Latest Update

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

स्वच्छ विद्यालय पुरस्कार नोंदणी प्रक्रिया | Swacch vidyalay puraskar Registration link

स्वच्छ विद्यालय पुरस्कार 2021-22 साठी ऑनलाईन नामांकन सादर करण्याची अंतिम तारीख 31 मार्च 2022 पर्यंत देण्यात आलेली आहे. स्वच्छ विद्यालय पुरस्कार 2021-22 साठी मार्गदर्शक सूचना तसेच शाळांसाठी नामनिर्देशन (Self Nomination) करताना आवश्यक असलेली प्रश्नावली केंद्र शासनाच्या शिक्षण मंत्रालयाच्या वेबसाईटवर स्वच्छ विद्यालय पुरस्कार मोबाईल ॲपच्या माध्यमातून उपलब्ध करून देण्यात आलेली आहे.  

स्वच्छ विद्यालय पुरस्काराबाबत माहिती -  Click Here

  • भारत सरकारने दि. 2 ऑक्टोबर, 2014 पासून संपूर्ण देशात स्वच्छ भारत अभियानाची सुरुवात केलेली आहे. देशातील सर्व शाळांसाठी सन 2015-16 पासून स्वच्छ विद्यालय पुरस्कार सुरू केलेला आहे. 
  • स्वच्छ विद्यालय पुरस्कारासाठी राज्यातील ग्रामीण व शहरी भागातील शासकीय अनुदानित व खाजगी शाळा पात्र असून त्यांना या पुरस्कारासाठी नामांकन सादर करता येईल. 

  • पुरस्कारासाठी राष्ट्रीय पातळीवर ४६, राज्य पातळीवर २६ व जिल्हा पातळीवर ३८ शाळांची निवड करण्यात येणार आहे. 

  • सदर पुरस्काराकरिता नामांकन करणाऱ्या शाळांनी सादर केलेल्या माहितीची पडताळणी जिल्हा, राज्य व राष्ट्रीय स्तरावर करण्यात येणार आहे. 
  • स्पर्धेकरिता निश्चित करण्यात आलेल्या सहा उपघटकांसाठी ५९ निर्देशांक निश्चित करण्यात आले आहेत व त्यानुसार शाळांना प्राप्त होणारे गुण विचारात घेवून श्रेणी देण्यात येणार आहे.
सदर पुरस्कारासाठी शाळांनी नामांकन सादर करण्याची अंतिम मुदत दि. 31 मार्च 2022 आहे. 

ऑनलाईन रजिस्ट्रेशन साठी लिंक - http://education.gov.in Swacch vidyalay Swacch vidyalay puraskar 2021-22 


ऑनलाईन रजिस्ट्रेशन साठी ॲप - 

गुगल प्ले स्टोअर किंवा ॲपल ॲप स्टोअर वर उपलब्ध असलेल्या 'Swachh Vidyalay Puraskar 2021-22' या ॲपवर शाळेचा UDISE कोड वापरुन नोंदणी करावी.

Google Play store link - Click Here

Apple App Store link - Click Here

स्वच्छ विद्यालय पुरस्कार 2021-22 पुरस्कारासाठी स्तरनिहाय वेळापत्रक 

31 मार्च 2022 - ऑनलाईन नामांकन सादरीकरण / रजिस्ट्रेशन - शाळा स्तर - Click Here

1 एप्रिल ते 15 मे 2022 - शाळांची पडताळणी व निवड - जिल्हा स्तर समिती
२२ मे, २०२२ - राज्यस्तरीय पुरस्कारासाठी निवड केलेल्या शाळांची यादी पाठविणे.

२२ मे ते ३० जून, २०२२ - राज्यस्तरीय पुरस्कारासाठी शाळांची पडताळणी व निवड - राज्य स्तर समिती
१ जुलै ते ७ जुलै, २०२२ - राष्ट्रीय पुरस्कारासाठी निवडलेल्या शाळांची यादी सादर करणे.

७ जुलै ते ७ सप्टेंबर, २०२२ - राज्यस्तरावरून शाळांची पडताळणी - राष्ट्रीय स्तर समिती
१५ ऑक्टोबर, २०२२ - पुरस्कार प्रदान सोहळा

Post a Comment

0 Comments

close