Latest Update

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

बाल चित्रकला स्पर्धा 2026 संपूर्ण माहिती | नोंदणी लिंक - https://msbae.ac.in/ | https://balchitrakala2026.msbae.in/

बाल चित्रकला स्पर्धा 2026 संपूर्ण माहिती | नोंदणी लिंक - https://msbae.ac.in/ | https://balchitrakala2026.msbae.in/



महाराष्ट्र राज्य कला शिक्षण मंडळ, मुंबई यांच्या वतीने ८ ऑगस्ट २०२६ रोजी राज्यभर बालचित्रकला स्पर्धा २०२६ आयोजित करण्यात येणार आहे. इयत्ता १ ली ते १० वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी चार गटांमध्ये ही स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे.

शाळा व विद्यार्थ्यांची ऑनलाइन नोंदणी १ जुलै ते ०४ ऑगस्ट २०२६ या कालावधीत करावी.


राज्य कला शिक्षण मंडळामार्फत गतवर्षीप्रमाणेच बालचित्रकला स्पर्धा २०२६ चे आयोजन दिनांक ०८ ऑगस्ट, २०२६ रोजी करण्यात येणार आहे. राज्यातील सर्व जिल्हा परिषद/नगरपालिका/ महानगरपालिका यांच्या हद्दीतील सर्व शासनमान्य प्राथमिक व माध्यमिक शाळामध्ये इयत्ता १ ली ते १० वी मधील इयत्तानिहाय ४ गटामध्ये एकाच दिवशी बालचित्रकला स्पर्धा आयोजित करावयाची आहे. महाराष्ट्रातील सर्व प्राथमिक व माध्यमिक शाळेच्या मुख्याध्यापकांनी https://www.msbae.ac.in या संकेतस्थळावरील बालचित्रकला या टॅबमध्ये किंवा या https://balchitrakala2026.msbae.in लिंकवर शाळेची ऑनलाईन नोंदणी करावयाची आहे. गटनिहाय तपशील व प्रवेश शुल्क खालील प्रमाणे,


बालचित्रकला स्पर्धेचे प्रवेश शुल्क तसेच जिल्हास्तरीय व राज्यस्तरीय बक्षीसांच्या रकमेत सन २०२५ पासून वाढ करण्यात आलेली आहे. सदर स्पर्धा ही चार गटामध्ये घेतली जाणार असून इयत्ता १ ली ते इयत्ता १० वी पर्यंतचे गटनिहाय विद्यार्थी यामध्ये सहभागी होऊ शकतात. सदर स्पर्धेमध्ये सहभाग घेण्यासाठी प्रति विद्यार्थी रु २०/- अक्षरी रुपये वीस फक्त एवढे स्पर्धा शुल्क आहे. प्रति विद्यार्थी रु २०/- रक्कमेमधून ड्रॉईंग कागदाचा ११ X १५ इंच या आकाराचा खर्च रु.५/- वजा करून उर्वरित रक्कम रु.१५/- प्रति विद्यार्थी मंडळाकडे दिनांक ३१.०७.२०२६ पर्यंत ऑनलाईन जमा करावयाची आहे.


मुख्याध्यापक/ प्राचार्य, सर्व जिल्हा परिषद/नगरपालिका/ महानगरपालिका यांच्या हद्दीतील सर्व शासनमान्य प्राथमिक व माध्यमिक शाळा यांना कळविण्यात येते की, बालचित्रकला स्पर्धेकरिता विद्यार्थ्यांचे नाव नोंदणी गटनिहाय व सर्वसाधारण नोंदवहीतील (General Register) नावाप्रमाणे अचूक ऑनलाईन नोंदणी शाळेमार्फत करावी. बालचित्रकला स्पर्धेकरिता शाळेची नोंदणी व विद्यार्थ्यांची नोंदणी https://www.msbae.ac.in था संकेतस्थळावरील बालचित्रकला या टॅबमध्ये किंवा https://balchitrakala2026.msbae.in या लिंकवर भराययचा आहे. सदर स्पर्धेकरिता जास्तीत जास्त विद्यार्थी नोंद होण्याकरिता सर्व संबंधित विद्यार्थी तसेच पालक व शाळा यांना उपरोक्त संदर्भिय शासन निर्णय निदर्शनास आणावा.


