निपुण महाराष्ट्र अभियान अंतर्गत इयत्ता 2री ते 5वी च्या सर्व विद्यार्थ्यांच्या मासिक चाचणी नियोजना बाबत शासन परिपत्रक| निपुण महाराष्ट्र मासिक चाचणी वेळापत्रक | करावयाची कार्यवाही डेमो व्हिडिओ लिंक
सुपर निपुण शाळांमधील विद्यार्थ्यांची पुनर्चाचणी घेणेबाबत शासन परिपत्रक - Click Here
निपुण महाराष्ट्र ॲप डाउनलोड करा. - Click Here
मुख्याध्यापक, शिक्षक व पालकांनी निपुण महाराष्ट्र ॲप कसे वापरावे? Click Here
भारत सरकार यांच्या निपुण भारत अभियानांतर्गत इयत्ता 2री पर्यंतच्या सर्व विद्यार्थ्यांसाठी सन 2026-27 पर्यंत पायाभूत साक्षरता व संख्याज्ञान कौशल्ये प्राप्त करण्याचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. सद्यस्थितीत प्राथमिक स्तरावरील विद्यार्थ्यांसाठी विशेष प्रयत्न करण्याची आवश्यकता असल्याचे निदर्शनास आल्याने इयत्ता दुसरी ते पाचवीच्या सर्व विद्यार्थ्यांसाठी निपुण महाराष्ट्र अभियान राबविण्यात येत असून या अंतर्गत मार्च 2025 ते जून 2025 दरम्यान राज्यातील सर्व शासकीय व अनुदानित शाळांच्या शिक्षकांनी विद्यार्थ्यांची अध्ययनस्तर चाचणी घेऊन त्याची माहिती VSK chatbot वर भरलेली आहे.
तसेच ऑगस्ट 2025 ते ऑक्टोबर 2025 दरम्यान "निपुण महाराष्ट्र (एससीईआरटीएम) ॲप" मध्ये पर्यवेक्षीय यंत्रणेतर्फे पुनर्चाचणी नोंदी करण्यात आलेल्या आहेत. सदर पुनर्चाचणीचा अहवाल दिनांक 17 नोव्हेंबर 2025 रोजी प्रस्तुत कार्यालयात मा. आयुक्त (शिक्षण) महाराष्ट्र राज्य, मा. संचालक, राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र तसेच प्राचार्य, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था (सर्व) यांच्या उपस्थितीत सादर करण्यात आलेला आहे.
सदर अभियानाचा पुढील टप्पा (मासिक मूल्यमापन) सुरु होत असून, त्याची सुनियोजित अंमलबजावणी होणे गरजेचे आहे. यासाठी शालेय शिक्षण विभागांतर्गत असलेल्या सर्व शासकीय, शासकीय अनुदान प्राप्त शाळांचा समावेश केलेला आहे. यासाठी आवश्यक पूर्वतयारीच्या अनुषंगाने सर्व मुख्याध्यापक व शिक्षकांचा समावेश ॲपमध्ये शालार्थ पोर्टलद्वारे करण्यात आलेला आहे. तथापि चाचणी व मूल्यमापन प्रक्रियेचे अधिक सुलभीकरण होण्यासाठी यातील संबंधितांचा शालार्थ प्रणालीतील नोंदणीकृत संपर्क क्रमांक हाच त्यांचा लॉगिन आयडी असेल. शालार्थ पोर्टल मधील बदलानुसार आता शिक्षक व मुख्याध्यापक याची शाळा व इतर माहिती ॲपमध्ये दिसणार आहे. कार्यक्रमाचे नियोजन पुढील प्रमाणे असेल.
मुख्याध्यापक व शिक्षकांनी करावयाची कार्यवाही डेमो व्हिडिओ
* शालार्थ 2.0मध्ये अपडेट करावयाची माहिती
* निपुण 6ऊ पत्र अपलोड करणे
* तुकड्यांसाठी शिक्षकांची नेमणूक
* मासिक चाचणी कशी घ्यावी?
* चाचणी अहवाल पाहणे
* डेमो व्हिडिओ पाहण्यासाठी लिंक👇
https://www.shaleyshikshan.in/2025/12/Nipun-Masik-Chachani.html
नमूद कालावधी व तारखेनंतर "निपुण महाराष्ट्र (एससीईआरटीएम) ॲपमध्ये" चाचणी घेण्याची सुविधा बंद केली जाईल व त्यानंतर शिक्षकांना चाचणी घेता येणार नाही, ठराविक कालावधीतच चाचणी व नोंदणी पूर्ण होईल याची खात्री करावी.
निपुण अभियान अध्ययनस्तर मासिक चाचणी व नोंदणी प्रक्रिया वेळापत्रक
निपुण मासिक चाचणी : मार्च 2026
मुदत - 23 मार्च ते 28 मार्च 2026
मुदतवाढ - निपुण चाचणी मार्च 2026 - 31 मार्च 2026 पर्यंत मुदतवाढ देण्यात येत आहे.
