Latest Update

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

जलसुरक्षा विषय मूल्यमापन निकष व श्रेणी तक्ता. इयत्ता नववी व इयत्ता दहावी Water security subject evaluation criteria and grade table for class IX and class X

जलसुरक्षा हा विषय अनिवार्य श्रेणी विषय म्हणून समाविष्ट करण्यात आलेला आहे. जल सुरक्षा विषय मूल्यमापन निकष कोणते? व श्रेणी तक्ता यांची माहिती पहा. जलसुरक्षा पुस्तक PDF Download करा. 

Water security subject evaluation criteria and grade table for Class IX and Class X.

इयत्ता नववी व दहावीसाठी सन 2021-22 या सालापासून 'जलसुरक्षा' हा 'अनिवार्य श्रेणी विषय' म्हणून समाविष्ट करण्यात आलेला आहे.

सदरच्या विषयासाठी पाठयपुस्तक आणि कार्यपुस्तिका (उपक्रम प्रकल्प नोंदवही) अशी दोन पुस्तके तयार केलेली आहेत. ही दोन्ही पुस्तके महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळाने (बालभारती ) निर्धारित केलेल्या आहेत. विद्यार्थ्यांनी त्यांचा वापर आहे. पाठयपुस्तकात जलशिक्षण, जलसंधारण, जलव्यवस्थापन जलगुणवत्ता या घटकांचा समावेश आहे. या घटकावर आधारित विविध कृती उपक्रम आणि प्रकल्प पूर्ण करावयाचे आहेत. कार्यपुस्तिकेमध्ये प्रकल्प आणि उपक्रम यांच्या नोंदी करावयाच्या आहेत.


विद्यार्थ्यांनी प्रत्येक घटकावर तीन उपक्रम आणि एक प्रकल्प असे एकूण 12 उपक्रम आणि 4 प्रकल्प वर्षभरात पूर्ण करावयाचे आहेत. मूल्यमापनासाठी खालील तक्त्यात दाखवल्याप्रमाणे, उपक्रम आणि प्रकल्प यांची निवड करून त्यांना गुण दयावयाचे आहेत. हे सर्व मूल्यमापन प्रात्यक्षिक परीक्षेच्या वेळी तपासले जाणार आहे. तसेच कार्यपुस्तिका ( उपक्रम व प्रकल्प नोंदवही) शैक्षणिक वर्षाच्या शेवटी जमा करून घेतले जाणार आहेत. जलसुरक्षा विषयाच्या मूल्यमापन विषयक नोंदी सत्रनिहाय (प्रथम सत्र आणि द्वितीय सत्र ) कराव्यात.


जलसुरक्षा विषय मूल्यमापन निकष PDF
जलसुरक्षा विषय श्रेणी तक्ता PDF


वरील प्रमाणे इयत्ता 10 वीच्या 'जलसुरक्षा' या विषयाचे मूल्यमापनाचे स्वरूप असून त्यानुसार विद्यार्थी व शिक्षकांनी कार्यवाही करावी.
स्त्रोत - कोल्हापूर जिल्हा माध्यमिक व उच्च माध्यमिक मुख्याध्यापक संघ


Post a Comment

0 Comments

close