कोरोना विषाणू च्या वाढत्या प्रादुर्भावामुळे दोन दिवसांपूर्वीच केंद्रीय शिक्षण मंत्रालयाने बारावीच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला होता. राज्य शिक्षण विभागाने काल आपत्ती व्यवस्थापन विभागाकडे परीक्षा रद्द करणे बाबतचा प्रस्ताव पाठविण्यात आला होता. आज अखेर बारावीची परीक्षा रद्द (Maharashtra HSC exam Cancelled) करण्याबाबतचा निर्णय जाहीर करण्यात आला आहे.
दहावी/बारावी नंतरचे करिअर पर्याय वाचा -
महा करिअर पोर्टल - एका क्लिक वर अडीच लाख अभ्यासक्रमाची माहिती.
CBSE ने बारावीच्या परीक्षा रद्द केल्यानंतर महाराष्ट्र राज्यातील बारावीच्या परीक्षेबाबत मंत्रीमंडळात चर्चा करण्यात आली. त्यानंतर शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी कालच बारावी परीक्षा रद्द करण्याचा प्रस्ताव आपत्ती व्यवस्थापन विभागाला पाठवल्याचं सांगितलं होतं. शिक्षण विभागाने पाठवलेला प्रस्ताव आपत्ती व्यवस्थापन विभागाने स्वीकारला आहे. त्यामुळे आता महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक (Maharashtra Board) शिक्षण मंडळाच्या बारावीच्या परीक्षा (Maharashtra HSC exam cancelled) अधिकृतपणे रद्द झाल्या आहेत. परीक्षा रद्द झाल्यामुळे विद्यार्थी, पालक यांच्या यावरील तणाव कमी झाला आहे.
बारावीच्या परीक्षा रद्द झाले बाबत चा शासन निर्णय डाउनलोड करा.
इ. 10 वी मूल्यमापनासाठी Excel Sheet व मूल्यमापन करण्यासाठी बोर्डाच्या वतीने मार्गदर्शन you tube live
बारावीची परीक्षा 23 एप्रिलला होणार होती. परंतू कोरोनाच्या आपत्कालीन परिस्थिती मुळे बारावीच्या परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या होत्या. केंद्राने दोन दिवसापूर्वी सीबीएससीच्या परीक्षा रद्द केल्या. यावर बोलताना शालेय शिक्षणमंत्री वर्षाताई गायकवाड यांनी विद्यार्थ्यांचे आरोग्य ही आमची प्राथमिकता आहे. परीक्षा घेण्यापेक्षा विद्यार्थ्यांचे आरोग्य लाख मोलाचे आहे. त्यानुसार आज परीक्षा रद्द करण्यात आल्या आहेत. राज्य सरकारच्या या निर्णयामुळे बारावीच्या 14 लाख विद्यार्थी व पालकांना दिलासा मिळणार आहे. यापूर्वीच इयत्ता दहावीच्या परीक्षेबाबत निर्णय घेण्यात आलेला आहे.
इयत्ता 10वी चे मूल्यमापनाचे निकष पहा. 100 पैकी कसे दिले जातील मार्क



0 Comments