अधिकारी/कर्मचारी यांची ई-केवायसी पूर्ण करणेबाबत शासन निर्णय| EKYC Form PDF | EKYC Process
ई-केवायसी पूर्ण करण्यास मुदतवाढ देणेबाबत परिपत्रक 19 ऑगस्ट 2026
खाजगी व्यवस्थापनाच्या अंशतः अनुदानित, अनुदानित व जिल्हा परिषद प्राथमिक/माध्यमिक शाळेतील शालार्थ प्रणालीमधून वेतन घेणाऱ्या सर्व शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी यांचे ई-केवायसी दि.२० सप्टेंबर, २०२६ पर्यंत पूर्ण करण्यासाठी मुदतवाढ देण्यात आली होती.
तथापि क्षेत्रियस्तरावर शिक्षक/शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या ई-केवायसी कामाचा आढावा घेताला असता, सदर कामासाठी काहीसा कालावधी लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे शालार्थ प्रणालीमधून वेतन घेणाऱ्या सर्व शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी यांचे ई-केवायसी दि.05 ऑक्टोबर, 2026पर्यंत पूर्ण करण्यासाठी मुदतवाढ देण्यात येत आहे.
दि. 05 ऑक्टोबर, 2026 पर्यंत ई-केवायसी पूर्ण न केल्यास संबंधित शिक्षक/शिक्षकेतर कर्मचारी यांचे माहे ऑक्टोबर, २०२६ चे वेतन देय नोव्हेंबर, २०२६ मध्ये आहरित करण्यात येणार नाही. शालार्थ प्रणालीतील शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या ई-केवायसी पूर्ण करण्यासाठी यापुढे कोणतीही मुदतवाढ देण्यात येणार नाही.
ई-केवायसी पूर्ण करण्यास मुदतवाढ देणेबाबत परिपत्रक 20 सप्टेंबर 2026
ई-केवायसी पूर्ण करण्यास मुदतवाढ देणेबाबत परिपत्रक 19 ऑगस्ट 2026
ई-केवायसी पूर्ण करण्यास मुदतवाढ देणेबाबत परिपत्रक 31 जुलै 2026
दि.27.03.2026 अन्वये सेवार्थ प्रणालीतील अधिकारी/कर्मचारी यांचे ई-केवायसी पूर्ण करणेबाबत सविस्तर निर्देश देण्यात आले होते. तसेच दि.23.04.2026 अन्वये माहे मे २०२६ पर्यंत ई-केवायसी पूर्ण करणेबाबत मुदतवाढ देण्यात आलेली होती.
तथापि मा. प्रधान सचिव, वित्त विभाग मंत्रालय मुंबई यांनी दि. २८/७/२०२६ रोजीच्या आढावा बैठकीमध्ये शालार्थ प्रणालीमधून वेतन घेणा-या सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचा-यांचे ई-केवायसी तात्काळ पूर्ण करणेबाबत निर्देश दिलेले आहे.
दिलेल्या निर्देशानुसार अंशतः अनुदानित, खाचगी अनुदानित व जिल्हा परिषद प्राथमिक/माध्यमिक शाळेतील शालार्थ प्रणालीमधून वेतन घेणाऱ्या सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांचे माहे ऑगस्ट, २०२६ देय सप्टेंबर, २०२६ या वेतन देयकाअगोदर ई-केवायसी पूर्व करावयाची आहे. सदर ई-केवायसी पूर्ण न केल्यास संबंधित शिक्षक/शिक्षकेतर कर्मचारी यांचे माहे ऑगस्ट, २०२६ देय सप्टेंबर, २०२६ चे वेतन आहरित करण्यात येणार नाही. तसेच याबाबत कोणतीही मुदतवाढ देण्यात येणार नाही याची सर्व संबंधितांनी गांभीर्याने नोंद घ्यावी. याबाबत आपल्या स्तरावरून संबंधित सर्व शाळांना तात्काळ सूचना देण्यात याव्यात
ई-केवायसी पूर्ण करण्यास मुदतवाढ देणेबाबत परिपत्रक 31 जुलै 2026
ई-केवायसी पूर्ण करण्यास मुदतवाढ देणेबाबत परिपत्रक 23 एप्रिल 2026
सर्व प्रशासकीय विभागातील सर्व आहरण व संवितरण अधिकाऱ्यांच्या अधिनस्त असलेल्या अधिकारी कर्मचारी यांनी माहे एप्रिल, २०२६ देय मे, २०२६ या वेतन देयकाअगोदर ई केवायसी पूर्ण करण्याबाबत सूचना देण्यात आल्या होत्या.