निपुण अभियान शिक्षक नेमणुकीचे ६(ऊ) पत्र PDF डाउनलोड करा. Click Here
जानेवारी
१९ जानेवारी ते २४ जानेवारी २०२६
फेब्रुवारी
२३ फेब्रुवारी ते २८ फेब्रुवारी २०२६
मार्च
२३ मार्च २८ मार्च २०२६
Useful PDF
निपुण महाराष्ट्र अध्ययनस्तर मासिक चाचणी घेणेबाबत शासन परिपत्रक 09 डिसेंबर 2025 डाउनलोड करा. Click Here
शिक्षक, मुख्याध्यापक व पर्यवेक्षकीय यंत्रणा यांना झालेल्या कामाचे/नोंदीचे अहवाल व विश्लेषण "निपुण महाराष्ट्र (एससीईआरटीएम) ॲपमध्येच" तात्काळ उपलब्ध होतात. जिल्हा पातळीवरील सर्व यंत्रणेस स्वतंत्र डॅशबोर्ड उपलब्ध होणार असल्याने याचा वापर, पाठपुरावा व कृती आराखड्यासाठी करता येईल. पर्यवेक्षकीय यंत्रणेची विश्लेषणाच्या कामकाजासाठी लागणाऱ्या वेळेचीही बचत होईल. ॲपमध्ये वरीलप्रमाणे सर्व माहिती अद्ययावत केल्यानंतर शिक्षकांना व मुख्याध्यापकांनाही पर्यवेक्षक पुनर्चाचणीचा शाळानिहाय (ऑगस्ट २०२५) अहवाल देखील पाहता येणार आहे.
राज्यातील सर्व शाळांची निपुण महाराष्ट्र अभियानांतर्गत अध्ययनस्तर चाचणी व नोंदणी सुरु होत असल्याने वरीलप्रमाणे कार्यवाही होणे आवश्यक आहे. सदरील प्रक्रिया पूर्ण असलेल्या शाळेच्या शिक्षक व मुख्याध्यापकांनाच निपुण महाराष्ट्र (एससीईआरटीएम) या ॲपचा वापर सुयोग्य रीतीने करता येईल याची नोंद घ्यावी.
निपुण महाराष्ट्र अभियान - डिसेंबर २०२५ ते मार्च २०२६
SCERTM प्रपत्र दि. ९ डिसेंबर २०२५ नुसार शालेय शिक्षण विभागातील सर्व सहभागी व्यक्तींनी आपापल्या जबाबदारीनुसार करण्याचे टप्पे व डेमो व्हिडीओ
क्र. १. मुख्याध्यापकांनी शालार्थ २.० येथे स्वतःची माहिती अपडेट करावी (केवळ एकदाच), त्यास डीडीओ-2 यांची मान्यता घ्यावी. अंतिम तारीख: 14 डिसेंबर 2025
डेमो लिंक:
https://youtu.be/o-0GmxdaScM?si=-9RYrAMnry7oGwO
क्र. २. मुख्याध्यापकांनी निपुण महाराष्ट्र ॲप मध्ये लॉगिन करून दि.५ मार्च २०२५ चे शासनदेशानुसार शिक्षक नेमणुकीचे पत्र नमुना ६(ऊ) पत्र अपलोड करावे (केवळ एकदाच),अंतिम तारीख: 14 डिसेंबर 2025
डेमो लिंक:
https://youtube.com/shorts/l7e942uLGgQ?feature=share
निपुण अभियान शिक्षक नेमणुकीचे ६(ऊ) पत्र PDF डाउनलोड करा. Click Here
Useful PDF
क्र. ३. मुख्याध्यापकांनी निपुण महाराष्ट्र ॲप मध्ये लॉगिन करून शाळेतील इयत्ता २री ते ५वीच्या सर्व तुकड्यांसाठी शिक्षकांची नेमणूक करावी. (केवळ एकदाच), अंतिम तारीख: 14 डिसेंबर 2025
डेमो लिंक:
https://youtube.com/shorts/UVurCRUQA60?feature=share
क्र. ४. शिक्षकांनी निपुण महाराष्ट्र ॲप मध्ये लॉगिन करून त्यांना नेमून दिलेल्या वर्गातील सर्व विद्यार्थ्यांची दिलेल्या तारखेनुसार चाचणी घ्यावी. (मासिक चाचणी पुढील ३ महिने)
अ. वर्गातील डेमो लिंक १:
https://www.youtube.com/watch?v=xg6YjLbqzeY
ब. ॲप डेमो लिंक २:
क्र. ५. आपल्या जिल्ह्याची/तालुक्याची/केंद्राची, एकत्रित व शाळानिहाय कार्यस्थिती पाहण्यासाठी पर्यवेक्षक लॉगिन कसे वापरावे.
अ. ६(ऊ) अपलोड आकडेवारी पाहण्यासाठी डेमो लिंक:
https://youtube.com/shorts/FxkufHMMgpk?feature=share
ब. तुकडीनिहाय शिक्षक नेमणूक आकडेवारी पाहण्यासाठी डेमो लिंक:
https://youtube.com/shorts/XGUP-hNY4Sc?feature=share
क्र. ६. शिक्षक व मुख्याध्यापकांनी ऑगस्ट २०२५ पर्यवेक्षक चाचणी नुसार आपल्या शाळेचा मागील अहवाल पाहण्यासाठी
डेमो लिंक:
https://youtube.com/shorts/Blvy2CjFU_4
निपुण महाराष्ट्र अभियान उपयुक्त लिंक्स
1.निपुण महाराष्ट्र ॲप लिंक:
https://play.google.com/store/apps/details?id=com.nipun
2.SCERTM पत्र लिंक:
https://drive.google.com/file/d/1-AYV0kJwPrxgISSnH1ADN-duBCvISFl6/view?usp=sharing
3. User Manual PDF
आपल्या मित्रांना शेअर करा.






0 Comments