केंद्र शासनाच्या मानव संसाधन विकास मंत्रालयाकडून देशातील सर्व शाळांसाठी सन 2015-16 पासून स्वच्छ विद्यालय हा पुरस्कार सुरु करण्यात आला आहे. स्वच्छ भारत अभियानांतर्गत हा उपक्रम सुरु करण्यात आला आहे. या निकषामध्ये 90 ते 100 टक्के गुण मिळविणाऱ्या शाळांना हिरवा रंग, पाच श्रेणी आणि अत्युत्कृष्ट असा शेरा दिला जाणार आहे. या पुरस्कार निवडीचे सन 2021-22 चे स्तरनिहाय नियोजन येथे उपलब्ध करून देण्यात आले आहे.
स्वच्छ विद्यालय पुरस्कार 2021-22 पुरस्कारासाठी स्तरनिहाय वेळापत्रक
31 मार्च 2022 - ऑनलाईन नामांकन सादरीकरण / रजिस्ट्रेशन - शाळा स्तर
स्वच्छ विद्यालय पुरस्कार 2021-22 रजिस्ट्रेशन साठी येथे टच करा. Click Here
1 एप्रिल ते 15 मे 2022 - शाळांची पडताळणी व निवड - जिल्हा स्तर समिती
२२ मे, २०२२ - राज्यस्तरीय पुरस्कारासाठी निवड केलेल्या शाळांची यादी पाठविणे.
२२ मे ते ३० जून, २०२२ - राज्यस्तरीय पुरस्कारासाठी शाळांची पडताळणी व निवड - राज्य स्तर समिती
१ जुलै ते ७ जुलै, २०२२ - राष्ट्रीय पुरस्कारासाठी निवडलेल्या शाळांची यादी सादर करणे.
७ जुलै ते ७ सप्टेंबर, २०२२ - राज्यस्तरावरून शाळांची पडताळणी - राष्ट्रीय स्तर समिती
१५ ऑक्टोबर, २०२२ - पुरस्कार प्रदान सोहळा


0 Comments