Latest Update

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

CBSE 10th Result कसे मिळणार मार्क, CBSE ने जाहीर केले 57 FAQ

सीबीएसई बोर्डाने दहावीचा निकाल तयार करण्यासाठी मार्किंग स्कीमसंबंधी FAQ जारी केले आहे. यामध्ये एकूण ५७ प्रश्न उत्तरांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना कशा प्रकारे गुण दिले जातील, ते समजावून सांगितले आहे.


सीबीएसई बोर्डाने यापूर्वीच दहावीच्या अंतर्गत मूल्यांकनाबाबतचे निकष जाहीर करण्यात आले आहेत. अंतर्गत मूल्यपमान पूर्ण करून निकाल जाहीर करण्यात येणार आहे. दहावीतील प्रत्येक विद्यार्थ्याला प्रत्येक विषयासाठी 100 पैकी मार्क्स दिले जातील. यामध्ये 20 मार्क हे इंटरनल असेसमेंटसाठी असतील. तर बाकीचे 80 रिझल्ट समिती देईल.

मूल्यमापन निकष व रिझल्ट समिती विषयी जाणून घ्या. 


परीक्षेशिवाय कसा लावणार निकाल? 

परीक्षेशिवाय निकाल कसा लावणार याबाबत बोर्डाने यापूर्वीच सांगितले. मूल्यमापनाचे निकष पहा. पण या गुणांकन पद्धतीबाबत विद्यार्थ्यांच्या मनात गोंधळ आहे. विद्यार्थी, पालक आणि शिक्षकांचा गोंधळ दूर करण्यासाठी केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने (CBSE) दहावी परीक्षेसंबंधी गुणांकन करण्यासाठी फ्रीक्वेंटली आस्क्ड क्वेश्चंस (FAQ) जारी केले आहेत. यात एकूण ५७ प्रश्न आणि त्यांची उत्तरे देण्यात आली आहेत. हे असे प्रश्न आहेत, जे सर्वसामान्यपणे विद्यार्थी-पालकांकडून विचारले जात आहेत.

57  प्रश्नांची FAQ असणारी PDF डाउनलोड करा. - Click Here

 FAQ मधील  काही प्रश्न  -

प्रश्न: जर एखाद्या विद्यार्थ्याने वर्षभरात एकही परीक्षा दिली नसेल तर त्याचं मूल्यांकन कसं केलं जाणार?

उत्तर: शाळा आता अशा विद्यार्थ्यांची चाचणी घेऊ शकतात. ही टेस्ट ऑफलाइन किंवा ऑनलाइन किंवा फोन कॉल द्वारे घेऊ शकतात. शाळांनी या चाचणीचे प्रमाण बोर्डाला पाठवायचं आहे.

प्रश्न: जर पालकांना मुलांची उत्तरपत्रिका पाहायची असेल किंवा निकालानंतर गुणांची पडताळणी करायची असेल तर काय करावे?

उत्तर: या वर्षीसाठी बोर्डाने ही सुविधा दिलेली नाही. तुम्ही टेस्ट कॉपी पाहू शकत नाही, गुणपडताळणीसाठी देखील अर्ज करता येणार नाही.

Question Bank for CBSE 10th and 12th Class

प्रश्न: सीबीएसई आयोजित वेबिनारचा दुवा काय आहे?

उत्तर - सीबीएसई आयोजित दुवा आहे.

 https://youtu.be/3eW4WnEQgaU

प्रश्न: डबल शिफ्ट शाळांत समितीची स्थापना कशी असेल? 

 उत्तर - डबल शिफ्ट असणार्‍या सर्व शाळांमध्ये दोन्ही शिफ्टमधून शिक्षकांची निवड करावी लागेल. प्रत्येक शाळेला एक संलग्नता क्रमांक देण्यात आला आहे. सर्व व्यवस्था शाळेचे प्रभारी प्राचार्य करतील.

प्रश्न: जर एखाद्या शाळेने एकापेक्षा जास्त प्री-बोर्ड परीक्षा घेतल्या असतील, तर विविध विषयांसाठी विविध प्री-बोर्डचे गुण ग्राह्य धरणार का?

उत्तर: त्या शाळेची निकाल समिती सीबीएसई बोर्डाची मार्किंग पॉलिसी ध्यानात ठेवून योग्य निर्णय घेऊ शकते. पण त्यांना बोर्डाला पाठवण्याच्या कागदपत्रांमध्ये याचा उल्लेख करावा लागेल.

CBSE 10th Result 2021: अंतर्गत मूल्यमापनासाठी सीबीएसईचा आराखडा

प्रश्न: कोणत्या परिस्थितीत कोणत्या विद्यार्थ्यांना अनुपस्थित ठरवले जाऊ शकते?

उत्तर: जर कोणी विद्यार्थी शहरात नसेल आणि फोनवर देखील उपलब्ध नसेल, त्या विद्यार्थ्याला शाळा अनुपस्थित ठरवू शकते.

जर एखादा विद्यार्थी प्री बोर्डमध्ये गैरहजर होता, आणि त्याच्या पालकांशीही बोर्डाला संपर्क साधता आला नाही, तेव्हा त्याला ॲबसेंट मार्क केला जाऊ शकतो.

प्रश्न: सीबीएसईने कमाल ८० गुणांसाठी मूल्यांकन करण्यास सांगितले आहे. मात्र जर एखाद्या शाळेने कमाल ३० किंवा ५० किंवा ७० गुणांसाठी परीक्षा घेतली असेल तर मूल्यांकन कसे असेल?

उत्तर: अशा स्थितीत पुढील पद्धतीने मूल्यांकन होईल. समजा एखाद्या विद्यार्थ्याला ३० पैकी २५ गुण मिळाले असतील तर -

Out of 50

२५X५० = १२५०/३० = ४१.६६ (४२ गुण)

Out of 70

२५X७० = १७५०/३० = ५८.३३ (५८ गुण)

Out of 80

२५X८० = २०००/३० = ६६.६६ (६७ गुण)

प्रश्न: जर रेफरन्स इयरमध्ये कोणत्या अतिरिक्त विषयांची परीक्षा झाली नाही, जो विषय यावर्षी विद्यार्थ्याने ऑप्ट केला आहे, तर त्याचे गुण कसे मिळणार?

उत्तर: मेन पाच सब्जेक्ट्स (दोन मुख्य भाषा, गणित, विज्ञान आणि सामाजिक शास्त्र) व्यतिरिक्त कोणत्याही भाषा किंवा अतिरिक्त विषयात (जिसकी परीक्षा उस स्कूल के रेफरेंस ईयर में नहीं हुई थी) बेस्ट तीन विषयांच्या गुणांची सरासरी काढून गुण दिले जातील.

Post a Comment

0 Comments

close