तथापि, अद्यापि काही प्रशासकीय विभागांकडून सदरची कार्यवाही पूर्ण न झाल्याचे निदर्शनास आल्यामुळे सेवार्थ प्रणालीत वेतन घेणाऱ्या सर्व आहरण व संवितरण अधिकाऱ्यांच्या अधिनस्त असलेल्या अधिकारी /कर्मचारी यांनी माहे मे, २०२६ देय जून, २०२६ या वेतन देयकाअगोदर ई-केवायसी पूर्ण करण्यास मुदतवाढ देण्यात येत आहे. मात्र यापुढे अशी कोणतीही मुदतवाढ देण्यात येणार नाही, याची सर्व संबंधितांनी गांभिर्याने नोंद घ्यावी,
ई-केवायसी पूर्ण करण्यास मुदतवाढ देणेबाबत परिपत्रक 23 एप्रिल 2026
सॅलरी अकाउंट साठी e-KYC करण्याची प्रोसेस
1) आपल्या आधार कार्ड ची दोन्ही बाजू ची XEROX प्रत घेऊन ग्राहक सेवा प्रतिनिधीना दाखवा.
2) आधार बेस सिस्टिम वर आपला बायोमेट्रिक ( अंगठा किंवा कोणतेही एक बोट ) प्रमाणीकरण करा.
3) आता आधार XEROX व ग्राहकसेवा प्रतिनिधी ने दिलेली प्रमाणीकरण प्रत सांगितलेल्या बँक कर्मचारी कडे द्या.
4) आपण आधीच भरून आणलेल्या e -KYC प्रतीवर बँक कर्मचारी सही शिक्का करून देतील.
5) ही प्रत आपल्या केंद्र शाळेत किंवा पंचायत समितीत सूचनेनुसार जमा करा.
(बँकेत जाताना आपले आधार कार्ड दोन्ही बाजू XEROX, e - KYC फॉर्म, बँक पासबुक घेऊन जावे).
E-KYC Form PDF - Click Here
E-KYC Bank Statement - Click Here
सर्व अधिकारी/कर्मचारी यांची ई-केवायसी पूर्ण करणेबाबत संचालक यांचे परिपत्रक डाउनलोड करा - Click Here
सेवार्थ / शालार्थ प्रणालीतील अधिकारी/कर्मचारी यांचे ई-केवायसी पूर्ण करणेबाबत शासन निर्णय 27 मार्च 2026
प्रस्तावना -
सेवार्थ प्रणालीमध्ये सर्व नियमित शासकीय अधिकारी/कर्मचारी यांची माहिती भरण्यात आलेली आहे. सदर माहितीनुसार अधिकारी/कर्मचाऱ्यांचे वेतन आहरीत होत असते. सदर माहितीमध्ये त्यांच्या बँक खात्याच्या माहितीसोबतच संबंधित कर्मचाऱ्यांचा PAN क्रमांक, आधार क्रमांक नोंदविलेला आहे. एकंदरीतच पूर्ण माहितीमध्ये कोणत्याही अधिकारी/कर्मचाऱ्यांची दुबार माहिती सेवार्थ प्रणालीत नोंद होऊ नये तसेच कोणत्याही अधिकारी/कर्मचाऱ्यास दुबार वेतन अदा होऊ नये, याकरीता शासनाने ठोस उपाययोजना करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यास अनुसरुन, सर्व प्रशासकीय विभागातील सर्व आहरण व संवितरण अधिकारी यांना खालीलप्रमाणे सूचना देण्यात येत आहेत.
