यंदाच्या 10वीच्या परीक्षा होणार नाहीत. असा लावणार निकाल... शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी सांगितला निकालाचा फॉर्म्युला....
▪️ महाराष्ट्रामध्ये यंदा कोविड 19 च्या पार्श्वभूमीवर आता दहावीची परीक्षा रद्द करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. त्यामुळे पालक आणि विद्यार्थ्यांना परीक्षा रद्द झाल्यास यंदा दहावीचा निकाल कसा लावणार? पुढे 11वीचे प्रवेश कसे दिले जाणार? असे एक ना अनेक प्रश्न पडले आहेत.
▪️ पण या प्रश्नांवर आज शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी खुलासा केला आहे. यंदा 10वीचे निकाल हे 9 वीचे मार्क्स आणि 10 वीच्या वर्गात प्रात्याक्षिक, तोंडी परीक्षा, अंतर्गत मूल्यमापन यांच्या आधरावर लावले जाणार आहेत. तर 11वी प्रवेशासाठी सीईटी परीक्षा होणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले आहे.
▪️ भारतात कोरोनाच्या दुसर्या लाटेचा प्रभाव पाहता महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळाप्रमाणेच सीबीएसई, आयसीएसई बोर्डाने देखील आपल्या 10वीच्या परीक्षा रद्द करत विद्यार्थ्यांना वर्गोन्नती देण्याचा निर्णय घेतला आहे.
दहावी नंतरचे करिअर पर्याय वाचा -
महा करिअर पोर्टल - एका क्लिक वर अडीच लाख अभ्यासक्रमाची माहिती.
🤔 महाराष्ट्र बोर्ड दहावीच्या मूल्यांकनाचे निकष
पुढील तीन निकषांवर लागणार दहावीचा निकाल
- विद्यार्थ्यांच्या 9 वीच्या गुणांना 50 टक्के,
- अंतर्गत मूल्यमापनाला 30 टक्के आणि
- तोंडी व प्रात्यक्षिक परीक्षांना 20 टक्के गुण दिले जातील.
- या सुत्रानुसार 100 गुणांकनानुसार दहावीचे निकाल यंदा जाहीर होतील.
कसा होईल अकरावी प्रवेश?
▪️ तर अकरावी प्रवेशासाठी विद्यार्थ्यांना वैकल्पिक सीईटी द्यावी लागणार आहे, सीईटी दिलेल्या विद्यार्थ्यांना कॉलेजांमध्ये प्राधान्याने प्रवेश मिळेल आणि रिक्त जागांवर इतर विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जाईल असे देखील सांगण्यात आले आहे.
11 वी ऑनलाईन प्रवेश घेण्यासाठी वेबसाइट - Click Here.
▪️ दहावी बोर्ड परीक्षा रद्द करण्याचा महाराष्ट्र राज्य सरकारच्या निर्णयाला आव्हान देणारी जनहित याचिका काही दिवसांपूर्वी मुंबई उच्च न्यायालयात दाखल झाली आहे.
बारावीच्या परीक्षेबाबत अद्याप निर्णय नाही.
▪️राज्यात दहावीची परीक्षा रद्द झाली असली तरीही बारावीच्या परीक्षांबाबत अद्यापही सरकार विचाराधीन आहे. राज्यातील कोविडची परिस्थिती पाहून राज्यात 12वीच्या परीक्षेच्या तारखा जाहीर होणार आहेत.
0 Comments