Latest Update

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

मुख्यमंत्री "माझी शाळा, सुंदर शाळा" अभियान - शाळा मूल्यांकन वेळापत्रक PDF | Chief Minister My School Beautiful School Assessment Schedule PDF

मुख्यमंत्री "माझी शाळा, सुंदर शाळा" या अभियानामध्ये शाळा स्तरावरुन माहिती अंतिम करणे व केंद्र स्तर, तालुका स्तर, जिल्हा स्तर, मनपा स्तर, विभाग स्तर, राज्य स्तर यानुसार शाळांचे मूल्यांकन करणे याचे वेळापत्रक तयार करण्यात आले आहे. "मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा" अभियानाच्या अंमलबजावणी व मूल्यांकन बाबतचे वेळापत्रक PDF उपलब्ध करुन देण्यात आली आहे. 

मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा अभियान' 100 गुणांचे मूल्यांकन निकष PDF


मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा अभियान मूल्यांकन बाबत नवीन परिपत्रक

शिक्षण आयुक्तालयाने दि 14 फेब्रुवारी 2024 रोजी परिपत्रक निर्गमित करून सूचित केले आहे कि...

राज्यातील सर्व व्यवस्थापनाच्या व सर्व माध्यमांच्या शाळांमधील शिक्षक, पालक, विद्यार्थी व माजी विद्यार्थी यांच्या शाळेप्रती उत्तरदायित्वाची भावना निर्माण व्हावी व त्यायोगे स्पर्धात्मक वातावरणातून विद्यार्थ्यांना शिकण्यासाठी आनंददायी व प्रेरणादायी वातारवण मिळावे यासाठी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर आदर्श शाळा योजनेंतर्गत "मुख्यमंत्री माझी शाळा. सुंदर शाळा" हे अभियान राबविण्यासाठी दि. 30.11.2023 अन्वये शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे.

2/- या अभियानाच्या अनुषंगाने शाळांना माहिती भरण्यासाठी सरल मधील शाळा पोर्टलव्दारे टॅब उपलब्ध करून देऊन शाळा स्तरावरून माहिती अंतिम करणे, केंद्र स्तर, तालुका स्तर, जिल्हा स्तर, मनपा स्तर विभाग स्तर, राज्य स्तर यानुसार शाळा मूल्यांकनाचे वेळापत्रक तयार करण्यात आले आहे.

3/- त्याअनुषंगाने शाळांकडून भरलेल्या माहितीचे केंद्र पातळीवरुन मूल्यांकन करून सर्वोत्तम गुणांकन असणारी प्रथक क्रमांकावरील एक शाळा (प्रत्येक गटातून एक प्रमाणे) ब्लॉक पातळीवर मूल्यांकनासाठी ऑनलाईन प्रणालीमार्फतच पाठविण्यात येईल. याच पध्दतीने जिल्हापातळीवर प्रत्येक ब्लॉकमधून प्रथक क्रमांकाची शाळा (प्रत्येक गटातून एक प्रमाणे) विभाग पातळीवर प्रत्येक जिल्ह्यातून प्रथम क्रमांकाची एक शाळा (प्रत्येक गटातून एक प्रमाणे) राज्यस्तरावर प्रत्येक विभागातून एक सर्वोत्तम गुण असणारी शाळा (प्रत्येक गटातून एक प्रमाणे) याप्रमाणे मूल्यांकनासाठी ऑनलाईन प्रणालीमार्फतच पाठविण्यात येईल. तसेच तालुका पातळीवरून पुढे मूल्यांकन करताना शाळांचे लगतच्या स्तरावरून दिलेले शाळांचे गुण दिसणार नाहीत. या सर्व प्रक्रियेमध्ये कोणत्याही प्रकारे आपल्या स्तरावरून स्वतंत्रपणे कार्यवाही करण्याची आवश्यकता नाही, याची नोंद घ्यावी. ऑनलाईन प्रणालीव्दारचे सर्व माहिती यामध्ये उपलब्ध करून दिली जाणार असून त्याप्रमाणे दिलेल्या वेळापत्रकानुसार सर्व कामकाज पूर्ण होईल याची दक्षता घ्यावी.

मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा अभियान मूल्यांकन बाबत नवीन परिपत्रक पहा. 


मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा" अभियानाच्या अंमलबजावणी व मूल्यांकन बाबतचे वेळापत्रक

राज्यातील सर्व व्यवस्थापनाच्या व सर्व माध्यमांच्या शाळांमधील शिक्षक, पालक, विदयार्थी व माजी विदयार्थी यांच्या शाळेप्रती उत्तरदायित्वाची भावना निर्माण व्हावी व त्यायोगे स्पर्धात्मक वातावरणातून विदयार्थ्यांना शिकण्यासाठी आनंददायी व प्रेरणादायी वातारवण मिळावे यासाठी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर आदर्श शाळा योजनेंतर्गत "मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा' हे अभियान राबविण्यासाठी दि.३०.११.२०२३ अन्वये शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे.


या अभियानाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी विविध उपक्रमांच्या अनुषंगाने प्रत्येक टप्प्यावरील उपक्रम हे विहित कालावधीत पार पाडण्यासाठी व करावयाच्या कार्यवाहीबाबत सुस्पष्टता येण्यासाठी संदभीय पत्रान्वये विविध जबाबदा-या निश्चित करुन व सूचना तसेच व्हीसीव्दारे घेतलेल्या बैठकीमधून आवश्यक ते मार्गदर्शन व निर्देश देण्यात आलेले आहेत.


या अभियानाच्या अनुषंगाने शाळांना माहिती भरण्यासाठी सरल मधील शाळा पोर्टलद्वारे टॅब उपलब्ध करुन देऊन माहिती भरण्यात येत आहे. तसेच शाळांकडून माहिती भरताना येणा-या अडणीची सोडवणूक करण्यासाठी प्रत्येक स्तरावर मदत कक्ष स्थापन करण्याचे निदेश देण्यात आलेले आहेत.


या अभियानामध्ये शाळा स्तरावरुन माहिती अंतिम करणे, केंद्र स्तर, तालुका स्तर, जिल्हा स्तर, मनपा स्तर, विभाग स्तर, राज्य स्तर यानुसार शाळा मूल्यांकनाचे वेळापत्रक तयार करण्यात आले आहे. शासन निर्णय, दिनांक ३०.११.२०२३ अन्वये निश्चित केलेल्या मूल्यांकन समितीकडून शाळांचे मूल्यांकन दिलेल्या मुदतीमध्ये पूर्ण करुन माहिती अंतिम करावयाची आहे.

मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा अभियान शाळा मूल्यांकन समिती PDF


सदर अभियान हे अत्यंत कालमर्यादित स्वरुपाचे असून त्याचा मा. मुख्यमंत्री कार्यालयाकडून वेळोवेळी आढावा घेण्यात येतो. त्यामुळे सोबत जोडलेल्या वेळापत्रकामध्ये कोणत्याही परिस्थिती बदल केला जाणार नाही याची नोंद घ्यावी. तसेच शाळांकडून वा इतर कोणत्याही स्तरावर एकदा भरलेली माहिती ही अंतिम असेल त्यामध्ये पन्हा बदल करण्याची सुविधा उपलब्ध होणार नाही. याची देखील नोंद घ्यावी. या बाबत आपल्या स्तरावरुन सर्व संबंधितांना सूचित करावे. त्याकरीता आवश्यकतेनुसर सर्व मनुष्यबळाचा वापर करुन शाळांकडून माहिती भरण्याची व सर्व स्तरावरील मूल्यांकन हे विहित वेळापत्रकाप्रमाणेच पूर्ण करुन अभियान यशस्वी पार पाडले जाईल याची सर्वांनी दक्षता घ्यावी.

"मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा" अभियानाच्या अंमलबजावणी व मूल्यांकन बाबतचे वेळापत्रक PDF डाउनलोड करा.


“मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा" अभियान सन-२०२४
शाळा मूल्यांकन वेळापत्रक

अ) शाळा स्तरावरुन माहिती अंतिम करण्याचा दिनांक १६/०२/२०२४ वेळ रात्री ११:०० वाजेपर्यत

ब) केंद्र स्तर :- दिनांक ०५/०२/२०२४ सोमवार (माहिती अंतिम झाली त्यांच्याकरीता) ते दिनांक १८/०२/२०२४ शनिवार

क) तालुका :- दिनांक १२/०२/२०२४ सोमवार (केंद्र पातळीवरुन अंतिम झालेली) ते दिनांक २०/०२/२०२४ मंगळवार सायं.०५.०० वाजेपर्यत

ड) जिल्हा :- दिनांक १९/०२/२०२४ सोमवार (अंतिम झालेल्या शाळांचे मूल्यांकन) ते दिनांक २२/०२/२०२४ गुरुवार सकाळी ११:०० वाजेपर्यत


इ) मनपा :- दिनांक १२/०२/२०२४ सोमवार (अंतिम झालेल्यांचे मूल्यांकन) ते दिनांक २२/०२/२०२४ गुरूवार


ई) विभाग :- दिनांक २२/०२/२०२४ गुरूवार ते २४/०२/२०२४ शनिवार


उ) राज्य :- दिनांक २६/०२/२०२४ सोमवार ते दिनांक २८/०२/२०२४ बुधवार दु. ०२.०० वा.पर्यंत


"मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा" अभियानाच्या अंमलबजावणी व मूल्यांकन बाबतचे वेळापत्रक PDF डाउनलोड करा.मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा" अभियान सन-२०२४ शाळा मूल्यांकन वेळापत्रक

मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा" अभियान सन-२०२४

शाळा मूल्यांकन वेळापत्रक

Post a Comment

0 Comments

close