Latest Update

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

आश्वासित प्रगती योजना :- राज्यातील खाजगी मान्यताप्राप्त प्राथमिक, उच्च प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांतील कर्मचाऱ्यांना सुधारित सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजना लागू करणेबाबत शासन निर्णय

राज्यातील खाजगी मान्यताप्राप्त प्राथमिक, उच्च प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांतील शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना सुधारित सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजना लागू करणेबाबत शासन निर्णय



राज्यातील खाजगी संस्थामार्फत चालविण्यात येणा-या मान्यताप्राप्त प्राथमिक, उच्च प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक अनुदानित शाळांतील शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना २ लाभांची सुधारित सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजना दिनांक ०१.०१.२०२४ पासून लागू करण्याचा शासन निर्णय दिनांक १४/०३/२०२४ घेण्यात आला आहे. सदर कर्मचाऱ्यांना सुधारित सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजना लागू करतांना कोणती वेतनश्रेणी देण्यात यावी, याबाबत विचारणा क्षेत्रिय स्तरावरुन करण्यात येत होती. त्यानुसार याबाबत सूचना देण्याची बाब शासन स्तरावर विचाराधीन होती.

राज्यातील खाजगी संस्थामार्फत चालविण्यात येणाऱ्या मान्यताप्राप्त प्राथमिक, उच्च प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक अनुदानित शाळांतील शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना २ लाभांची सुधारित सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजना दिनांक ०१.०१.२०२४ पासून लागू करण्यात आलेली आहे. राज्यातील खाजगी संस्थामार्फत चालविण्यात येणाऱ्या मान्यताप्राप्त प्राथमिक, उच्च प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक अनुदानित शाळांतील शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना या शासन निर्णयाला जोडलेल्या परिशिष्ट "अ" प्रमाणे वेतनश्रेणी देय राहतील.

सदरचा शासन निर्णय वित्त विभागाचा अनौपचारिक संदर्भ क्रमांक २७/२०२५/ सेवा-३, दिनांक २३.०१.२०२५ अन्वये प्राप्त झालेल्या मान्यतेनुसार निर्गमित करण्यात येत आहे.

सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध असून त्याचा सांकेतांक क्रमांक २०२५०७३११२४१४२०५२१ हा आहे. हा आदेश डिजिटल स्वाक्षरीने साक्षांकित करून काढण्यात येत आहे.


आश्वासित प्रगती योजना परिशिष्ट - अ 






आश्वासित प्रगती योजना परिशिष्ट अ डाउनलोड करा. Click Here


आश्वासित प्रगती योजना शासन निर्णय डाउनलोड करा. Click Here



Post a Comment

0 Comments

close