे. सदर तरतूदीनुसार इयत्ता १ ली मधील प्रवेशासाठीची वयोमर्यादा ६ वर्षे निश्चित केलेली होती. तथापि, ५ वर्षे पूर्ण झालेले बालक इयत्ता १ ली मधील प्रवेशासाठी पात्र राहतील, असे आदेशात नमूद केले होते.
राज्यात राज्य मंडळाचा अभ्यासक्रम राबविणाऱ्या शाळा, सी.बी.एस.ई., आय. सी.एस.ई., आय.बी. अशा विविध प्रकारच्या शाळा आहेत. सदर सर्व प्रकारच्या शाळांमध्ये प्रवेशाच्या वेळेस इयत्ता १ ली साठी वेगवेगळी वयोमर्यादा वेगवेगळ्या दिनांकास ग्राह्य धरुन प्रवेश दिले जात होते. तसेच पूर्व प्राथमिकसाठी वर्गातील प्रवेशासाठी निश्चित अशी वयाची अट अस्तित्वात नव्हती. या बाबी विचारात घेऊन यामध्ये एकवाक्यता आणण्यासाठी उपाययोजना सुचविण्यासाठी शिक्षण संचालक (प्राथमिक) यांच्या अध्यक्षतेखाली एकसदस्यीय समिती नियुक्त करण्यात आली होती. सदर समितीने दिलेल्या शिफारशीनुसार
1) शासन निर्णय दिनांक २१/०१/२०१५ व दि.२३/०१/२०१५ च्या शुध्दीपत्रकान्वये ३१ जुलै हा मानिव दिनांक गृहीत धरुन बालकाचे किमान वय पूर्व प्राथमिक (इयत्ता १ ली पूर्वीचा ३ रा वर्ग) (प्ले-ग्रुप/नर्सरीसाठी) साठी ३ वर्षे पूर्ण व इयत्ता १ ली साठी ६ वर्षे पूर्ण असे आदेश निर्गमित करण्यात आले आहेत.
2) शासन निर्णय दि.२५/०१/२०१७ अन्वयेशाळा प्रवेशासाठी ३० सप्टेंबर हा मानिव दिनांक घोषित करण्यात आलेला आहे.
3) तसेच शासन निर्णय दि.२५/०७/२०१९ अन्वये शाळा प्रवेशासाठी बालकांच्या किमान वयामध्ये जास्तीत जास्त १५ दिवसांची शिथिलता देण्याचे अधिकार मुख्याध्यापकांना देण्यात आले आहेत.
शिक्षण संचालक (प्राथमिक), महाराष्ट्र राज्य, पुणे यांनी दि. १८/०२/२०२० रोजीच्या पत्रान्वये बालकांच्या किमान वयामध्ये शिथिलता आणण्याबाबतचा प्रस्ताव सादर केला होता. त्यास अनुसरुन शाळा प्रवेशासाठी बालकांच्या किमान वयामध्ये शिथिलता देण्याबाबतची बाब शासनाच्या विचाराधीन होती. याबाबतचा शासन निर्णय खालीलप्रमाणे आहे.
शासन निर्णयः
सदर शासन निर्णयान्वये पूर्व प्राथमिक व इयत्ता १ ली मधील शाळा प्रवेशासाठीचे किमान वय 31 डिसेंबर ही मानीव तारीख धरुन पुढीलप्रमाणे निश्चित करण्यास मान्यता देण्यात येत आहे.
1) प्रवेशाचा वर्ग - प्ले ग्रुप / नर्सरी (इ.१ ली पूर्वीचा ३ रा वर्ग)
किमान वय वर्ष ३+
वयाबाबत मानिव दिनांक 31 डिसेंबर
अंमलबजावणी वर्ष 2021-22 पासून
2) प्रवेशाचा वर्ग - इ.१ ली
किमान वय वर्ष 6+
वयाबाबत मानिव दिनांक 31 डिसेंबर
अंमलबजावणी वर्ष 2021-22 पासून
सदर आदेश राज्यातील सर्व प्रकारच्या, सर्व व्यवस्थापनाच्या शाळांना लागू राहतील.
सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेताक २०२००९१८१६११११९५२१ असा आहे.
शैक्षणिक वर्ष 2026-2027 साठी इयत्ता पहिलीत दाखल करावयाच्या मुलांसाठी मानीव दिनांक म्हणून 31 डिसेंबर ही मानीव दिनांक निश्चित करण्यात आली आहे.
admission date for academic year 2026-2027 (standard -1st, nursery, L.K.G.)
RTE 25% Admission Online Application all process and website link - Click Here
31 डिसेंबर 2026 रोजी 6 वर्ष पूर्ण असणारी बालके इयत्ता पहिलीत दाखल करण्यात येतील. 6 वर्ष पूर्ण असणाऱ्या अशा बालकांना सक्ती पात्र / दाखल पात्र म्हणून समजण्यात येईल. RTE act नुसार अशी बालके शाळेत दाखल करुन घ्यावीच लागतील.
