उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ. १२ वी) व माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (इ. १० वी) परीक्षेस प्रविष्ट होणा-या परीक्षार्थ्यांना प्रश्नपत्रिका वाचण्यासाठी (आकलन होण्यासाठी) परीक्षा दालनात प्रश्नपत्रिकांचे वाटप परीक्षेच्या निर्धारीत वेळेपूर्वी दहा मिनिटे अगोदर करण्यात येत होते. परंतु ही सुविधा फेब्रुवारी-मार्च २०२३ परीक्षेपासून रद्द करण्यात आली आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ नये म्हणून पेपरच्या निर्धारित वेळेनंतर 10 मिनिटे वाढवून देण्यात येत आहेत.
कॉपीमुक्त अभियान | शिक्षा सूची PDF - Click Here
10वी, 12वी बोर्ड परीक्षा प्रश्नपत्रिका संच 2022-23 व 2021-22 डाउनलोड करा. - Click Here
इ. १० वी व इ. १२ वी च्या परीक्षा विद्यार्थ्यांच्या जीवनातील एक महत्वपूर्ण टप्पा असल्यामुळे पालक व समाज घटक यांचे या परीक्षांकडे बारकाईने लक्ष असते. परंतु प्रश्नपत्रिका मोबाईलवर तसेच अन्य समाज माध्यमातून व्हायरल झाल्याच्या अफवा व काही अंशी अशा घटना निदर्शनास आलेल्या आहेत.
अशा प्रकारच्या घटनांना प्रतिबंध व्हावा तसेच परीक्षा निकोप, भयमुक्त व कॉपीमुक्त वातावरणात सुरळीत पार पडाव्यात यासाठी परीक्षेच्या निर्धारीत वेळेपूर्वी दहा मिनिटे अगोदर प्रश्नपत्रिका वितरीत करण्याची सुविधा फेब्रुवारी-मार्च २०२३ परीक्षेपासून रद्द करण्यात येत असल्याचे कळविण्यात आलेले आहे.
तथापि विद्यार्थी हित लक्षात घेवून व पालक, विद्यार्थी यांच्या मागणीचा विचार करून सदरची दहा मिनिटे परीक्षेच्या निर्धारित वेळेनंतर वाढवून देण्यात येत आहे.
फेब्रुवारी-मार्च २०२३ परीक्षेपासून सकाळ सात स. ११.०० वाजता तसेच दुपार सत्रात दु. ३.०० वाजता परीक्षा प्रश्नपत्रिकांचे वितरण करण्यात येईल व लेखनास प्रारंभ होईल. पेपर संपण्याच्या निर्धारीत वेळेपेक्षा 10 मिनिटे उशीरा पेपर घेतला जाईल.
उदा 11:00 ते 02:00 या वेळेतील पेपर 11:00 ते 02:10 पर्यंत असेल. 3:00 ते 5:30 या वेळेतील पेपर 3:00 ते 5:40 पर्यंत असेल.
10 मिनिटे वेळ वाढविणे बाबत मंडळाचे परिपत्रक डाउनलोड करा. Click Here



0 Comments