शासन परिपत्रक :-
१. सेवार्थ प्रणालीत वेतन घेणाऱ्या सर्व आहरण व संवितरण अधिकाऱ्यांच्या अधिनस्त असलेल्या अधिकारी / कर्मचारी यांनी माहे एप्रिल, २०२६ देय मे, २०२६ या वेतन देयकाअगोदर ई-केवायसी पूर्ण करावयाची आहे. सदर ई-केवायसी पूर्ण न केल्यास संबंधित अधिकारी /कर्मचारी यांचे माहे एप्रिल, २०२६ देय माहे मे, २०२६ चे वेतन आहरीत करण्यात येणार नाही.
२. सदर ई-केवायसी पूर्ण करण्यापूर्वी अधिकारी/कर्मचारी यांच्या बँक खात्याशी आधार क्रमांक संलग्न असलेले बैंक खाते सेवार्थ प्रणालीत अद्ययावत केले असले पाहिजे. सेवार्थ प्रणालीत उपलब्ध असलेले बैंक खाते आधार क्रमांकांशी संलग्न नसेल तर असे खाते त्वरीत बदलण्यात येऊन सेवार्थ प्रणालीत आधार क्रमांकांशी संलग्न असलेले बैंक खाते अद्ययावत करण्यात यावे.
३. तसेच सेवार्थ प्रणालीत नोंदविलेला PAN क्रमांक चूकीचा असल्यास, नोंदविण्यात आलेला PAN क्रमांकाची दुरुस्ती करुन अद्ययावत करण्यात यावा.
४. सदर ई-केवायसी प्रत्येक अधिकारी/कर्मचारी यांनी व्यक्तिशः पूर्ण करुन त्याचे प्रमाणपत्र आहरण व संवितरण अधिकाऱ्यांकडे जमा करावयाचे आहे. आहरण व संवितरण अधिकाऱ्यांनी असे प्रमाणपत्र सादर केल्यानंतर सेवार्थ प्रणालीत देण्यात आलेल्या ई-केवायसी अपडेशन रिपोर्टमध्ये सदर अधिकारी / कर्मचारी यांची नोंद करावयाची आहे. सदर नोंद करतांना ई-केवायसी अन्वये पडताळणी करण्यात आलेला बैंक खात्याचा तपशील व सेवार्थ प्रणालीत नोंदविण्यात आलेला बैंक तपशील या दोहोंमध्ये साम्य असल्यासच सदर नोंद घेण्यात यावी अन्यथा प्रथम ई-केवायसी केल्याप्रमाणे सेवार्थ प्रणालीत बँक खात्याचा तपशील अद्ययावत करावा.
२. तसेच सदरचे परिपत्रक हे सर्व जिल्हा परिषदा, मान्यता प्राप्त व अनुदानित अशासकीय प्राथमिक व माध्यमिक शाळा, शालेय शिक्षण विभाग (शालार्थ प्रणाली), महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठ, कृषितर विद्यापीठे व त्यांच्याशी संलग्लित मान्यता प्राप्त व अनुदानित अशासकीय महाविद्यालये, कृषि विद्यापीठे व त्यांच्याशी संलग्लित मान्यता प्राप्त व अनुदानित महाविद्यालये/संस्था, अदिवासी विकास विभागांतर्गत असलेल्या मान्यताप्राप्त व अनुदानित आश्रमशाळा व संस्था, वैद्यकीय विद्यापीठ उच्च व तंत्र शिक्षण/कौशल्य विकास विभागाच्या अधिनस्त संस्था, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाकडील संस्था यांनादेखील लागू राहील.
३. सदर शासन परिपत्रक महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आले असून त्याचा संगणक सांकेतांक क्र. २०२६०३२७१४४१५६७००५ असा आहे. हे शासन परिपत्रक डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करुन काढण्यात येत आहे.
E-KYC करणेबाबत शासन निर्णय 27 मार्च 2026 डाउनलोड करा. - Click Here






0 Comments