बाल चित्रकला स्पर्धा संक्षिप्त माहिती 

बाल चित्रकला स्पर्धा 2026 गट

इ.1ली व 2री

इ.3री ते 4थी

इ.5वी ते 7वी

इ.8वी ते 10वी


बाल चित्रकला स्पर्धा दिनांक - 08 ऑगस्ट 2026


बाल चित्रकला स्पर्धा नोंदणी लिंक - Click Here 

https://balchitrakala2026.msbae.in

बाल चित्रकला स्पर्धा नोंदणी अंतिम दिनांक - 31 जुलै 2026 पर्यंत होती ती आता 04 ऑगस्ट पर्यंत वाढविण्यात आली आहे.

मुदतवाढ - 04 ऑगस्ट 2026

Hall Ticket 

बाल चित्रकला स्पर्धा 2026 हॉल तिकीट डाउनलोड लिंक - Click Here 



बाल चित्रकला स्पर्धा 2026 विषय / प्रश्नपत्रिका 

सर्व केंद्रशाळांना सूचित करण्यात येते की, बालचित्रकला स्पर्धा २०२६ ची प्रश्नपत्रिका उद्या, दिनांक ०८ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी ६.०० वाजता शाळेच्या लॉगिनमध्ये डाउनलोड करण्यासाठी उपलब्ध होईल. तरी सर्व केंद्रशाळांनी स्पर्धेच्या वेळेच्या किमान एक तास अगोदर प्रश्नपत्रिका डाउनलोड करून घ्यावी, जेणेकरून स्पर्धेच्या वेळी कोणतीही तांत्रिक अडचण निर्माण होणार नाही. सर्वांनी याची नोंद घेऊन आवश्यक ती कार्यवाही करावी.

बाल चित्रकला स्पर्धा 2026 विषय / प्रश्नपत्रिका डाउनलोड करा. - Click Here


बाल चित्रकला स्पर्धा 2026 आयोजनाबाबत सूचना 


  • शाळेच्या अधिकृत लॉगिनवरून बालचित्रकला स्पर्धा पोर्टलवर प्रवेश करून गटनिहाय विषय डाऊनलोड करावेत.
  • बाल चित्रकला स्पर्धा दिनांक ८ ऑगस्ट २०२६ रोजी शाळेच्या नियोजित वेळेतील कोणत्याही दोन तासांमध्ये घेण्यात यावी.
  • चित्रकला विषयाची गोपनीयता बाळगावी.
  • विद्यार्थ्यांना पेपर देण्यापूर्वी, चित्राच्या पाठीमागील बाजूस उजव्या हाताच्या वरच्या कोपऱ्यात कला शिक्षण मंडळाने दिलेल्या नमुन्याप्रमाणे शिक्का व शाळेचा अधिकृत शिक्का मारावा.


  • विद्यार्थ्यांनी शिक्क्यामधील सर्व आवश्यक माहिती (नाव, गट, बैठक क्रमांक, शाळेचे नाव इ.) अचूक भरल्याची खात्री करावी.
  • स्पर्धेमध्ये जे विद्यार्थी अनुपस्थित असतील त्यांची अनुपस्थिती लॉगिन पोर्टल वरती नोंदविणे बंधनकारक राहील.
  • जमा करणे, पॅकिंग व हस्तांतरण बाबत सूचना 
  • प्रशासकीय शिस्त व तांत्रिक मदत

बाल चित्रकला स्पर्धा आयोजन / व्यवस्थापन संपूर्ण मार्गदर्शिका PDF


बाल चित्रकला स्पर्धा परीक्षा फी - 20 रुपये प्रति विद्यार्थी 


बाल चित्रकला स्पर्धा आयोजन वेळापत्रक 



बाल चित्रकला स्पर्धा 2026 विषय


बाल चित्रकला स्पर्धा बक्षीस योजना


बाल चित्रकला स्पर्धा गट विभागणी 



बाल चित्रकला स्पर्धा 2026 नोंदणी करणेबाबत शासन परिपत्रक डाउनलोड करा. Click Here 


बाल चित्रकला स्पर्धा 2026 संपूर्ण मार्गदर्शिका PDF - Click Here


maharashtra state board of art education

balchitrakala spardha 2026 registration

balchitrakala 2026 msbae

balchitrakala 2026 msbae in






Post a Comment

0 Comments

close