सीबीएसई बोर्ड दहावीच्या अंतर्गत मूल्यांकनाबाबतचे निकष जाहीर करण्यात आले आहेत. अंतर्गत मूल्यपमान पूर्ण करून 20 जून पर्यंत निकाल जाहीर करण्यात येणार आहे.
दहावीतील प्रत्येक विद्यार्थ्याला प्रत्येक विषयासाठी 100 पैकी मार्क्स दिले जातील. यामध्ये 20 मार्क हे इंटरनल असेसमेंटसाठी असतील. तर बाकीचे 80 रिझल्ट समिती देईल. बहुतांश शाळांमध्ये इंटरनल असेसमेंटची प्रक्रिया पूर्ण झालेली आहे. ज्या शाळांनी इंटरनल असेसमेंटचे मार्क सीबीएसई पोर्टलवर अपलोड केलेले नाहीत. त्यांना ते 11 जून 2021 पर्यंत अपलोड करणे बंधनकारक असेल.
CBSE board official website वर जाण्यासाठी येथे टच करा.
प्रत्येक शाळेत रिझल्ट समिती
दहावीतील विद्यार्थ्यांचे मूल्यमापन करण्यासाठी प्रत्येक शाळेत रिझल्ट समिती नेमण्यात येणार आहे. रिझल्ट समितीमध्ये पुढीलप्रमाणे 8 सदस्य असतील.
1) शाळेचे प्राचार्य
2) त्या शाळेतील कोणतेही पाच शिक्षक
3) शेजारच्या शाळेतील 2 शिक्षक
मूल्यमापन करण्याचे वेळापत्रक असे असेल
5 मे - शाळांनी रिझल्ट कमिटी तयार करणे
25 मे - शाळेकडून अंतिम निकालाची तयारी करणे
28 मे - शाळेकडून मोडरेशन आणि तपासणी
5 जून - सीबीएसई कडे शाळांनी मार्क पाठविणे
11 जून- इंटर्नल असेसमेंट चे 20 गुण सीबीएसईकडे शाळांनी पाठविणे
20 जून - सीबीएसई कडून 10 वी बोर्डाचा निकाल जाहीर करणे
याप्रमाणे सर्व कार्यवाही पूर्ण झाल्यास सीबीएसई दहावीचा निकाल हा 20 जून 2021 ला घोषित होवू शकतो.
वाचा - CBSE बोर्डाने विद्यार्थ्यांसाठी लॉंच केले इ परीक्षा पोर्टल
सीबीएसई दहावीच्या मूल्यमापनाचे निकष
सीबीएसई दहावीचे मूल्यमापन 100 गुणांवर आधारित केले जाणार आहे. 100 गुण असे दिले जातील.
1) 20 गुण - अंतर्गत मूल्यमापन ( इंटर्नल असेसमेंट ) साठी असतील. जे शाळांनी विद्यार्थ्यांकडून सोडवून घेतलेले असतील.
2) 80 गुणांचे अंतर्गत मूल्यमापन खालील प्रमाणे
- 10 गुण- घटक चाचणी परीक्षांचे गुण (युनिट टेस्ट )
- 30 गुण - सहामाही / सत्र परीक्षेचे गुण
- 40 गुण - बोर्डाच्या सराव परीक्षा गुण (प्री लिम परीक्षा गुण)
0 Comments