Join WhatsApp Group
शाळा प्रवेशासाठी बालकाचे किमान वय निश्चित करण्याबाबत दिनांक १८/०९/२०२० रोजीच्या शासन निर्णयान्वये मानीव दिनांक ३१ डिसेंबर करण्यात आला आहे. शासनाने किमान वयोमर्यादा ठेवलेली आहे परंतू कमाल वयोमर्यादा नाही. मानिव दिनांक बदलामुळे माहे जुलै ते नोव्हेंबर महिन्यात जन्मलेल्या विद्यार्थ्याचे शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून शैक्षणिक वर्ष सन 2026-27 साठी आरटीई २५ टक्के प्रवेशासाठी वयोमर्यादा दिनांक 31 डिसेंबर 2026-27 अखेर पुढील प्रमाणे राहील.. या वर्षी सन 2026-2027 साठी कमाल व किमान वयोमर्यादा पुढीलप्रमाणे असणे आवश्यक आहे.
शैक्षणिक वर्ष 2026-2027 साठी दाखल जन्मदिनांक/वयो मर्यादा
प्रवेशाचा वर्ग
वयोमर्यादा
किमान वय
कमाल वय
नर्सरी / प्ले ग्रुप
1 जुलै 2022 ते 31 डिसेंबर 2023
3 वर्षे
4व 5म 30दि
ज्युनिअर KG
1 जुलै 2021 ते 31 डिसेंबर 2022
4 वर्षे
5व 5म 30दि
सिनिअर KG
1 जुलै 2020 ते 31 डिसेंबर 2021
5 वर्षे
6व 5म 30दि
इयत्ता पहिली
1 जुलै 2019 ते 31 डिसेंबर 2020
6 वर्षे
7व 5म 30दि
शाळा प्रवेशासाठी जन्मदिनांक व वयाबाबतचे परिपत्रक 2026-27 डाउनलोड करण्यासाठी येथे टच करा.
शंका समाधान
शंका १) शैक्षणिक वर्ष 2026-2027 साठी इयत्ता पहिलीत कोणत्या मुलाला दाखल कराल?
उत्तर - ज्या बालकाची जन्मतारीख 1 जुलै 2019 ते 31 डिसेंबर 2020 या दरम्यान आहे अशी बालके इयत्ता पहिलीत दाखल करावीत.
शंका २) जुुुलै 2020 ते डिसेंबर 2021 मधील बालकांचा प्रवेश कसा करावा?
उत्तर - ज्या बालकाची जन्मतारीख 01 जुलै 2020 ते 31 डिसेंबर 2021 मधील आहे अशा बालकांना सिनिअर के जी मध्ये दाखल करावे.
शंका 3) जुुुलै 2021 ते डिसेंबर 2022 मधील बालकांचा प्रवेश कसा करावा?
उत्तर - ज्या बालकाची जन्मतारीख 01 जुलै 202q ते 31 डिसेंबर 2022 मधील आहे अशा बालकांना ज्युनियर के जी मध्ये दाखल करावे.
शंका 4) जुुुलै 2022 ते डिसेंबर 2023 मधील बालकांचा प्रवेश कसा करावा?
उत्तर - ज्या बालकाची जन्मतारीख 01 जुलै 2022 ते 31 डिसेंबर 2023 मधील आहे अशा बालकांना प्ले ग्रुप / नर्सरी मध्ये दाखल करावे.
शाळा प्रवेश वय निश्चिती बाबत परिपत्रक डाउनलोड करा.
शाळा प्रवेशासाठी जन्मदिनांक व वयाबाबतचे परिपत्रक 2026-27 डाउनलोड करण्यासाठी येथे टच करा.
शाळा प्रवेशासाठी जन्मदिनांक व वयाबाबतचे परिपत्रक 2025-26 डाउनलोड करण्यासाठी येथे टच करा.
शाळा प्रवेशासाठी जन्मदिनांक व वयाबाबतचे परिपत्रक 2024-25 डाउनलोड करण्यासाठी येथे टच करा.
शाळा प्रवेशासाठी जन्मदिनांक व वयाबाबतचे परिपत्रक 2023-24 डाउनलोड करण्यासाठी येथे टच करा.
शाळा प्रवेशासाठी जन्मदिनांक व वयाबाबतचे परिपत्रक 2022-23 डाउनलोड करण्यासाठी येथे टच करा.
शाळा प्रवेशासाठी जन्मदिनांक व वयाबाबतचे परिपत्रक 2021-22 डाउनलोड करण्यासाठी येथे टच करा.





0 Comments